Mann Maze

Mann Maze

पाऊस आणि चॅनेलवाले

मागच्या काही दिवसापासून  काही मराठी न्यूज चॅनेलवाल्यांनी  त्यांचा दिमाग काय कुठं गहाण ठेवलाय का काय असा प्रश्न वारंवार पडू लागला आहे?
एखाद्या गावात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चांगला पाऊस पडला तर लगेच अक्ख्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला म्हणून बातमी देतायत!
माझ्या गावात आणि तालुक्यातही अजून एकदाही चांगला पाऊस पडलेला नाही, पण शेजारच्या एक तालुक्यात एक चांगला पाऊस झालेला आहे. तरीही हे चॅनेलवाले "उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस, पूर परिस्थिती" वगैरे बातम्या देत आहेत! अगदी अशाच बातम्या लातूर जिल्ह्यासाठी देखील ते देत आहेत. गाव, तालुका, जिल्हा यातला काही फरक कळतो की नाही या वार्ताहरांना?

पेरणी करण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो, किंवा पेरणी झाल्यापासून पीक हाताशी येईपर्यंत किती पाऊस पडावा लागतो, विहिरीला/ बोरला  पाणी येण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो यातलं कसलंही ज्ञान नसताना पावसावरच्या बातम्या देण्यासाठी अशा अक्कलशून्य वार्ताहरांना हे च्यानेलवाले कशासाठी पाठवत असतील?

एकाच पावसात गावचा पाणी प्रश्न मिटला वगैरे भंकस बातम्या जेव्हा हे देतात तेव्हा त्यांच्या मुस्काटात हाणावीशी वाटते, एक पावसात पडलेलं पाणी एकदा त्यांना पाजायला पाहिजे, मग कळेल पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो आणि पाऊस पडल्यानंतर ते पिण्या योग्य होण्यासाठी किती वेळ लागतो!!

ग्रामीण भागातील बातम्या देण्यासाठी त्या पत्रकाराची नाळ त्या ग्रामीण भागाशी जुळलेली असायला हवी, पांढरपेशी पत्रकारांचे हे काम नव्हे!

(हे माझा वयक्तिक मत आहे.)

तू, मी आणि पाऊस!

मला जितकी तुझी तितक्याच तिव्रतेने पावसाची आठवण येतेय. मी आसुसलोय तुला पावसात चिंब भिजलेली पहायला, पावसाचे थेंब तुझ्या गालावरून ओघळताना टिपून घ्यायला. वाऱ्याने गारठणारं तुझं शरीर अलगद माझ्या मिठीत शिरून शांत होताना मला पहायचयं. थरथणारे तुझे ओठ माझ्या ओठानी व्यापून टाकायचेत मला! लाजेने आरक्त झालेले तुझे गाल आणि वाफाळणारे तुझे श्वास मला मझ्यात सामावून घ्यायचेत. मला सामावून घेणारे, आणि एका क्षणात सर्व जगाचा विसर पाडायला लावणारे तुझे डोळे पहायला मी आसुसलोय.
आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींनी मला अक्ष्ररशः वेड लावलंय त्यापैकी एक तू आणि दुसरा पाऊस! तुम्हा दोघांचीही उणिव मला मरेपर्यंत सतावत राहील. एकवेळ पावसाचं मी समजून घेउ शकतो पण तुझ्याशिवाय.......

पहिल्या प्रेमातला पहिलाच पाउस, मी कधीही विसरू शकत नाही ते क्षण! आणि आठवतं तुला? अशाच एका वर्षासंध्येला आपण समुद्रावर उभे होतो. पाउस नुकताच पडून गेलेला तरीही त्याची रिमझिम सुरुच होती. तु माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उधाणलेल्या समुद्राला बघण्यात मग्न आणि मी तुझी शांत चर्या न्याहळण्यात मग्न. माझा हात तुझ्या कमरेला वेढा घालून तुझ्या हातात असलेला. प्रत्येक लाटेबरोबर तू तो अजुनच घट्ट धरलेला. गार वाऱ्याची झुळुक तुझ्या मानेवरच्या केसांना माझ्या चेहऱ्यावर आणून अलगद सोडते. मी तुझ्या स्पर्शाने बेधुंद झालेला. हळूहळू काळोख पडू लागतो पण पाय जागेवरून हालत नाहीत. अचानक! एक गार वाऱ्याचा झोत वेगाने अंगावर येतो, तो तुला सहन नाही होत तु लगेचच मला बिलगतेस आणि थरथरणारे तुझे ओठ माझ्या ओठंवर ठेवतेस २, ३.. ४ किंवा ५ सेकंद!!!!! पण तो क्षण कधी संपू नये असं वाटत राहतं! तुझी मिठी, तुझा स्पर्श, तुझा सुगंध माझ्या रोमरोमांत अगदी एखाद्या जालीम विषासारखा भिनत जातो आणि मी त्या विषाने मंत्रमुग्ध होउन तुझ्या मिठीत जगू लागतो.

प्रेमाचे हे सारे क्षण मला आजही वेड लावतात. तु नसतानाही तु असल्याचे भास होतात. तु गेल्यापासून प्रत्येक पाउस मी असाच तुझ्या आठवणींनी भिजतो. एकदा ना मला ह्या पावसांच्या सरींच्या प्रवाहात वाहून जायचयं कुठल्यातरी वळणांवर तु भेटशील या आशेवर!

M..

गारपीट

आणि अशाप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात होत आहे. गहू, ज्वारी, कांदा  वगैरे हाताशी आलेली पिके आडवी होतील, द्राक्ष, केळी, डाळींब वगैरे फळबागांची झाडाझडती होईल!! विजा पडतील, ढोरं - माणसं होरपळून मरतील!

मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!

सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.

हाती येईल फक्त शून्य!!!

सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!

दूरदृष्टी

इंग्रजांनी दूरदृष्टी ठेवून भारतात पुष्कळ इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, रेल्वे सुरु केली, पूल बांधले आणि अजून बरच काही केलं आणि आपण आजतागायत ते सर्व वापरत आहोत! इंग्रजांनी भारतातील पाण्याचं थोडंफार नियोजन देखील करून ठेवलं असतं त्याकाळात तर आता सरकारच्या नावानं जास्त बोंबलत बसावं लागलं नसतं!!

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अगोदरच्या सर्वच राजांनी प्रत्येक किल्ल्यावर सर्वात आधी पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, हल्लीचे राज्यकर्ते आपली दूरदृष्टी कुठे गहाण ठेऊन जन्माला आलेत कुणास ठाऊक?

श्री विश्वनाथ मंदिर

साताऱ्याजवळ दोन नद्यांच्या संगमावर असलेलं हे रमणीय पेशवेकालीन श्री विश्वनाथ मंदिर. संगमाच्या तिन्ही बाजूला तीन अतिशय सुंदर प्राचीन शिव मंदिरे आहेत.
बऱ्याच हिंदी- मराठी चित्रपटांचं चित्रीकरण या मंदिराच्या परिसरात झालं आहे.
याच मंदिराच्या समोर नदीच्या पात्रात राणी ताराबाईची समाधी आहे.

मन सैरभैर...

सतरंजीवर उताना पडून  छपराला अडकवलेल्या पंख्याकडं डोळे सताड उघडे ठेउन केव्हाचा  एकटक बघतोय! फिरणाऱ्या पंख्यासोबत तितक्याच वेगाने तुझ्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत! रात्र सरत जातेय अणि झोप काही येता येत नाही!
आपल्या दोघांच्या कुठल्यातरी एखाद्या अविस्मरनीय आठवणीवर येउन हा फिरणारा पंखा काही वेळ थाम्बावा, रात्रही तेथेच थाम्बावी आणि अचानक भूकंप यावा व इतके दिवस पंख्याला आधार देणारे ते छप्पर कोसळून जावे आणि या न संपणाऱ्या रात्रीची पुन्हा कधी सकाळच होऊ नये!

मन सैरभैर.....

महेश.

पळसदेव मंदिर

उजनी धरणाची पाणी पातळी मृत साठ्याच्याही खाली गेल्यामुळे धरणाच्या पाण्यात बुडालेले पळसदेव मंदिर कित्येक वर्षानंतर यावर्षी पूर्णपणे उघडे झाले आहे!
या मंदिराशी अगदी मिळतं जुळतं हुबेहूब हेमाडपंती मंदिर माझ्या गावात (श्री महालक्ष्मी मंदिर, जागजी, ता. उस्मानाबाद) आहे! शिखरावरचं नक्षीकाम मंदिराचा गाभारा अगदी हुबेहूब आहे!
आमच्या गावातील मंदिरासमोर मोठी पुष्कर्णी (बारव) आहे, ती या मंदिरासमोर नाही! आणि या मंदिराला जी बाजूने भिंत आहे ती आमच्या मंदिराला नाही.
इतकी वर्ष पाण्यात बुडून देखील मंदिराचा पाया अजूनही खचला नाही हे नवलच!!


पीकविमा

मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या खरीप पिकासाठी (सोयाबीन, तूर, भुईमूग इ.) यावर्षी ऐन दुष्काळात पेरणीच्या तोंडावर चांगला पीकविमा मंजूर झाला आहे आणि येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर बहुतेक जमा देखील होईल! तरीही अजून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने याचं श्रेय लाटल्याचं दिसून येत नाहीये याचंच अजून आश्चर्य वाटतंय!!
पूर्वी असा पिकविमा आला कि शेतकरीदेखील त्याचं श्रेय विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे किंवा पदमसिंह पाटलांना द्यायचे, पण यावर्षी शेतकरी देखील याचं श्रेय कुणालाच देताना दिसत नाहीयेत याचंही तेवढंच आश्चर्य वाटतय!!
असो, शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला हे महत्वाचं!

सद्यस्थितीला अनुसरून

⁠⁠⁠१.
कुत्र्याचा मूत जसं वघळ धरून रस्त्याच्या कडंला जातंय तसं कुसळधार पाऊस पडायलाय, अन चायनेलवाले त्याला बी मुसळधार पाऊस म्हणून दाखवायलेत अन हवामान खत्यावाले शेतकऱ्यास्नी पेरण्या करा म्हून संगायलेत! शेतकऱ्याला हे समदे चायनेलवाले अन हवामानवाले च्युत्याच समजत्यात का काय?
२.
यंदा कोणतंच चायनेल वारीचं कव्हरेज घ्यायलेलं दिसनां झालंय!
अन पावसाच्या आशेनं गावातूनबी यावर्षी वारीला जाण्यात कुणाला लय इंटरेस्ट दिसनां झालाय! देव पावतंय वाटालंय यंदा!!
३.
मराठवाड्यातला पाणीसाठा निव्वळ १% च शिल्लक राह्यला म्हणून चायनेलवाले बम्बलूलालेत, तरीबी वरून दुष्काळ प्याकेज काय यीना झालंय! बंद पडायलेल्या कारखान्याला तर लगेच प्याकेज यायलंय!
४.
तिकडं रघुरामनं राजीनामा दिल्यानं आता देशाची अर्थव्यवस्था बुडल का काय असंच सगळ्या चायनेल वाल्याना अन शिकलेल्या लोकास्नी वाटायला लागलंय! शेतकरी बिचारा यंदा म्हसरं जगतेल का मरतेल म्हून येणाऱ्या जाणाऱ्या वांझोट्या ढगाकडं टक लावून बघत बसलाय!
५.
लातूर उस्मानाबाद बीड वाल्या शेतकऱ्यास्नी मागच्या खरीपाचा पीक विमा मिळालाय खरा पण अजून अकौंटात काय जमा नाय झाला! त्याच्याच जोरावर यंदा खत बी उधार आणून ढाळजंत टाकलंय! तिफण, कासरा, रासनी, वटा समदं तयार करून ठिवलंय खरं वल काय चार बोटाच्या खाली जाईना झालीय अजून!

महेश हाऊळ
२० जून २०१६

अनुत्तरीत प्रश्न!

⁠⁠⁠पावसाळ्याच्या पहिल्या वहिल्या रात्री, जेव्हा वर्षभर आसुसलेल्या त्या धरतीवर मेघराज खूष होऊन गडगडाट आणि विजा सोबतीला घेऊन जेव्हा बरसू लागतो तेव्हा अचानक एखादं कारण मनातल्या मनातच काढून धरतीने न सांगता त्या मेघराजावर रुसावं आणि मेघराजही आपलं काय चुकलं ह्या विचारात मग्न होऊन ते मिलन अधुरंच राहावं, ती रंगात आलेली प्रणयक्रीडा थांबावी  या पेक्षा वाईट दुसरं काय होऊ शकतं? एका क्षणात वातावरणातील तो गारवा, तो मृदगंध, तो गडगडाट आणि ती ऊर्जा नष्ट होऊन अचानक कैफल्य आणि नाराजीचा कोंदट वास सर्वत्र पसरतो, मनं कोमेजली जातात, विचारांचं थैमान सुरु होतं, कडूगोड आठवणींची इतिहास जमा झालेली स्मृतीपृष्ठे डोळ्या समोरून सरसर पालटली जातात!
त्यातल्याच एखाद्या काळाच्या ओघात निसटलेल्या आठवणीसोबत डोळ्यातून एखादा मोती निखळून उशीमधल्या मऊ कापसात त्या काळासारखाच जिरून जातो!
मध्यरात्र उलटून जाते, पहाटेची आस लागते, तरी डोळ्यांना झोपेचा सूर सापडत नाही, विचारांच्या लाटांना किनारा गवसत नाही!
हळूहळू रात्र सरत जाते, घड्याळाचे काटे निमूटपणे आकड्यांच्या भोवती फिरत वातावरणातील शांततेला भंग करत राहतात!
एव्हाना गरजणारे ढग आणि त्यातली ऊर्जाही नष्ट झालेली असते आणि सरत जाणाऱ्या रात्रीच्या मिठीत ती धरणीही निद्रिस्त झालेली असते!
हवेत उरलेली असते फक्त विरक्ती आणि डोळ्यांना लागलेली असते ओढ त्या जवळ येणाऱ्या पहाटेची!
विचारांचं थैमान थांबण्यासाठी ही रात्र सरून पहाट होणं फार गरजेचं होऊन बसतं!
अशा कित्येक रात्री कित्येकांच्या आयुष्यात कित्येक वेगवेगळ्या स्टोऱ्या पहाटेच्या हवाली करून  गुडूप झाल्या असतील, त्यातल्या कित्येक स्टोऱ्या शब्दांच्या कैदेत न अडकता या वातावरणातील प्रदूषित हवेत विरून गेल्या असतील आणि डोळ्यातून निसटलेले कित्येक खारट मोती त्या उशीने पिऊन टाकले असतील!
असे कित्येक पावसाळे येतीलही आणि जातीलही, मागे वळून पाहताना, थोडं बरसायचं राहूनच गेलंय याची खंत त्या मेघराजाला वाटत राहील का? आणि भरून आलेल्या ढगाखाली थोडं भिजायचं राहूनच गेलंय याची खंत त्या धरणीला वाटत राहील का?

अनुत्तरीत प्रश्न!!

गझल

दाखविलास मजला, दिव्य प्रकाश तेव्हा,
माझ्या सोबतीला, अंधार आज आहे!

आभाळून अन आले, चंद्र हरवला तेव्हा,
मंतरलेल्या रातीस, मेघांची साज आहे।

मध्यरातीला उगा, जिवाची घालमेल होई,
तुझ्या परतीची प्रिये, पुन्हा आस आहे।

येशील का फिरोनी, निरुत्तरित प्रश्न आहे,
तुझ्या आठवांचा, हा नित्य त्रास आहे।

महेश

गारपीट

आणि अशाप्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आता महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीटीला सुरुवात होत आहे. गहू, ज्वारी, कांदा वगैरे हाताशी आलेली पिके आडवी होतील, द्राक्ष, केळी, डाळींब वगैरे फळबागांची झाडाझडती होईल!! विजा पडतील, ढोरं - माणसं होरपळून मरतील!

मीडियावाल्याना आता दुष्काळात देखील TRP मिळवण्यासाठी मसाला मिळेल, आणि शहरी शिक्षित जनतेला देखील त्याच त्या JNU च्या आणि रोहितच्या बातम्यांतून तोंड बाहेर काढून शेतकऱ्यांसाठी 2-4 दिवस फेसबुकवर बरळण्यासाठी नवीन विषय मिळेल! दुष्काळात काम नसलेल्या खेड्यापाड्यातल्या माझ्यासारख्या तरुणांना गारपीटीचे फोटो काढुन WhatsApp वर फिरवायला मिळतील!!


सरकारला पण तेवढंच एखादं नवीन प्याकेज जाहीर करण्याची संधी मिळेल, मंत्री लोकांना हेलिकॉप्टर मधून बसून उगाच पाहणी करता येईल, कलेक्टर - तहसीलदार लोकांना आदेश देण्यात येतील, तलाठी लोकांना भर उन्हाळ्यात बांधावर जाऊन पंचनामे करण्याच्या नोटिसा येतील, कागदोपत्री सगळं काही पार पडेल, चार महिने असेच निघून जातील.

हाती येईल फक्त शून्य!!!

सरकार कुठलं का असेना, भेंचोद सगळा उपक्रम तोंडपाठ झालाय!!

दूरदृष्टी


इंग्रजांनी दूरदृष्टी ठेवून भारतात पुष्कळ इमारती बांधल्या, रस्ते तयार केले, रेल्वे सुरु केली, पूल बांधले आणि अजून बरच काही केलं आणि आपण आजतागायत ते सर्व वापरत आहोत! इंग्रजांनी भारतातील पाण्याचं थोडंफार नियोजन देखील करून ठेवलं असतं त्याकाळात तर आता सरकारच्या नावानं जास्त बोंबलत बसावं लागलं नसतं!!

शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अगोदरच्या सर्वच राजांनी प्रत्येक किल्ल्यावर सर्वात आधी पाण्याची सोय केली आणि नंतर किल्ला बांधला, हल्लीचे राज्यकर्ते आपली दूरदृष्टी कुठे गहाण ठेऊन जन्माला आलेत कुणास ठाऊक?

भगदाड

कामांध नजरेला
वासनेचा वास येथे..
बरबटलेल्या वासनेला
नग्णतेची  साथ येथे...

धर्माच्या जोडीला
वेगळीच एक जात येथे..
जातीच्या राजकारणात...
कुणाचा हात येथे?

स्वत:च्या फायद्यासाठी...
डोळ्यांत फेकती धूळ येथे...
धुळीच्या धूसर दृष्टीत
भ्रष्टचाराचे खोल मूळ येथे.

दोन वेळचे खायला
जनता मोताट येथे...
मड्याच्या टाळूचे लोणी खाया..
कुत्रे किती मोकाट येथे...

कायदे झाले सैल..
गुंडगिरी मात्र सक्त येथे..
अन गल्लीबोळातून हल्ली..
वाहते सैराट किती रक्त येथे..

बुवाबाजीच्या नावाखाली
राजरोज चाले सट्टा येथे..
आंधळ्या भक्तांची आंधळी श्रद्धा..
अन देवाच्या नावाला बट्टा येथे...

करुनी सहन इतके...
तरीही मन मुर्दाड येथे...
पांडुरंगा, धाव आता...
पडले मोठे भगदाड येथे...
महेश.

दुष्काळ

पाय अनवाणी, पावले झपाझप
पोट खापाडीला, कष्ट वारेमाप!

हातात इकण, वार धरणीच्या पोटी
फुटतो दगड, कवा लागल पाझर?

भयान उन, लाही लाही जीव
अंगार झळया, कोण करीतं कीव!

उटली वावटळ, उडाला पाचूळा
घामेजल्या कमरत, ढसला पिसुळा!

उडाली पाटी, बाळ उघडा गोजिरा
खाट धरणीची, वर आसमंत सारा!

तान्हुला जीव, फोडी कर्कस बरडा
माय धावुनी येई, घेई मुका कोरडा!
रखरख उन्हामंदी तिचा आटला पान्हा...
फाटक्या पदराखाली जीव रडतो तान्हा!

गरीबाच्या जीवाला, भोग किती पच्चास!
कवा फिटल हे पाप, काय देवाजीच्या मनात?

महेश.

चूक कुणाची?

(१९५२ सालच्या सत्य घटनेवर आधारित, नावं बदलून)

महादू, शंकर अन त्यांचा बाप ग्यानबा...रोज दिवसभर काम करून सांच्या  पारीला घरी यायचे....रानात कायमची जागल असायची....तिघं मिळून रातचं जेवण उरकून मग पुन्यांदा कुऱ्हाडी हातात घेऊन रानात बैलाला पाणी-वैरण करायला, राकुळी  ठेवलेल्या कुत्र्याला भाकरी टाकायला जायचे....काम उरकून, शेकोटी पेटवून मग बाजूलाच हातरून  टाकून निजायचे...
महादू अन शंकर दोघं बी तरणेबांड  गडी...एकदा कामाला जुपले कि काम सुद्धा घाबरून जायचं...दोघा भावांनी मिळून येळवशी पासून शिमग्यापस्तोर हीर पाडून दाखवली होती....ग्यानबा आपल्या दोन्ही कर्तबगार पोरावर भारीच खुश असायचा....

जवारीचं नुकतच  खळं झालेलं...३-४ साठा ढीग लागलेला...राखणीसाठी रानात जागल ठेवणं जरुरीच होतं... ग्यानबा, महादू अन शंकर रातचं जेवण उरकून, कुत्र्यासाठी भाकरी घिउन रानात निघाले....अंधार किर्र झालेला...रातकिड्यांची किरकिरी..मधूनच एखादं कोल्ह अरुळी हाणायचं...दगडाच काळीज असलेल्या ह्या गड्यांना कशाची भीती? झप झप पावलं टाकीत निघाले...

रानात बैलाच्या चंगाळ्याची किणकिण घुमत होती...मालक आलेला बघून बैलाची लगबग सुरु झाली...ग्यानबानं  घोंगड बाजवर हातरलं अन अंग टाकून दिलं.. महादूनं बैल सोडून वड्याला  नेउन पाणी पाजून आणले...कडब्याच्या गंजीतून ४ पेंड्या  काढल्या, कुर्हाडीनं बारीक कापून बैलासमोर टाकल्या...डोळे मिटून भुकेलं जनावर गपागप  खावू लागलं!

शंकरच्या जवळ तीन कारवाणी कुत्रे गोंडा घोळू लागली...त्यानं भाकरी सोडून त्यांच्या समोर टाकली...
तोवर महादूनं त्याच्यासाठी अन शंकरसाठी जवारीच्या ढिगाजवळ  घोंगड हातरलेलं...दोघांनी थकलेलं अंग टाकून दिलं...आभाळातल्या चांदण्या बघत कधी झोप लागली कळलं नाही..

रात्र सरत होती...ग्यानबा गाढ झोपेत असताना त्याच्या कानावर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला....जागेवरून न उठता तो कानोसा घेऊ लागला...तीन चार माणसांचा वावर तिथं असल्याचं त्याला जाणवलं...अंधार्या रात्री त्याला नीट  काही दिसेना...बाजूला बघितलं तर शंकर अन महादू गाढ झोपलेले...कुणीतरी जवारीच्या ढिगाला हात घातला याचा त्याला अंदाज आला...आवाज न होऊ देत त्यानं शंकर अन महादुला जागं केलं...उशाला ठेवलेल्या कुर्हाडी हातात घेतल्या...हळू हळू पावलं टाकत पुढं सरकले...महादू ओरडला..."कोण हाय रं ढिगावर...आ?" तेवढ्यात शंकरच्या कमरेत कुणीतरी काठीचा वार केला...शंकर ओरडला..."महादू, इकडं हाय रं रांडेचं..." तेवढ्यात ग्यानबाच्या मिचकीत  एक काठी बसली...
अंधारात कुणाला काही दिसेना...

महादू ढिगावर तुटून पडला...हातातल्या कुर्हाडीनं जमेल त्या दिशेनं वार करू लागला...आणि एक चोर त्याच्या तावडीत गावला...मस्तक धरून कुर्हाड घातली डोक्यात....बेम्बीतून ओरडलं ...जागेवर मुडदा पडला...बाकीचे साथीदार आवाजच्या दिशेने धावून आले...दोघांनी महादूला धरलं...एकानं महादूच्या मस्तकात काठी घातली, शंकर ओरडू लागला....ग्यानबा न कुर्हाड उचलली,...शंकर धावून आला...अंधारात कुणाचा ताळमेळ कुणाला लागेना...शंकर ने सपासप वार केले...अजून एकजण कोलमडून पडला...ग्यानबानं कुर्हाड उगारली...एकाच्या पोटात घुसली..टराटरा पोट फाटलं...कोथळा  बाहेर आला...महादू मोठ्यांदा ओरडला...."आबा.....आआये ..."
कुणाच्या काय डोक्यात येयीना..अंधारात काय दिसंना ...बाकीच्या चोरांनी धूम ठोकली...क्षणात सगळीकड शांतता पसरली...

शंकर अंधारात हाक मारू लागला.."आबा....महादू...?" ग्यानबा पुढे सरसावला...पायाखाली मुडदा पडलेला....हातानं चाचपून बघितलं...शंकर शेकोटी तून जळकं लाकूड घेऊन परत आला.. तीन मुडदे पडलेले...
लाकूड तोंडाजवळ नेउन बघतो तर काय...महादू रक्तात माखून पडलेला...कळवळून ओरडला..."आबा..घात झाला..."
ग्यानबाची दातखीळ बसली..म्हातारं जागेवर बसलं...शंकरनं महादुला चाचपून बघितलं...जीव कधीचाच निघून गेलेला...

तांबडं  फुटलं...जवारीच्या ढिगावर रक्ताचा सडा सांडलेला.....ग्यानबाला गडबडून आलं...आपल्याच हातानं आपल्य्याच पोराचा जीव घेतला म्हणून म्हातारं बडवून घेऊ लागलं...शंकरनं म्हातार्याला जवळ घेतलं...अन सांगितलं..."महादुला चोरांनी मारलंय...तू न्हाय"
शंकरनं गाडी जुपली...तिन्ही मडे गाडीत घालून गावाकड नेले...पोलिस-पाटील पंचनामा झाला...शंकरनं घडलेली हकीकत सांगितली...महादुला चोरानीच मारल्याचं सांगितलं...पण खरं काय ते फक्त ग्यानबाच्याच जीवाला माहिती होतं...!

शंकरला खुनाच्या गुन्ह्याखाली २ महिन्याची शिक्षा झाली. म्हातार्याला सोडून देण्यात आलं...!

झाला प्रसंग म्हातार्याचा जिव्हारी लागला...म्हातार्यानं खानं-पिणं सोडलं....दोन-चार महिन्यात म्हातारं पार खचून गेलं...शंकर सुटला....बाहेर आल्यावर शंकरनं जमेल तसं  म्हातार्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला...पण पोराला मारल्याची जाणीव म्हातार्याच्या मनातून जाईना...!

अन एके दिवशी भर दुपारी म्हातार्यानं रानातल्या बाभळीला स्वत:ला टांगून घेतलं अन स्वत:च्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त केलं!

(महेश)

Changed Lives

When we met for the last time
Changed were your smiles
And changed were your expressions!
Changed were your touches
And changed were looks!

Was searching my cupid angel
In your shiny eyes,
She’s no more mine
I realized l’ll later
Changed was your attitude!

You hugged me for long
You kissed me allover,
And the second thought in your mind
Changed were your priorities!

Was begging for your every minute
And you were in hurry to leave,
Breaking all the promises
Changed was your time!

“Take Care” you said,
And left with the last smile!
You slept peacefully that night
Changed were your dreams!

You are always in my dreams
But I am nowhere in yours now,
You are always my life
But I am not yours now
Changed are our lives!

Mahesh



एकदा पहायचंय तुला...

एकदा पहायचंय तुला..
माझ्यावरती रुसताना
गोबरे गाल फुगवून
पुन्हा माझ्यावरती हसताना!

एकदा पहायचंय तुला..
गजर्यातील सुगंध हुंगताना!
मीच केसांत माळावा म्हणून...
वेडा हट्ट करताना!

एकदा पहायचंय तुला..
पावसामध्ये भिजताना!
टपोऱ्या थेंबांना
तुझ्या ओठांवरून ओघळताना!

एकदा पहायचंय तुला...
माझ्या मिठीत असताना...
गुलाबी गालावर तुझ्या
मोहक खळी खुलताना!

एकदा पहायचंय तुला
चांदण्या रात्री नाचताना..
माझ्या डोळ्यांमध्ये
स्वत:ला शोधताना!

एकदा पहायचंय मला
गर्दीमध्ये हरवताना...
अगदीच व्याकूळ होऊन
तू मला शोधताना!

एकदा पहायचंय तुला...
तू माझ्यासाठी जगताना!
एकदा पहायचंय मला...
मी तुझ्यासाठी मरताना!

महेश.

न लिहिलेलं पत्र

वाढदिवसाच्या तुला मनापासून खूप सार्या शुभेच्छा! तुझ्या आनंदी आणि हेल्दी आयुष्यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना केली आहे आणि करत राहीन.

तुझ्या वाढदिवसाच औचित्य साधून तुझ्यासाठी काहीतरी लिहिण्याचा मूड झाला माझा आणि मी लिहायला बसलो. पण नेमक काय लिहावं आणि नेमकं कुठं सुरु करून कुठे थांबावं हा मोठा प्रश्न पडलाय मला. तरीही प्रयत्न करून बघतो.

हे कधी, कसं, कुठे, कुणामुळे सुरु झालं काही कळलच नाही. अचानक भर उन्हाळ्यात येणाऱ्या अवकाळी पावसा सारखी तू माझ्या आयुषात आलीस आणि माझ्या ओसाड जीवनात थोडासा गारवा देऊन गेलीस. सदैव बंद असणाऱ्या माझ्या मनाचे दार तू अगदी मला न विचारताच उघडून अलगद आत जावून बसलीस. कुठे शिकलीस ही कला?
माझ्या मनात काय सुरु आहे हे देखील तुला माझ्या ओठांवर येण्या अगोदरच समजू लागले! मनकवडी झालीस तू!

तुझ्या डोळ्यांत बघणं मी मुद्दाम टाळत होतो! अगदी पहिल्यापासूनच! कारण तुझ्या त्या करारी नजरेत मला बुडवून घेण्याच सामर्थ्य होतं. आणि खरं तर मला भीती होती कि मी जर त्या डोहात बुडलो तर मला त्यातून कुणीही बाहेर नाही काढू शकणार! अगदी मला देखील ते अशक्यच होतं.

मेंदू आणि हृदय हे एकमेकांचे शत्रू असावेत. मेंदू जे करू नको म्हणेल तेच हृद्य करून बसते. आपलं बोलनं वाढलं, आपल्या भेटी वाढल्या. तुझ्या एका भेटीसाठी हजारो मैलांचा प्रवास अगदी क्षुल्लक वाटू लागला. तुझ्या सोबत काही तास घालवण्यासाठी जीव धडपडू लागला. सागराला नेमकं उधान यायला आणि मृग नक्षत्र सुरु व्हायला गाठ पडावी तसं काहीसं आपलं झालं. आपली वर्षभराची मैत्री आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबली. ते वळण पार करून गेलो तर दोन शक्यता जाणवू लागल्या. कदाचित प्रेमाचा नवीन प्रवास सुरु तरी सुरु होईल किंवा मग सुखद मैत्रीचा अंत तरी होईल. एकमेकांना मनसोक्त बोलल्याशिवाय दिवस जाईनासा झाला. अगदी सकाळी उठल्यावर गुड मोर्निंग पासून, ब्रेकफास्ट, लंच, दिनर ते गुड नाईट पर्यंतचे अपडेट्स एकमेकांना देऊ लागलो. फोनवर बोलण्यासाठी रात्र कमी पडू लागली. दोघांचे सारे सिक्रेट्स जे कि जगातील कोणत्याही व्यक्तीला माहिती नाहीयेत ते आपण एकमेकांना शेअर केले. ते देखील स्वत:हून! थोडासा दुरावा देखील मनाला अस्वस्थ करू लागला. जेव्हा तुझ्या मनाचा अंदाज घेतला तेव्हा तू देखील त्याच वळणावर येऊन त्याच दोन शक्यता मनात घेऊन थांबली आहेस असं जाणवलं.

दोघानाही कळून चुकलं होतं कि आता आपण मैत्रीची रेषा ओलांडतो आहोत. आणि तू शेवटी विचारलस, “आपण प्रेमात तर नाही ना पडलो?” तुझ्याकडूनच हा प्रश्न आल्याने माझं मन थोडं हलकं झालं! तुझ्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देण्याचं काही कारण नव्हतंच, पण “हो” म्हणण्याची डेअरिंग देखील माझ्यात नव्हती.
अजूनही आठवतो आपला तो फोन वरचा पूर्ण संवाद!
“सांग ना, आपण छान फ्रेंड्स आहोत, आपल्याला इतरही छान फ्रेंड्स आहेत, त्यांच्याविषयी असं कधीच नाही वाटलं, पण तुझ्याशिवाय एक क्षण देखील करमत नाही. आपण एकमेकांच्या प्रेमात तर नाही न पडलो?”
 “तुला काय वाटतं?” तुझ्या मनाचा अंदाज घेत मी.
थोडासा पौझ घेऊन, “मला वाटतं आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय!” तू.
हे देखील तुझ्याकडूनच ऐकायला मिळाल्याने माझं मन अगदी ढगात जावून बसलं!
“बहुतेक. कारण आपला दिवस सुरु होतो एकमेकांपासून आणि संपतो देखील एकमेकांसोबतच. तुझ्या प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचे तुझ्याकडे अपडेट्स असतात. असा एकही दिवस मागच्या वर्षात नाही गेला कि आपण त्या दिवशी बोललो नाही. दोघांच्या आवडी-निवडी जरी सारख्या नसल्या तरी त्या एकमेकांना माहिती आहेत. दोघांचे चांगले-वाईट गुणही एकमेकांना माहिती आहेत. दोघंही मनसोक्त भांडतो आणि मग तितक्याच प्रेमाने एकमेकांना समजावून सांगतो. दोघानाही आता स्वत:पेक्षा एकमेकांची जास्त काळजी वाटते, प्रेम यापेक्षा जास्त काही वेगळे नसावे! होय, आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय, आणि आज नाही, तर खूप पूर्वी. फक्त आता त्याची जाणीव झालीय आपल्याला!” मी.

तर अशा प्रकारे, आपण प्रेमात पडलोय ते एकदाचं कन्फर्म झालं! इतर कपल्स सारख आपल्यात काही घडलंच नाही. ना फॉर्मल प्रपोज, ना लव लेटर ना कुठला प्रसंग! पण प्रेमात मात्र पडलो खरं!
आता ओढ लागली ती त्या हजारो मैलांच्या प्रवासाची आणि तुझ्या भेटीची. माझ्या पहिल्या-वहिल्या प्रेयसीच्या भेटीची!

गारठा हिवाळा. रात्रीची बस पकडून १४ तासांच्या प्रवासानंतर अगदी सकाळी तुझ्या शहरात मी दाखल, तू अजून पहाटेची गोड स्वप्न बघत झोपलेली, मी माझ्या मित्राकड जावून त्याला भेटून नंतर हॉटेलवर राहण्याचं माझं  ठरलेलं, पण तुझ्या शहरात येऊन पहिल्यांदा तुला न भेटन, माझ्या मनाला पटलं नाही!
सकाळी ७ वाजता दाट धुक्यात, तुझा तोंडी सांगितलेला पत्ता आठवून, रिक्षा तिकडे वळवली. तुला फोन लावला आणि तुला बोलावून घेतलं, तू डोळे चोळत खाली आलीस. पहिल्यांदा माझ्या प्रेयसीला भेटतोय, ते पण अंघोळ न करता, आणि तू पण! प्रचंड थंडी, त्यात तू स्वत:ला आकडून माझ्यासमोर हसत उभी, केस थोडेसे विस्कटलेले, पण तुझं ते अगदीच नजर खिळवून ठेवणारं नैसर्गिक सौंदर्य, मला माझ्या मनावरचा ताबा तोडण्यास मजबूर करत असल्यासारखं जाणवलं. का कुणास ठावूक, पण इतक्या सकाळी तुझ्या ओठांवर किस देण्याचा मोह मला झाला. पण मन मारून कंट्रोल केलं स्वत:ला!
आता एवढ्या सकाळी काय बोलणार तुझ्याशी? मग शेजारच्या टपरीवर वाफाळलेला चहा तुझ्याकड पाहत ३ वेळेस पोटात रिचवला. दोघांची पण प्रेमात पडण्याची पहिलीच वेळ असल्यानं आता नेमकं काय करतात या कुचम्बनेत  आपण दोघेही सापडलो. उगाच अरसिक विषयावर तुटक तुटक बोलू लागलो.
“चल आपण थोडसं फिरून येऊया?” तू.
साला हे मला का सुचलं नाही विचारायचं?

ब्याग त्या चहाच्या टपरीवर ठेवून, निर्मनुष्य रस्त्यावर दाट धुक्यात आपण दोघे चालू लागलो. का कुणास ठावूक, पण मैत्रीची रेषा ओलांडल्या नंतर आणि नवीन नात्यात पदार्पण करताना कुठेतरी थोडी संकोचाची दरी निर्माण झाल्यासारखं वाटलं! तुझ्या खांद्यावर टाकण्यासाठी उचललेला हात ३ वेळेस तसाच खाली घेतला. खूप चाललो ना आपण त्यादिवशी? चालता-बोलता अर्धा तास धुक्यात फिरल्यावर नवीन नात्यातील ती दरी अचानक कुठेतरी गायब झाल्यासारखं आणि मैत्रीतील ती खोडकर प्रवृत्ती अजूनही पूर्णपणे जिवंत असल्याची प्रचीती आली.

नंतर आपल्या कित्येक भेटी झाल्या, किती फिरलो, खूप सार्या आठवणी जमा केल्या, प्रेमात अक्षरश: बुडून गेलो, भांडण, रुसवा, फुगवा, सारं काही करून आजही आपली मैत्री आणि प्रेम उत्तरोत्तर वाढतच आहे. अजूनही मी तितक्याच ओढीने तो हजारो मैलांचा प्रवास करतोय, आणि तुही तितक्याच ओढीनं सकाळी डोळे चोळत मला भेटायला येतेस! प्रत्येक सकाळी मला तू पूर्वीपेक्षा सुंदर भासतेस, आणि तुझ्या त्या स्माईल वर तुझा एक किस घेण्याची अजूनही माझी तितकीच प्रबळ इच्छा होते.

कसल्याही टेन्शन मधून अगदी दहा मिनिटात तुझ्याशी बोलून मी बाहेर निघतो, माझा ऑफिस मधला स्ट्रेस तुझं निखळ हास्य ऐकून कमी होतो, तुझ्या मिठीत मी सारं जग विसरून जातो! तुझ्या मिठीतच आयुष्य संपून जावं असंही मला कित्येकदा वाटत! खरच जर तसं काही झालं तर माझ्यासारखा सुखी दुसरा कोणी नसेल! (मला माहितीय हे वाचून तू मला मनात दहा-बारा शिव्या दिल्या असशील आता, असो.)

हे सगळं असंच चालत राहावं असं मनोमन वाटत राहतं नेहमी. आपलं पुढे लग्न होईल, नाही, काही माहिती नाही, पण जो वर्तमान आपण जगतोय तो खरच खूप छान आहे. भविष्यातही हा वर्तमान असाच राहावा!

शेवटी, काळत-नकळत माझ्याकडून बर्याच वेळा तुला हर्ट झालं असेल, पण त्यामागे केवळ तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तुझी वाटणारी काळजी हेच कारण होते, आहे आणि असेल. माझ्यावर असच निरंतर प्रेम करत राहा. अगदी माझ्या पेक्षाही जास्त!

या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण का कुणास ठावूक, तुला त्या सांगण्याची इच्छा झाली, आणि म्हणून हा सगळा लिहिण्याचा प्रपंच-पसारा!

भेटू आता गुरुवारी सकाळी. त्याच ठिकाणी, नेहमीसारख!

स्वप्न..

बाहेर धो धो कोसळणारा पाउस,
अशा मुसळधार पावसात
तुझ्या सोबत केव्हातरी
चिंब भिजण्याची स्वप्न
ऑफिस मध्ये बसून रंगवणारा मी,
आणि याची पुसटशीदेखील कल्पना नसलेली तू!

एवढं छोट आणि साधं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला भेटायला तुझ्या गावी येतो, आणि नेमकं तेवढे दोन दिवस मला आवडणारा, माझा वाटणारा तो पाउस तुझ्या गावातून काढता पाय घेतो! मी कोरडाच राहतो!

बघता बघता हाही पावसाळा सरून जाइल!
सोबत भिजण्याचं ते स्वप्न देखील पुढच्या पावसाळ्या पर्यंत मागे पडून जाइल!

मन वेडं, लगेच येणाऱ्या हिवाळ्यातील दाट धुक्यात तुझा हात हातात धरून फिरण्याची स्वप्नं रंगवू लागेल!
मागच्या हिवाळ्यातल्या सारखं!

तुला पडतात का अशी छोटी छोटी वेड्यासारखी स्वप्न?

आदत

तुम्हारी आदत हुई है या दुनिया से नफरत पता नहीं।

तुम्हे छोड़ दू या दुनिया, बात तो एक ही है!

एक मौका

रोज तुम्हारी राह देखकर थक गये है हम,
सोचते है अब राह देखने का एक मौका तुम्हे भी दे दें..जिंदगीभर के लिए।

मै नही तो कोई और सही

तिला आवडतं पावसात भिजायला!
बेधुंद पावसात मनसोक्त नाचायला!

नेहमी म्हणायची,
"येणाऱ्या पावसाळ्यात आपण दोघं मिळून मस्त भिजूया…
एकमेकांना मिठीत घेऊन पावसाचे थेंब तळहातावर झेलुया! "

मन वेडं…लगेच लागलं स्वप्न रंगवायला!

तो कुणीही असो… तुझं स्वप्न पूर्ण झालं ना… बस्स!
मै नही तो कोई और सही! चलता है यार!

गारा

अनेकदा पाहिलंय तुला...धुंद कातरवेळी...पावसात भिजताना...
त्या ढगांखाली उभी असतेस...एखाद्या विद्युल्लतेसारखी...
शुभ्र...नितळ...धवल...
अन वळीव बरसत असतो तुझ्यावर...
एखाद्या शुभ्र प्राजक्तासारखा...
म्हणूनच लोकांना...
तुझ्या काव्यातून...गारा बरसल्याचा भास होतो...
आणि तुझ्या ओंजळीत विरघळनाऱ्या गारांत काव्य दिसतं!

Mantralay on Fire

लागली आग, उठला धूर...
बघ्यांच्या मनी, माजले काहूर...

जळाला ऐवज, जळाल्या फाईली...

जवानांच्या जीवाची काहिली काहिली...

मजल्यावर मजला, खाक झाला आगीत...

महाराज बोलले, हे माझेच भाकीत!

बुडाखाली आग, राजा असा कसा झोपला?

सुरक्षेचा दोर याच्या हाती आम्ही दिला !

जनता जनार्धन, कधी उघडील डोळे...

किती दिस लुटणार, आम्हा मंत्री हे "भोळे"...

पुंण्याची गंगा यांच्या, झाली रातोरात कोरडी...

मंत्र्या संत्र्याची परी, कधी उठेना तिरडी!

महेश....

"कुसळधार" आणि "मुसळधार"

गावाकडची बातमी: "सलग १८ तास "कुसळधार" पाउस पडला....आणि रस्त्याच्या कडेचे खड्डे तेवढे भरले."
आता सरकारने १८ तास पाउस पडला या निकषावरून जाहीर केलेला दुष्काळ "क्यान्सल" करू नये म्हणजे झालं!!
"कुसळधार" आणि "मुसळधार" मधला फरक सरकारला समजेल अशी आशा आहे.

....!

उधाणलेला समुद्र
आणि खवळलेली लाट...
पौर्णिमेचा चंद्र 
आणि सरत जाणारी पहाट!

आता तो समुद्रही शांत,

अन ती लाटही विरलेली!
अमावस्येचा काळोख 
अन ती रात्रही मंतरलेली!

महेश.

शेती व्यवसाय

माझ्या वडिलांनी सन १९७७ साली MSc Agri (MPKV Rahuri) पदवी मिळवली, आणि कित्येक संधी अक्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध असताना देखील स्वत:ची शेती करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. अगदी घरच्या लोकांपासून ते गावातल्या प्रत्येकाने त्यांना वेड्यात काढले, कारण त्या काळात आमच्या पंचक्रोशीत एवढे शिकलेला एकमेव माणूस एवढे शिकून पुन्हा शेतीत कशाला परत येतोय हे कुणाला कळाले नाही. वडील त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. वेगवेगळे प्रयोग करून, नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती फुलवली. दरवर्षी विविध पिके घेतली. भरघोस उत्पन्न काढून दाखविले. शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शरद जोशींसोबत अख्या महारष्ट्रात शेतकरी संघटनेचे बरीच वर्षे नेतृत्व देखील केले.
पण शेवटी शेवटी सरकारी धोरणे, निसर्गाने सोडलेली साथ, वाढलेले रोजगार भाव यांच्यामुळे एवढी चांगली शेती तोट्यात येऊ लागली.
दरम्यान मी स्व-इच्छेने मराठवाडा कृषी-विद्यापीठात कृषी-अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि वडिलांना "माझा तांत्रिक शेती करण्याचा मानस" कळविला. कारण MMBS करून मुले स्वत:चा दवाखाना सुरु करतात, BE करून छोटी-मोठी फ्याक्टरी टाकतात, MBA करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतात, मग Agriculture course करून मुले शेती का करत नाहीत? हा प्रश्न मला सतावत राहायचा.
वडिलांनी सर्व परिस्थितीचा विचार करून स्पष्ट शब्दात "नाही" म्हणून सांगितले. कसली का असेना पण मी नौकरीच करावी असे त्यांचे मत होते. आणि त्यात त्यांच्या दृष्टीने चूक काहीच नव्हते. कारण शेतीची ढासळत चाललेली अवस्था त्यांना, मला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होती. आणि त्यात एवढे शिकून मी पुन्हा शेतीत येणे म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतण्यासारखे होते. शिवाय त्यांनी हे सर्व स्वत: अनुभले असल्यामुळेच तर ते एवढ्या ठामपणे नको म्हणून सांगत असावेत.
सारासार विचार करून मग मी काही दिवस एका मायक्रो इरिगेशन कंपनीसाठी काम केले, नंतर उच्च शिक्षणासाठी बंगलोरला आलो. आणि M.Tech. करून पुन्हा नौकरीच करतोय. पण शेती करू शकलो नाही याची खंत अजूनही माझ्या आत कुठेतरी सलत राहतेय.

आणि आज जेव्हा मी गावी जातो, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचा हाच विचार झालेला दिसतोय, कि त्याच्या मुलाने शेती करू नये. आदळत आपटत शिकून, शिपायाची का मिळेना, पण नौकरीच करावी. पुढील २५ वर्षानंतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भयानक कमी होईल यात शंका नाही.


खरच शेती व्यवसाय करणे एवढे लाजिरवाणे आणि कनिष्ठ दर्जाचे झाले आहे का?

फक्त ऊसच का?


भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण इतिहास आणि भूगोलात अगदी चौथी-पाचवी पासून वाचत आलो आहोत. भारतीय शेतकरी जगातील सर्वात जास्त पिके घेतो, शिवाय भारतीय जमीन हे पेराल तेथे सोने उगवणारी जमीन आहे असे देखील म्हणतात. पण हे सर्व पुस्तकात वाचण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. खरी परिस्थिती खूप वेगळी आहे.

भारतात हजारो वर्षापासून घेतल्या जाणार्या पिकांमध्ये ऊस हे एक महत्वाचे पीक आहे. असे असले तरी ऊस हे भारतीय शेतीकर्याचे प्रमुख पीक कधीच नव्हते. मग असे काय घडले कि आज ऊस हे पीक भारतीय शेतीचा अविभाज्य घटक बनले?
आपण या ठिकाणी माझ्या एका गावाचा विचार करूया, त्यावरून मग आपणास पूर्ण भारतातील किंवा कमीत कमी महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज येयील.
१९७१-७२ साली माझ्या ४ हजार लोकसंख्येच्या गावात फक्त ४ शेतकर्याकडे विहिरी होत्या, त्यातील तिघांकडे सिंचनासाठी मोट वापरली जायची आणि एका शेतकर्याकडे (आमच्याकडे) क्रूड ओईल वर चालणारे इंजिन होते. तर हे चार शेतकरी फक्त पाण्याची शेती करत आणि यांच्याकडे एकूण १५-२० एकर ऊस होता. इतर क्षेत्र निव्वळ ज्वारी, हरभरा, तूर, गहू अशा रब्बी पिकाखाली असायचे. खरीप हंगामात सहसा पिक घेत नसत.
त्याकाळात ऊस हा फक्त गुळ बनवण्यासाठी वापरला जायचा, साखर नावाचा प्रकार अद्याप या भागात अस्तित्वात आलेला नव्हता. दरम्यान या भागात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, तत्कालीन सुशिक्षित पुढार्यांनी शेतकर्यांना सहकाराचे महत्व पटवून दिले, शेअर्स जमा केले, शेतकर्यांना ऊस लावण्यास प्रोत्साहित केले, शिवाय इतर पिकांपेक्षा उसाला चांगला भाव देऊ केला, आपसूक गावातील विहिरी वाढल्या, मोट वाढल्या, इंजिन वाढले. १९८५ साली गावात पहिले बोर पाडले गेले. १९९० पर्यंत गावात २०० बोर पाडले गेले. ऊस क्षेत्र ५०० एकर पर्यंत गेले. ऊस या नगदी पिकामुळे शेतकर्यांना बर्यापैकी उत्पन्न मिळू लागले, आणि आपसूक परिसरातील सर्व शेतकरी ऊस लागवडीसाठी धजू लागले.
२००० सालापर्यंत परिसरात १० साखर कारखाने उभे राहिले, कारखान्यात स्पर्धा लागली, शेतकर्यात स्पर्धा लागली. एकट्या गावाचे उस क्षेत्र ५००० एकरच्या वर गेले. गावात २००० पेक्षा जास्त बोर पाडले गेले. पाणी पातळी १०० फुटावरून ६००-७०० फुटावर गेली. ऊसामुळे इतर खरीप रब्बी पिके मागे पडली. रोजगाराचे भाव वाढले. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रमाणाबाहेर पाणी आणि रासायनिक खते वापरण्यात येऊ लागली. सलग १०-१० वर्षे एकाच जमिनीत उस घेण्यात येऊ लागला. जमिनीचा कस खालावला. सुरुवातीस एकरी ६०-७० टन निघणारा उस २००५ पर्यंत ३५-४० टन निघू लागला. शिवाय सहकारात राजकारण सक्रीय झाले, भ्रष्टाचार सुरु झाला, संचालक आणि कार्यकारी मंडळीनी आपले खिसे भरून घेतले. उसाचे भाव स्थिर झाले, कारखाने डबघाईला येऊ लागले.१९९०-२००५ या काळात खासगी कारखान्यांचा जन्म झाला. पुन्हा भाव देण्यासाठी स्पर्धा, शेतकऱ्यांची स्पर्धा. यामुळे महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्र झपाट्याने कमी झाले. द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्री, चिकू घेणारे बहुतांश शेतकरी उसाकडे वळले. कांदा, मिरची आणि इतर भाजीपाला घेणारे शेतकरी देखील उसाकडे वळले. मराठवाड्यातून ज्वारी, हरभरा आणि गहू हि पिके संपुष्टात आल्यात जमा झाली.
२०११ सालापर्यंत परिसरात १६ साखर कारखाने उभे आहेत. गावात ५००० च्या आसपास बोर पाडले आहेत. पाणी पातळी ९०० ते १००० फुटावर गेली आहे. दर वर्षी किमान ३००-४०० बोर नवीन पडत आहेत. पैकी ५०-६० बोर ला पाणी लागते आणि इतर सारे फेल जात आहेत. भू-गर्भाची अक्षरश: चाळणी झाली आहे. अगदी २०-२५ फुटावर ३-४ बोर झाले आहेत. पर्जन्य कमी झाले आहे, उस उतारा आता केवळ २०-२५ टन प्रती एकर झाली आहे. खताच्या किमती गगनास भिडल्या आहेत. रोजगार देखील खूप वाढला आहे. उस पिक तोट्यात येऊ लागले आहे.
२०१२ म्हणजेच चालू वर्षी पर्जन्य खूपच कमी झालं आहे, आणि उस या पिकावर अवलंबून न राहता मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन या खरीप पिकाकडे, आणि हरभरा व कांदा या रब्बी पिकाकडे वळला आहे. किंबहुना सोयाबीन हे पिक यावर्षी उसापेक्षा फायदेशीर ठरले आहे. आणि २०१३ या साली उस क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत केवळ २० टक्के इतकेच राहील कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. डाळिंब, चिकू आणि मोसंबी फळबाग क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. आणि या परिस्थितीचा अंदाज आल्याने पुन्हा खासगी साखर कारखान्यात भाव देण्यावरून कमालीची स्पर्धा लागली आहे.
हे चित्र आहे फक्त माझ्या एका गावाचे. आणि हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ऊस या नगदी पिकामागे धावताना महाराष्ट्रातील “काळी कसदार मृदा”(Black Cotton Soil) हि गोष्ट आता नामशेष झाली आहे. अमाप रासायनिक खते आणि औषधांच्या वापरामुळे जमिनीचा पोत, कस, दर्जा, आणेवारी अगदी निकृष्ट झाली आहे. पाण्याची सरासरी पातळी ६००-७०० फुट इतकी खालावली आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी हि मूळ मराठी पिके काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आणि शेवटी एवढ सगळं होऊनही शेतकरी मात्र जिथल्या-तिथंच आहे, आणि यामुळे मनात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आज तो रस्त्यावर उतरला आहे, आणि सरकारी बंदुकीचा शिकार झाला आहे. अजून दहा वर्षांनी महाराष्ट्रातील शेतीचे काय आणि कसे चित्र असेल देवच जाणो!
झालेल्या प्रकारात सरकारी धोरणांची आणि सहकारी-खासगी कारखान्यांची जेवढी चूक आहे तेवढीच चूक शेतकर्याची देखील आहे!
Mahesh Haul Patil, बंगळुरु.

डोंगरमाथा

क्षितिजापलीकडे, नजर जाइल तिथपर्यंत किंवा त्याच्याही पलीकडे पसरलेल्या डोंगररांगा...त्यातल्याच डोळे बंद करून बोट ठेवून निवडलेल्या एका ओबड-दोबड डोंगराच्या माथ्यावर...सूर्यास्ताच्या वेळी...सौम्य आणि थंड वार्याच्या झुळुकी अंगावर झेलत...त्या मावळणाऱ्या, लालबुंद, एकाकी सूर्याकडे पाहत उभे असताना, मनात एकामागून एक, भूतकाळातील काही क्षणचित्रे येणं आणि मन कधी अस्वस्थ होणं तर कधी नकळत ओठांवर स्मित हास्य खुलून जाणं साहजिक आहे...त्याला आवडतं असं कधी कधी डोंगर माथ्यावर जावून किंवा समुद्र-किनार्यावर जावून एकांत अनुभवनं! या रहाटगाडगी व्यस्त जीवनात, आपल्या आयुष्यात कधीकाळी येउन गेलेल्या काही व्यक्ती पण काळाच्या ओघात पडद्याआड हरवून गेलेल्या...त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण पुन्हा आठवायला!
त्या आठवणीच्या गाठोड्यातील काही क्षण पुन्हा एकदा तेवढीच कळ काळजात उठवून जातात, काही मात्र पुन्हा ओठांवर हसू परत आणतात!
यावेळी मात्र तो एकटा नव्हता...त्याच्या "ती" होती, त्याची सर्वात आवडती व्यक्ती...तिच्यासोबत असताना एकांत वगैरे शब्द त्याला टोचतात, नकोसे वाटतात, पण ती सोबत नसताना मात्र एकांत काय असतो याची त्याला तीव्रतेने जाणीव होते, जीवाची एक वेगळीच घालमेल होते! दुर्दैव ते किती, दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी, पण केवळ सामाजिक बंधनांमुळे आयुष्यभरासाठी ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत! पण त्यांच्या मनाची तयारी आहे, जे क्षण आपले आहेत ते तरी आपण सोन्याचे करूया, जगून घेऊया त्या मुठभर क्षणांत...जमेल तसे!
यावेळी या डोंगर माथ्यावर मात्र त्याला जाणवले, "आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, क्षणभराच्या भेटीतच आयुष्यभराचे होतात!"
कारण यावेळी तो एकटा नव्हता... आज त्याच्यासोबत "ती" होती! आणि आज पहिल्यांदाच त्याला जाणवले कि मावळणारा सूर्यही एकटा नसतो, त्याच्या सोबत एक रम्य सायंकाळ देखील त्याची सोबत करत असते!

(माझ्या "डोंगरमाथा" या अर्धवट राहिलेल्या गोष्टीतून...)

येशील का

एक पत्र:
प्रिय XXX

बरेच दिवस झाले... किनार्यावर गेलोच नाही...अगोदर जायचो...उभा राहायचो बराच वेळ क्षितिजावर नजर रोखून...मनातल्या मनात ओरडून स्वत:लाच प्रश्न विचारायचो...आणि स्वत:च निरुत्तर व्हायचो! किनार्यावरच्या गर्दीत, उसळणार्या लाटांच्या आवाजात एकांत अनुभवायचो....तेव्हा सागराच्या विशालतेसमोर माझा एकांत क्षुद्र वाटायचा....आणि मग बराच वेळा नंतर, सूर्य बुडून गेल्यावर मन हलकं व्हायचं! 

पण तू आयुष्यात आल्यापासून एकटेपणा काय असतो तेच विसरलोय बहुधा! म्हणूनच कि काय समुद्र किनार्याची साधी आठवण देखील आली नाही मागच्या काही महिन्यात! बहुधा त्या मनात कोंडलेल्या प्रश्नाचं तूच उत्तर होतेस, जे आजवर मी शोधत होतो!
आज किनार्यावर जावसं वाटतंय...तुझ्यासोबत!
मस्त हातात हात घेऊन, किनारा संपेपर्यंत, दोघांच्या पावलांचे ठसे वाळूवर अलगद उमटवत चालत रहावस वाटतंय! तुझ्या स्पर्शासोबत आज जाणवून घ्यायचेत ते लाटांचे स्पर्श...अनुभवायची आहे ती गर्दी...भिजून जायचंय तुझ्यासोबत...त्या उसळणार्या लाटांमध्ये!
येशील का कधी माझ्यासोबत...किनार्यावर..!

तुझाच,

ABC

आम आदमी

आम आदमी-अरविंद केजरीवाल यांची अवस्था बघून सुचलेल्या ओळी..

भुंकती श्वान त्वेषाने, आवाज क्षीण झाला...

शब्दांत आज त्याच्या, ती धार राहिली नाही!

पोटात आग झाली, मीडियाची मुक्ताफळे,

भाजून घेती भाकरी, त्यांना लाज राहिली नाही!

महेश

महादू

मिरगाचा पह्यलाच पाउस निब्बर पडला... वडा पह्य्ल्याच पावसात वाहून गेला..रानात चांगला वापसा झालेला...वल खोलवर गेली...पेरणीचा मोसम सुरु झाला...महादू अन त्याचा तरणाबांड पोरगा नागू पेरणीच्या तयारीला लागले..

राज्या बाज्या गाडीला जुपले...राज्या थोडा आता थकला होता....महादूच्या रानात अशा कित्येक पेरण्या आपल्या खांद्यावर त्यानं पार पाडल्या होत्या... बाज्या अजून नवीन खोंड होतं...तिफन, जू, दांडी, कासरा, चाबूक, झोळी, बी, खात अन दुपारच्या भाकरी बैलगाडीत घालून निघाले रानाकड...
नागूनं तंबाकू मळली अन थोबाड उघडून चिमुट मध्ये सरकवत बोलला,
“आज दोन एकरचा फड कसं बी करून पेरूनच काडू..”
महादू आपला वाटेने जाताना लोकांनी काय पेरलय काय नाय बघत होता.

बाभळीच्या झाडाखाली गाडी सोडली. जू, दांडी, तिफन जुपली. तीफनीचे नळ व्यवस्थित लावले. येसन अन कासरा तपासून बघितला..
नागूनं एका झोळीत सोयाबीनच बी काढलं अन दुसर्या झोळीत खात काढला. खताची झोळी महादूच्या गळ्यात अडकवली, अन बियाची झोळी स्वत:च्या गळ्यात अडकवली.

रानात नळ खुपसले, पुढे नागू तिफन घेऊन मागे महादू खताचे नळ घेऊन...ओंजळीत बी आणि खात घेतला...नागूनं चाबूक उगारला...”हर्र्र्रर्र...चल राज्यां...बाज्या....” तिफन हलली...पहिलं मुरडण पडलं.
बी चांगलं पडत होतं. एका पाठोपाठ एक मुरडण येऊ लागलं. राज्या बाज्या जोर लावून तिफन वडू लागले. दुपार होईपर्यंत अर्ध रान पेरून निघालं.

पुढचं मुरडण अर्ध आलं, अन नेमक राज्यानं मान टाकली, अन बैल जाग्यावर बसलं. तीफनीचा जू निसटला, कासरा सुटला. तिफन थांबली. नागूनं चाबूक उचलला अन राज्याच्या पाठीवर तीन चार वळ उमटले...
“ह्र्रर्र्र्र...उठ...हर्र्र्रर्र..उठ...राज्या..” एकावर एक वळ उठू लागले...बैल काय उठायला तयार नाही...
“आं राज्या....तुझ्यातर आईचा...xxxxxxx” शिव्यावर शिव्या अन वळावर वळ उठू लागले.

महादूने गळ्यातली झोळी सोडली.
“अर्र भुकेजल असन ते, सकाळधरून जुप्लाय...थकल असन ते..” महादू.

“ह्याच्या आयला....ह्याला काय झालं थकायला..दोन टायमाला खापरी पेंड, आमून अन जवारीचा कडबा हाय कि खाद्गीला...” नागू...

“ह्र्रर्र्र्र...उठ...हर्र्र्रर्र..उठ...राज्या..” कातडी वर वळ दिसू लागले. महादूचा जीव तुटू लागला. नागुला जेवढ प्रेमानं संभाळल होता तेवढाच प्रेमाने त्यानं बैलाला संभाळल होता.

“आर त्यला बसू दे कि थोडायेळ...काय जीव घेतो का त्याचा? गवत खावून पोट-बीट दुखत असन तेचं..” महादू.

“सतरा बर्या सांगितलं व्हतं नवं बैल घिऊ ह्या पेरणीला...असलं म्हातारं जीत्राप घिऊन निघाले पेरायला...आता घी ह्याला उरावर...” चाबूक काय थांबत नव्हता.
“उद्याच मूरडच्या बाजारात न्हीउन खटकाची भरती करून टाकतो...ह्याच्या मायला ह्याच्या...”

महादुला वाईट वाटलं. बैलाच्या पाठीवरचा प्रत्येक वळ त्याला स्वत:च्या पाठीवर बसल्यासारखा वाटत होता. तळमळ सहन होईना.
बैलाच्या जवळ जावून पोटाला हात लावून बघितल. बैल केविलवाण्या नजरेने त्याच्याकड बघू लागलं.

महादूनं जोडा घातला, अन तडक गावाकड निघाला. जावून जनावराच्या डॉक्टरला सगळी हकीकत सांगितली. डॉक्टर ने दोन गोळ्या दिल्या.

नागूने तोवर चाबकाने बैलाची पाठ सोलून काढली. बैल काय जाग्यावरून उठलं नाही. शेवटी वैतागून भाकरी सोडली. पोटभर खावून झाडाखाली लोटून दिलं.

तोवर महादू आला, त्याच्या उरलेल्या भाकरीत गोळी घालून राज्याला खावू घातली. ओंजळीत पाणी घेऊन त्याला पाजलं.

त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कातडी सरसरली. चाबकाचे वळ बघून महादूचा जीव खालावला. डोळ्यातून पाणी आलं.

नागू उठला. उठताच बैलाला अन महादूला दोन चार शिव्या हासडल्या. महादू निपचित बैलाजवळच बसून होता.

थोड्या वेळाने बैल, खेकरून पायाने जमीन उकरू लागलं. महादूने ओळखलं..पोट दुखत होतं त्याचं.
बैल जागेवरच पातळ हाग्ल. थोडावेळ बसलं अन मग अंगात तरतरी आल्यागत ताडकन उठलं. स्वत:च मान खाली घालून जू मानेवर घेतला अन नागूकड बघत उभं राहिलं.

आदत

तुम्हारी आदत हुई है या दुनिया से नफरत पता नहीं।
तुम्हे छोड़ दू या दुनिया, बात तो एक ही है।

राह

रोज तुम्हारी राह देखकर थक गये है हम,
सोचते है अब राह देखने का एक मौका तुम्हे भी दे दें..जिंदगीभर के लिए।

सांग सखे..



डोळ्यांतील ते अगाध भाव, वाऱ्यापरी वाहतात का?
कधी कधी सुगंधापरी तुझ्या मनाला भिडतात का?

मनातल्या अथांग इच्छा, पावसापरी बरसतात का?
कधी कधी टपोर थेंब , तुझ्या गालावर ओघळतात का?

हृदयातील लुप्त भावना, इंद्रधनुपरी गंधाळतात का?
कधी कधी उधळून रंग,या चेहऱ्यावर खुलतात का?

विरलेल्या त्या नजरा, वळणावरी खिळतात का?
शुष्क डोळ्यांमध्ये सखे, आठवणी माझ्या दाटतात का?

महेश.

Little Boy n Soul


Oh Little boy...
Asked his soul,
Why u so sad?
What makes u upset?
Why ur eyes salty?
Where lost ur smile?
Why ur days boring?
Where are ur dreamz?

Little boy confused! (sigh)
Replies silently..
"I lost everything..in loneliness"

Soul says..
"Don't worry Macha...I'll b with u...forever.!"

Mahesh.

असंच..

तुझ्या प्रेमाच्या पावसात सख्या
आज मला भिजू दे..
काहिली झाली या जीवाची..
ही आग आता विझू दे!

सैरभैर मन हे माझे
आता हात तुझा धरू दे..
जगले आजवर निर्थक..
आता तुझ्यासाठी मरू दे!
महेश.

दुष्काळ, राजकारण आणि शेतकरी.


सद्य परिस्थितीवर विचार करून मनात आलेले काहीही विचार..

दुष्काळ...
महाराष्ट्र आणि मुंबई या दोन गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची अधोगती चालूच राहील. आज आपले राजकीय नेते मुंबईत बसून महाराष्ट्राचा रथ हाकतात. मुंबईत पाउस जास्त झाला कि अक्ख्या महाराष्ट्रात पाउस जास्त आहे अशी बहुतेक नेत्यांची मानसिकता दिसते.
ज्यांचा जन्मच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालाय ते कशाला जातील खेड्या-पाड्यात? त्यांना काय माहिती "जमीन" म्हणजे काय? त्यांना कसे कळणार उन्हाळ्यात तळपून निघालेल्या जमिनीला किती पाउस लागतो? त्यांना कसे कळणार कोणते पिक केव्हा घेतात, त्याला किती पाणी लागते, कसले हवामान लागते, कोणत्या पिकावर कोणता रोग पडतो? या-त्या शासकीय विभागाकडून पाहणी करवून घेऊन, नको ते वेडे-वाकडे अंदाज बांधून, नको ते निष्कर्ष लावून अहवाल सादर करणारे हे मूर्ख नेते आणि शासकीय अधिकारी! दुष्काळाची झळ काय असते ती हेलीकॉप्टर, ए.सी. गाडी मध्ये फिरून बघून कशी कळेल? त्यासाठी घ्यावा लागतो जन्म एखाद्या शेतकऱ्याच्या घरी. फिरावं लागतं रानोमाळ एक घागर पाण्यासाठी, झिजवावे लागतात सावकाराचे उंबरे मृगाच्या पावसात पेरणीसाठी, पाहावे लागते जळताना हाताशी आलेले पिक- तहानलेले एका पावसासाठी!
ज्या गायीचे दुध पिऊन लहानाचे मोठे झालो, ती गाय चार्यावाचून मरताना, हत्तीचे बळ असलेली बैल-जोडी डोळ्यादेखत जीव तोडताना, लेकरांचे पोट खाण्यावाचून खापाडीला जाताना, दुष्काळात बापाच्या डोक्यावर ओझे नको म्हणून मुलगी इंड्रेल पिऊन स्वत:ला खपवताना, अन आलेल्या परिस्थिती समोर हतबल होऊन स्वत:च्या गळ्यात गळफास अडकवताना पाहावे लागते! तेव्हा कुठे कळते दुष्काळ म्हणजे काय असतो. प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखे भेट देऊन अन खायला मोतात असलेल्या गरीबाच्या घरी केवळ लोकांना दाखवण्यासाठी २ घास खावून दुष्काळ समजत नाही बाबांनो...त्यासाठी काळ्या मातीत जन्म घ्यावा लागतो अन खपवावे लागते स्वत:ला त्या काळ्या मातीत!!

चारा घोटाळा-छावणी अन चारा डेपो:
शासनाने दुष्काळात कमीतकमी जनावरे तरी जगावीत यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छावण्या सुरु केल्या. आणि जेथे छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरु केले. छावणी योजने अंतर्गत शेतकरी आपली जनावरे या छावणीत आणून बांधतो, आणि सरकार तर्फे त्याच्या जनावरांना रोज २० किलो चारा मोफत दिला जातो. केवळ जनावरांना जगविण्यासाठी शेतकरी आपले घरदार सोडून आपल्या कुटुंबासह आपली जनावरे घेऊन छावणीच्या ठिकाणी राहायला येतो. तासनतास लाईन मध्ये उभा राहून कसा बसा जनावरांसाठी चारा मिळवतो.
छावणी पद्धती मध्ये भ्रष्टाचार होत असला तरी त्यातून जास्त काही मिळण्यासारखे नाहीये. जास्त भ्रष्टाचार आहे तो चारा डेपो मध्ये. या योजने अंतर्गत सरकार तर्फे टेंडर मागविले जातात. आपसूकच जे कुणी मंत्र्याच्या/अधिकाऱ्यांच्या जवळचे असतात त्यांचे टेंडर पास होते. मग हे कंत्राटदार/ठेकेदार शेतकऱ्यांकडून ओला/सुका चारा विकत घेतात आणि गरजू शेतकर्यांना शासनाच्या भावात विकतात.
यावर्षी ठेकेदारांनी सरासरी ७ रुपये किलोचे टेंडर भरले. ते मंजूर देखील झाले. मग ठेकेदारांनी शेतकऱ्यांकडून उस/ कडबा केवळ २.५ ते ३ रुपये किलोने विकत घेतला आणि गरजू शेतकर्यांना ५२ पैसे ते १ रुपया किलो या भावाने विकला. म्हणजे कडबा शेतकऱ्याकडून घ्यायचा ३ रुपये किलो ने आणि सरकारकडून वसूल करायचे ७ रुपये. एका किलो मागे चक्क ४ रुपये नफा? अशाप्रकारे हजारो टन कडबा/उस प्रत्येक जिल्ह्यात विकला गेला, आणि ठेकेदारांनी केवळ दोन ते तीन महिन्यात करोडो रुपये कमावले. आणि ज्या शेतकर्याने आपला उस/कडबा विकला तो मात्र शेवटी उपाशीच राहिला.
दुष्काळात सुद्धा हे लोक शेतकऱ्याच्या जीवावर निर्लज्जपणे आपली पोळी भाजून घेतात याचे वाईट वाटते.

साखर माफियांचे राजकारण:
चारा डेपो आणि छावण्यामुळे राज्यातील शेतकरी पैशासाठी बराचसा उस चारा डेपो साठी विकू लागले, त्यामुळे अगोदरच अवर्षण, उस क्षेत्र कमी, आणि वरून हे शेतकरी आपला उस जनवारांसाठी विकू लागले, त्यामुळे साखर कारखानदारांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. लगेच चारा डेपो बंद करण्याचे आदेश काढले गेले आणि ज्या शेतकर्यांना आपली जनावरे जगवायची आहेत त्यांनी ती छाव्ण्यामध्ये आणून बांधावीत असे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील अन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व चारा डेपो २० अगस्ट पासून बंद झाले. पण मूर्ख सरकारच्या हे लक्षात नाही आले कि पूर्ण राज्यात केवळ बोटावर मोजण्या इतक्याच छावण्या आहेत. आणि त्यात मराठवाड्यात तर यावर्षी एकही छावणी नाहीये. राज्यातील सर्व शेतकरी आपली लाखो करोडो जनावरे त्या १०-१२ छावण्यात कसे काय नेऊन बांधतील? अन समजा बांधलीच तर मग सरकार त्यांना खायला काय देयील? उस?

आज भारताकडे एवढे प्रगत उपग्रह आहेत, केवळ काही दिवसात पूर्ण महाराष्ट्राच्या दुष्काळाचा अभ्यास करून अगदी लहान लहान गावापासून कोणता भाग दुष्काळाच्या छायेत आहे ते पाहता येते. कोणत्या पिकाचे किती नुकसान झाले आहे ते पाहता येते. पण शून्य इच्छाशक्ती आणि लालचावलेली जीभ यांच्या मुळे जनता मेली तरी देखील त्याचे सोयर-सुतक नसल्याने दुष्काळ परिस्थितीवर अभ्यास करण्याचे सरकार जाणून बुजून टाळत होते! शेवटी इतक्या दिवसा नंतर का होईना थोडे फार मनावर घेऊन सरकारने राज्यातील १२३ तालुक्यांत "दुष्काळ सदृश्य परिस्थिती" असल्याचे जाहीर केले आहे. केवळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती, दुष्काळ नाही! शिवाय त्यावर मात करण्यासाठी कुठले अनुदान किंवा प्याकेज देखील नाही. शिवाय यावर अजून मूर्खपणाचा कळस लावायचे सरकार टाळू शकले नाही. नगर, लातूर, बीड अन उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके दर वर्षी सरसरी एवढा पाउस पडूनही नेहमी दुष्काळ ग्रस्त असतात, पण नेमके या वर्षी खरोखर दुष्काळ असूनही ते तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळले आहेत. शिवाय या तालुक्यात सुरुवातीस मृग बरसल्याने शेतकर्यांनी पेरण्या केल्या अन मग नंतर पावसा अभावी पिके जळून गेली, म्हणजे शेतकर्यांना दुहेरी तोटा झाला आहे, तरी देखील हे तालुके यादीतून वगळले आहेत. कसे होणार आहे या देशाचे कुणास ठावूक?

महेश हौळ.

Facebook!


It is an old story. Rangappa, a very famous Kathakkali dancer from a Village in Kerala, used to perform every Friday on stage, and many people used to enjoy his performance. He was an inborn actor and Kathakkali was flowing in his blood like water flows inside mother earth! He used to bring life to his act just with expressions and without using a single word!
It was another Friday, all people from village including queen, gathered that night to watch him performing. Queen, the queen of the Royal King of the kingdom, had seen Rangappa many times performing him on the stage, and was addicted to him. She felt, she is in love with him! Love or attraction?
Today, she decided to meet him personally.
Rangappa, with his kathakkali costume, and a spectacular make up, was all set ready to perform "Nal-Damayanti" on stage. Chandramma, a fair and down to earth lady, was his counter part in the act performing Damayanti. She was also an inborn actress. She was also ready.
Curtain opened, act started. Nal (Rangappa), with all capable expressions, expressed his love for Damayanti (Chandramma)! Damayanti reciprocated the same for Nal!
People watching them remained stunned! Qeen felt herself Damayanti. The scene was so live, every person watching them, thought, they were in real love! Queen thought, if he (Rangappa) loves her so much that the way he performed on stage, then she would be the happiest lady in kingdom! She was ready to leave all her comfort for his unspoken expressive love!
Act over. Rangappa vanished suddenly. Queen saw him walking in dark. Her love for him made her to follow him. She followed. Rangappa went to a local liquor shop. Drunk full to his capacity. Started walking. Queen followed! Rangappa reached home, wife opened the door. Queen stood outside the home. Few minutes passed. Queen listened abusive slang, quarrel. Rangappa beaten his wife badly. Queen asked neighbours, and came to know that, that was the regular drama. It was damn disappointing and shocking for her!
Her unspoken Love with all the dreams lost somewhere faraway down!
She returns with smiling (and sometimes Sad) face!

Moral of the story: Face on the stage and face behind the stage is always different! Before loving a character on the stage, always see his real face behind the Stage!

Readers may take the same moral for Facebook (Any Networking site) also!!

(Kindly neglect grammatical errors.)

Mahesh Haul
Bangalore
27 Aug 2012
© All Copyrights reserved to the author!

...


दिवस मावळतीला झुकतो...मी एक पेन आणि कागद घेऊन काहीतरी लिहिण्यासाठी म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर जातो. वाळूमध्ये पाय रोवून त्या अथांग सागराकडे पाहतो. हजारो मैलांचा प्रवास करुण आलेल्या त्या लाटांना माझ्या पायाशी येऊन संपताना पाहतो...मग उद्विग्न होऊन चालत राहतो किनाऱ्यावर...कित्येक लाटा येतात, जातात. मग विचार येतो, ज्या लाटा किनाऱ्याच्या भेटीसाठी एवढा दूरचा प्रवास करुण येतात, ज्या ओढीने येतात, त्यांची भेट फक्त काही क्षणांची?
पुन्हा किती काळ त्या लहरींना किनाऱ्याच्या शोधात भटकावे लागेल? किती अंतर चालावे लागेल? किती वादळांचा सामना करावा लागेल?
कसलं हे प्रेम? कसली हि आसक्ती? कसली हि ओढ मिलनाची?
किती हा संयम?

आणि मी, तू मागच्या काही दिवसात भेटली नाहीस तर पुरता ढासळून गेलोय...एवढाहि संयम माझ्याकडे नसावा?
कसा असेल संयम, तू ओढच तशी लावलीस नां....

शब्द कागदावर उतरवण्या पूर्वीच सूर्य बुडतो...अंधार होतो...आणि मी काहीही न लिहिता परततो... नेहमी सारखाच!

भरारी


एक गरुड....
भर उन्हाळ्यात...
दाणा-पाणी शोधत..
सैरभैर उडताना...

सापडतो एखाद्या वावटळीत...
दिशाहीन होतो...
दोन्ही पंखातले बळ त्या वाऱ्याचा विरोध करण्यासाठी अपुरे पडू लागते...
त्या सुसाट वावटळीतून बाहेर पडण्यासाठी जीव तोडून धडपड करतो, आणि तेवढेच खोलवर अडकत जातो, वाऱ्यासोबत चक्रावून जातो, वाऱ्यासोबत उडालेल्या पाला-पाचोळ्यात त्याच्या जीवाचे प्रचंड हाल होतात, तीक्ष्ण असलेली त्याची नजर अचानक धुसर होऊ लागते. तरीही, प्रयत्नांची शिकस्त करुण तो लढत राहतो त्या वादळाशी! अगदी शेवटपर्यंत!
शेवटी वावटळच थांबते! घायाळ, दिशाहीन झालेला तो गरुड, पुन्हा तयार होतो, एका नव्या वादळाला सामोरे जाण्यासाठी! पुन्हा तेच बळ घेऊन, आणि तीच तीक्ष्ण नजर घेऊन, घेतो भरारी! उंचच उंच!

महेश.

विध्वंस या मनाचा


ढग दाटून आल्यावर
माझ्या मनात काहूर उठते
सुसाट वाऱ्या सम ते
सैरावैरा धावत सुटते

माझ्या वेदना पाहून
ते ढगही गरजतात
माझे सांत्वन करताना
माझ्याच डोळ्यांतून बरसतात

अतिवृष्टी झाल्याने
नदीला पूर येतो
पाला-पाचोळ्यागत...
मी दूर वाहून जातो...

आठवणी मुरतात खोलवर..
जरी पाउस हा क्षणांचा
कोण थांबवू शकेल आता
विध्वंस या मनाचा?
महेश.

"हायब्रीड बेनं"


मागल्या साली, म्या गणपाला (माझा गावाकडला शेतकरी दोस्त) इचारलं..."भावा, सगळ्यात फालतू अन दुप्लीकेत "हायब्रीड बेनं" कोणतं हाय रं सध्या?"
गणपा: राहुल गांधी.
म्या अवाक!!
मग पुढ बोलला: "आज्जी कोण, आजोबा कोण, बाप कोण माय कोण? कुणाचं नाव लाव्त्यात, कुणाची जात लाव्त्यात? कोणत्या देशातले हायत, कोणत्या देश्यात राहत्यात? एवढं फालतू हायब्रीड बेनं आजून दुसरं म्या त न्हाय बा बगितलं!"

बोंबला...

...


शुरू कहा से करना ये तो सब जानते है..
सिकंदर तो वही है जिसे कहा रुकना पता है!

माही.

चाफा आणि माझे मन...


चाफा आणि माझे मन...
यांची नेहमीच फसगत होते...
तो काही बोलत नाही
अन माझ्या मनातले कुणी ऐकत नाही!

मग मी चाफ्याशीच बोलतो..
त्याच्या वेदना समजून घेतो..
अन माझ्या मनातले
तो पण शांतपणे ऐकून घेतो!

मग तो पण ऐन पावसाळ्यात
आपली पाने झाडून टाकतो..
अन मी पण त्या थेंबांमध्ये
दोन चार थेंबांची भर घालतो...

मग चाफा पण सुकतो...
अन माझे डोळे पण सुकतात...
त्याच्या सुगंधाला अन माझ्या हास्याला..
सारेच जन काही दिवस मुकतात!

ऋतूमागून ऋतू जातात...
चाफा पुन्हा फुलतो-सुकतो...
नाहीच कुणी ऐकून घेणारा मिळाला
तर मी पुन्हा, माझ्या मनाशीच बोलतो!

महेश.

...


रात के अँधेरे में हमें रोशनी न मिली
किसी से कोई शिकवा, कोई गिला नहीं!
गर्दिश में तारे तो हजारे देखे हमने...
पर हमारे दिल की पुकार सुननेवाला कोई मिला नहीं!

महेश.

एक मजेशीर किस्सा.


मुरुड, लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर मागील २० वर्षापासून तालुका होता होता राहिलेले एक शहर वजा गाव. माझे बालवाडी ते १२ वी शिक्षण तेथेच झाले. मी १२ वीत असतानाचा एक किस्सा.
पावसाळा सुरु होता. मुरुड गावात डुकरांचा अगदी सूळसुळाट झाला होता. आम्ही मुरूडच्या त्या काळच्या (आणि आत्ताही) एकदम उच्चभ्रू समजल्या जाणार्या भागात राहत होतो. पण तो भागही त्या डुकरांनी सोडला नव्हता. डुकरांच्या टोळ्याच टोळ्या अख्या गावात धुमाकूळ घालत होत्या. नागरिक, दुकानदार, व्यापारी सर्वजण अगदी त्रासून गेले होते.
मुरुड गाव सुधारले असल्याने बहुतेक लोकांच्या घरी शौचालय बांधण्यात आले होते. आणि त्यामुळे उघड्यावर शौचास जाणारांची संख्या अगदीच कमी झाली होती. त्यामुळे डुकरांना त्यांच्या मुलभूत अन्नाची कमतरता पडू लागली असावी. शिवाय त्यात पावसाळा, पावसाने गावातली सगळी घाण वाहून गेलेली. त्यामुळे डुकरांचे भयंकर हाल होत असावेत. मग काय, डुकरे कधी कुणाच्या घरात शिरू लागली तर कधी कुणाच्या दुकानात!

एके दिवशी आमच्या भागात राहणारी एक मारवाडी महिला बाजारातून सामान खरेदी करून पायी चालत होती. तिच्याकडे सामानाने भरलेल्या २ पिशव्या होत्या. एका पिशवीत चुरमुरे होते. अन एका पिशवीत किरकोळ सामान.
बाई रस्त्याने चालत होत्या. डुकरांची एक टोळी आपल्या म्होरक्यासकट रस्त्याच्या कडेला दबा धरून बसली होती. मोका मिळताच टोळीच्या म्होरक्याने बाईवर हल्ला केला. चुरमुर्याची पिशवी तोंडात घेतली. बाई पुरती घाबरली. डुक्कर पिशवी ओढू लागले, पण बाई काय पिशवी सोडेना. बाई मोठ्याने ओरडू लागली, अन डुक्कर पण ओरडून त्याच्या साथीदारांना बोलावू लागले. त्यांच्या झटापटीत पिशवी फाटली. चुरमुरे रस्त्यावर सांडले. अन ते पाहताच डुकरांच्या टोळीने हल्लाबोल केला. बाई तूर्तास घाबरली, अन तिथून चालती झाली. डुकरांनी चुरमुर्यावर मस्त ताव हाणला.
दुसर्या दिवशी बाईने रागारागात ग्राम पंचायतीवर केस ठोकली का पंचायत समिती कडे तक्रार केली, असे काहीसे झाले. ४-५ दिवसात डुक्कर पकडणारी एक विशिष्ट जमात असते, त्यांना पंचायतीने डुकरे पकडण्याचे कंत्राट दिले.
अवघ्या १०-१२ दिवसात शेकडो डुकरे पकडली गेली. एक ट्रक भरून ती डुकरे मुंबईला पाठवण्यात आली असे काही विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
अशाप्रकारे त्या डुकरांच्या टोळ्या नंतर मुंबईतील मौंसप्रेमींच्या भक्षस्थानी पडल्या.

..

मागच्या काही दिवसांपासून पावसाच्या थेंबांसोबत शब्दही हरवल्या सारखे वाटत आहे...काहीतरी लिहायला म्हणून बसतो...अन मग निराश होऊन जातो.

आज उभा मी शिखरावर..


दुनियेने हिणवले....
आपल्यांनी हाकलले....
माझ्या मनगटातील बळ...
शेवटी माझ्या मीच जाणले....

हवी होती फक्त...
एक साद धीराची...
मग कशाला परवा
या खोट्या दुनियेची?

धीर समजलो ज्या हाकेला
तो केवळ आवाज निघाला...
झाला भ्रमनिरास तेव्हा..
लागला घोर जीवाला..

लढलो एकटाच शेवटी
मोडक्या तलवारीने,...
झेलली वादळे सारी...
निगरगट्ट मनाने!

आज उभा मी शिखरावर...
पाहतो त्यांना पायथ्याशी...
माझ्या यशाचे श्रेय...
परी त्यांच्या माथ्याशी!

महेश.

कीड


एका गावात गोपाल नावाचा मनुष्य राहत असतो. तो एक रोपटे लावतो. मग रोपटे हळू हळू मोठे होते, फांद्या फुटतात. बरेच उन्हाळे-पावसाळे सहन करत झाड उभे असते. मग अचानक झाडाला वाळवी लागते. वाळवी बुडातून वर वर चढत जाते, आणि एक एक फांदी पोखरू लागते. मग एक एक फांदी वाळायला लगते.गोपाल ला ती वाळवी दिसत नाही. मग तो वाळलेल्या फांदीला पाणी घालतो. पण फांदी काही हिरवी होत नाही. मग रागारागात तो ती फांदीच तोडून टाकतो. काही फांद्या आपोआपच त्या वाळवीमुळे सुकून गळून पडतात. पण गोपाळच्या लक्षात शेवटपर्यंत ते येत नाही. अशा रीतीने वाळवी एवढी पसरते कि शेवटी झाडच मोडकळीस येते.

तात्पर्य: केव्हाही कीड लागली कि त्याचे मूळ शोधावे, अन मुळासकट कीड नष्ट करावी.

© Copy Rights Reserved to the author!

"पाणी ढवळून डुक्कर फरार!"


मी तयार केलेली एक मराठी म्हण व त्यावर आधारित गोष्ट.
"पाणी ढवळून डुक्कर फरार!"

एक सुंदर जंगल असते. त्यात खूप सारे प्राणी अगदी मजेत राहत असतात. त्या जंगलाची आव तिथल्या आनंदी वातावरणाची बातमी सर्वार्दूर पसरते. मग इतरही बरचसे प्राणी त्या जंगलाकडे आकर्षित होतात व त्या जंगलातील प्राण्यांमध्ये सामील होतात. त्या जंगलात एक तलाव असतो जेथे बरेचसे प्राणी पाणी पिण्याच्या निमित्ताने येत असत व थोडा वेळ गप्पा मारून निघून जात असत. एके दिवशी असेच त्या तलावावर काही प्राणी पाणी पीत असताना तेथे एक रानडुक्कर येते आणि पाण्यात उडी घेऊन मनसोक्त पाणी ढवळून टाकते. काही प्राणी त्याला तसे न करण्यासाठी उपदेश करतात पण तो मस्तीत आलेला रानडुक्कर काही न ऐकता तसेच पाण्यात लोळत राहतो. शिवाय त्या डुकरासोबतच बाहेरून आलेले काही प्राणी त्या डुकराला प्रोत्साहित करत राहतात. पूर्ण पाणी गढूळ होऊन जाते. मग गढूळ पाणी पिण्यास अयोग्य झाल्याने हळू हळू एक एक प्राणी ते आनंदी जंगल सोडून जाऊ लागतो. तलाव भकास होऊन जातो. पाणी ढवळून रान-डुक्कर व त्याचे साथीदार मात्र फरार होतात!

मतितार्थ: आपल्या समूहात, मित्रवर्गात जेव्हा एखादी त्रयस्थ व्यक्ती येऊन ढवळाढवळ करते तेव्हा त्याला वेळीच चोप द्या, अन्यथा आपली नाती बिघडवून तो त्रयस्थ केव्हा फरार होईल सांगता येत नाही.

(वरील गोष्टीचा आणि गोष्टीत उल्लेखलेल्या नावांचा कुठल्याही वास्तविक गोष्टीशी, जीवित अथवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाहीये. निव्वळ काल्पनिक गोष्ट आहे. काही संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा!)

© All Copy Rights Reserved to the author!

लागली आग..


लागली आग, उठला धूर...
बघ्यांच्या मनी, माजले काहूर...

जळाला ऐवज, जळाल्या फाईली...
जवानांच्या जीवाची काहिली काहिली...

मजल्यावर मजला, खाक झाला आगीत...
महाराज बोलले, हे माझेच भाकीत!

बुडाखाली आग, राजा असा कसा झोपला?
सुरक्षेचा दोर याच्या हाती आम्ही दिला !


भ्रष्टाचाराचे सार्यांना कसे लागले डोहाळे...
जनता जनार्धन, कधी उघडील डोळे..

शोर्ट सर्किट च्या नावाखाली पिटला डंका...
रावणानेच आज, पेटविली सोन्याची लंका..!

महेश.

झडती


मर्कटाची जात ती...
दाखविती मर्कटलीला...
आपुलीच लाल म्हणोनिया...
दुनियेस शिकवी कला....

गर्दभांच्या कळपात...
अश्वांची होते नामुष्की..
उठवूनी फायदा माणुसकीचा...
फिरोनी मारती ढूस्की!

माही म्हणे सद्गुणी..
घे दंडुका तू हाती...
करिता गंदगी कोणी...
करोनी टाक तयांची झडती!

महेश.

घुसमट!



कधी कधी होते...मनाची घुसमट!
मोहळातल्या माधमाश्यांप्रमाणे एकेक आठवणी बाहेर येतात, त्यातल्या काही कानात गोंगाट घालतात तर काही विखारी डंख मारतात!
मग चार भिंतींमध्ये, गडद अंधारात स्वत:ला कोंडून घेतो....सार्या जगाला विसरून जाण्यासाठी, त्या आठवणीना त्या अंधारात कायमचे गाडून टाकण्यासाठी!
पण होते उलटेच...जितका तो काळोख वाढत जातो, तितक्या त्या आठवणी जास्त बोचू लागतात! मनाची घुसमट वाढत जाते!
कुणाची असते हि आठवण? अन एवढी का येते हि आठवण?
कुणावर जीव लावल्यामुळे? कुणी आपल्याला धोका दिलेला असतो म्हणून?
कि आपल्या एखाद्या चुकीमुळे, सदैव आपल्या सोबत राहावीशी वाटणारी एखादी व्यक्ती आपल्यापासून दुरावल्यामुळे?
काय असते हि आठवण? आणि का आपल्याला तिचा एवढा त्रास होतो?

अल्फाज-ए-माही!


बस कुच लम्हो का है ये सफर..
फिर हम आजाद...तुम आजाद!
----------------------------------


कत्ल तो सर्-ए-आम हुआ हमारा...
बस रूह को जिस्म से आजादी नं मिली!
----------------------------------------

दर्द तो अब भी होता है सीने मे...
बस उसे मेहसूस करनेवाला कोई रहा नही!
-----------------------------------------


मेहसूस तो अब भी करते हम उसके दर्द को...
बस उसको इस बात का एहसास रहा नही!

----------------------------------------------


दुरिया ही दिलाती है एहसास इस दर्द का...
बस तभी वक्त साथ छोड देता है!!
बढाते है हम भी अपना हाथ...
जब उनका दिल तुट जाता है!
------------------------------------------------






अवस्था!


माळावरचं ते बहारदार झाड
पूर्णपणे वाळलं होतं!
कधीतरी पालवी फुटेल या आशेवर
तग धरून उभं होतं!

माझ्या मनाचंही
तसंच काहीसं झालं होतं...
दूरवर पसरलेल्या काळोखातही
एक आशेचा किरण शोधत होतं!

महेश.

My Clicks!

लाल चाफा!


पाउस पडून गेल्यावर 
मन पागोळ्यांगत झाले!

नवांकुर

रूम पार्टनर


मला खूप दिवसापासू वाटत होते, मला एखादा छान रूम पार्टनर असावा...पण मिळाला नाही..मग मी एक मांजर पाळली. मस्त होती..मनुष्याजातीपेक्षा प्रेमळ आणि विश्वासू होती. नंतर ती वयात आल्यामुळे आणि तिला तिचे आयुष्य जगता यावे म्हणून तिला गावी नेऊन सोडले आणि बोललो..."जा...जी ले अपनी जिंदगी..."
आता अज्जून एक पार्टनर शोधत होतो तीव्रतेने....आणि विशेष, परवा रात्री २ च्या सुमारास एक मोठा झुरळ माझ्या अंगावर खेळताना मी पहिला...कुठून आला काही माहिती नाही....झुरळ रूम मध्ये शिरण्याचा कसलाच चान्स नाही...तरीपण तो आला...उठून लाईट सुरु करून चप्पल हातात घेतली ....त्याला मारण्यासाठी...मग क्षणभर विचार केला....आणि चप्पल टाकून दिली आणि त्याला हातात घेतले...तो घाबरून माझ्या तळहातावर बसला. मग मी त्याला सोडून दिले...२ दिवस झाले, तो दिवसा गायब असतो...रात्री मात्र न चुकता येतो...अन एक चक्कर टाकून जातो...मेरा नया पार्टनर...त्याचे नाव क्रोकी ठेवले आहे मी....

मदिरा!


माझ्या मदिरेची
किती बोलू कौतुके...
अमृतातेही परी पैजा जिंके...

मदिरेची नशा...
चढे हळूहळू धुंदी...
डोळ्याम्होर वाटे, सारी दुनिया मंदी!

बसता मिळोनी...
होई जिगरी दोस्ती...
मिळोनी चंपक सार्या दुनियेवर हसती..

झाली थोडी ज्यादा
अंगी चढते मस्ती...
बायकोची परी याला सदा कदा धास्ती...

पिउनी घोट घोट...
चंपक करिती कल्लोळ...
चुकता प्रमाण, गटारीत लोळालोळ ...

ढोसता ग्लास...
दिवसा दिसती नक्षत्रे..
चाली झुलत पुढे, मागे भुंकती कुत्रे!

मदिरेची नशा प्यारी...
दिसे दुनिया न्यारी सारी...
उशिरा होता रात्री, बायको उभी दारी!

सोडता सुस्कारा
येई आंबट भपका...
पेताड नावाचा, याच्या नावावर ठपका...

पोट भरते तुडुंब...
तोंडातून येई उलटी...
आजू-बाजूचे चंपक, लगे मारती कलटी,...

अशी मदिरेची दोस्तहो...
किमया भलती न्यारी...
कशी का असेना, सार्या दुनियेला हि प्यारी!

महेश.

असंच...


पुन्हा एक रात्र...काळी मंतरलेली...
भयाण शांतात माझ्या..मनी अंतरलेली!

पूर्णत्व...

पूर्णत्वाच्या मागे धावण्यात मनुष्य अपूर्णच राहतो. जसे कि कस्तुरी मृग सुगंधाच्या शोधात आणि सामान्य मृग मृगजळाच्या मागे धावण्यात मरून जाते!

"एक शून्य!"


आयुष्यातल्या या कुठल्या वळणावर येऊन थांबलो मी?
माझ्यामालाच आता हि भीती भेडसावत आहे. का आणि कसा मी तुझ्यात एवढा गुंतत गेलो, कि आता मागे फिरून पहायचे म्हटले कि अंगावर काटे येतात,
तुझ्याविना मी, असा विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी जीवाची घालमेल होते. असं वाटतंय, तुझ्यातच माझं हे सारं विश्व सामावलंय, आणि तूच जर या विश्वातून निघून गेलीस, तर उरेल फक्त "एक शून्य!"

अल्फाज-ए-माही!


आँखों में तीर लिए निकलते है हम ....
क़त्ल हो जाये तो कातिल करार न देना...

-------------------------------------------

उनकी आँखों की जंजीरों में कुछ ऐसा जहम था यारों,...
उम्रकैद की सजा खड़े खड़े मिल गयी

अल्फाज-ए-माही!


आज सारे अरमान निकल गए!
मेरा हाल देख पत्थर दिल पिघल गए!
लिखे थे चुन चुन कर उनके लिए जो...
वो अल्फाज भी आंसुओं संग निघल गए!

---------------------------------------------

तुझे भूलने का हौसला तो नहीं...
मेरा चैन-ओ-सुकून कुर्बान होगा...
ये काम तो सदियों का है
चंद लम्हों में थोड़ी ख़तम होगा!

---------------------------------------------
लिखना चाहते तो बहोत कुछ चाहते है...

लिखने की वजह अब कुछ ख़ास न रही!
जो थी मेरे जीने की वजह कलतक...
यारों, आज वो मेरे पास न रही!

---------------------------------------------

उसकी रूसवाई कि यादों ने
जीना दुश्वार कर दिया...
कोई साथी न मिला तन्हाई में, यारों..
अब तन्हाई से हमने प्यार कर लिया!

----------------------------------------------

तौहीन मत दो उस इश्क की मुझे..
ये वो आग है, जिसमे जलती सारी दुनिया है!




अल्फाज-ए-माही!


किसी की दोस्ती पे तो हम जान भी कुर्बान कर दे...
मगर दुश्मनी भी निभाते है तो जान की बाजी लगा कर!

----------------------------------------------------------

तरस आता है मेरे दुश्मनों पे मुझे अब..
मेरी वफ़ादारी देख उनका भी दिल जलता है दोस्ती के लिए!

-----------------------------------------------------------

माणसातला देव


देव असतो. देव असावाच. पण तो आपापल्या मनात. त्याचा बाजार भरवू नये.
चमत्कार वगैरे सब थोतांड असते. देव पाहावा, मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या आई-वडिलांमध्ये, आप्त-स्नेहीजनामध्ये! माणसातला देव ओळखता आला पाहिजे.

यावरून एक गोष्ट आठवली.
एक अगदी पुंडलीकासारखा नितांत भक्ती करणारा पांडुरंग भक्त असतो. तो संपूर्ण दिवस पांडुरंगाच्या नामस्मरणात घालवत असे. अन एक शेतकरी असे, जो कधी त्या मंदिरात जातही नसे, अन पूर्ण दिवस शेतात काबाड कष्ट करीत असे. एकदा खूप पाउस पडतो अन गावातील नदीला पूर येतो. पूर्ण गाव बुडते. सरकार तर्फे मदत कार्याची टीम पिडीताना सोडवण्यासाठी येते. सर्व लोकांना स्थलांतरित करण्यात येते. तो शेतकरी देखील त्यांच्या मदतीने स्थलांतरित होतो. पण तो भक्त मात्र पांडुरंगाचे समरन करीत मंदिराच्या शिखरावर जाऊन बसतो. पुराचे पाणी वाढू लागते. मदत कार्य करणारे त्याला खूप विनवतात पण तो म्हणतो, "मी एवढी पांडुरंगाची भक्ती करतो, आता तोच मला वाचवेल." खूप विनवणी करूनही तो ऐकत नाही. पुराचे पाणी वाढते, अन तो वाहून जातो आणि आपला प्राण गमावून बसतो.
स्वर्गात गेल्यावर तो देवाला भेटाव आणि विचारतो, " देवा, त्या शेतकऱ्याने कधी मंदिरात पाय ठेवला नाही पण तू त्याला वाचवलेस, पण मी अख्हे आयुष्य तुझ्या चरणी घालवले, अन तू मला वाचवण्यासाठी का आला नाहीस?"
देव म्हणाला, "अरे मुर्खा, तुला विनवणी करणारा तो मदत कार्याचा अधिकारी मीच होतो. तुला त्याच्यामधला देव दिसला नाही. तुझी भक्ती हि अंध आणि दिखाऊ होती. उलट शेतकरी, रोज शेतात काम करत असताना त्याच्या मनात माझ्याबद्दल नितांत श्रद्धा होती. अन त्याने योग्य वेळी त्या माणसातला देव ओळखला."

तात्पर्य: देव कधी कुठल्या स्वरुपात दर्शन देयील सांगता येत नाही. फक्त देव ओळखण्याची कला तुमच्याकडे असायला हवी.