Mann Maze

Mann Maze

"विश्वास"!



यशाच्या उत्तुंग आभाळात झेप घेण्याचे


स्वप्न पाहत राहिलो,


त्याच आभाळाला जमिनीशी भिडताना


पुन्हा पाहत राहिलो,


क्षितिजाला गाठण्याची इच्छा,


मी मनात बघत राहिलो,


त्याच क्षितिजाला काळ्या आकाशात दडताना,


पुन्हा पुन्हा पाहत राहिलो,


जिंकण्याची आशा मनात धरून,


पुन्हा लढत राहिलो,


निराशेने तोंड दाखवले अन


पुन्हा एकदा हरत राहिलो,


का? मनात मी पुन्हा विश्वास दटावत राहिलो,


खेळ संपला, हरलो तरी मी स्वत:ला लढवत राहिलो,


कारण फक्त "विश्वास"!


............महेश


No comments:

Post a Comment