Mann Maze

Mann Maze

तुम्हाला काय वाटते?

शनिवारी संध्याकाळी मी आणि माझा एक मित्र दोघे बंगलोर च्या रस्त्यावरून सहज फिरत असताना अचानक समोरून अतिशय स्मार्ट आणि सुंदर तरुणी आमच्या पाठीमागून पुढे गेल्या...आणि काहीतरी विचार करून त्या थांबल्या आणि १०० च्या काही नोटा समोर धरून आम्हाला म्हणाल्या..

मुलगी: hi, could you do me one favour?

(ती म्हणाली असती तर बंगलोरच्या केम्पेगौडा टोवेर वरून सुद्धा मी उडी मारली असती त्यावेळी)

मी: why not?

ती :could u buy 2 Kingfishers(Superstrong) for me?

(मी अवाक) (नंतर उगीच विश्वमित्रासारखा राग डोळ्यांवर आणून)

मी म्हणालो: तुम् लड़कियों को, पीने में शरम नाही आती है, लाने में कैसी शरम?

आणि मग त्या मुलीनी, मेनकेने विश्वमित्राकडे जसे रागाने पहिले होते तसेच किंवा त्याहीपेक्षा जास्त रागात माझ्याकडे पाहिले आणि म्हणली..

मुलगी: U nonsence..! (आणि त्या निघून गेल्या)

रात्री विचार केला, त्यांची मदत करयला हवी होती का नाही?

तुम्हाला काय वाटते?

No comments:

Post a Comment