शब्दांनाही पाहिलंय कधीतरी हट्टी होताना,
खूप काही बोलायचं असून अबोल अबोल राहताना,
शब्दांनीच शिकवलंय रडता रडता हसायला,
पडता पडता सावरायला,
शब्दांमुळेच कधी कधी होतो एखाद्याचा घात,
शब्दांमुळेच मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा,
शब्दच जपून ठेवतात त्या कडूगोड आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यांमध्ये पाणी..!
mahya hi mazi kavita aahe :(
ReplyDeletemahya hi mazi kavita aahe :(
ReplyDelete