Mann Maze

Mann Maze

एक ढक्कन...

(आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या लहान पोराचे विचार)

सरकारी सायबान इउन मला इचारला

तुझा बाप औषध पिऊन मेला, आता तू काय करणार?

म्या म्हणलं,

बापानं अक्खा इंड्रेल चा डब्बा साम्पिवला,

मला तर एक ढक्कनच काफी हाय!

माझ्या बापाच्या मडयावरच लोणी खाया टपून बसलेल्या

तुमची लाळघोटी थोबाडं जलमभर बघत बसण्या परीस

म्या बी बापासंग गेलेलं बरं हाय!

असंच...

मीही दिला एक श्वास
तुला मिठीत घेताना
आज दाटतो माझाही हुंदका,
तुझ्या विरहात मरताना,
का सोडलेस मला असे
आयुष्याच्या वाटेवर चालताना?
आज पाहतो मीच मला
प्रेतावरी जळताना!

असंच...

तू दाखविलेल्या वाटेवरून चालताना
तूच वाटेत सोबत सोडलीस
,
आठवणींचे दिवे परी
,
माझ्या मनी लावून गेलीस!

असंच...

तुझे अश्रूही मी
असे काही ओळखावे,
पावसात जसे
मृगजळ दिसावे!

असंच...

रंध्रा रंध्रालाही नेत्र फुटले
अन प्रत्येक नेत्रामधून,
तुझ्या आठवणी सोबत,
पुन्हा एकदा अश्रू गळाले!

प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..

प्रेम कधी असतं, तेच कळत नाही..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही
..!!

सगळेचं सांगतात मला
,
एकदा डोळ्यांत बघ तिच्या
,
म्हणे डोळ्यांत प्रेम दिसतं
,
पण यांना कुणी सांगाव
,
तु समोर आल्यावर
,
डोळ्यांत तुझ्या पाहण्याचं
,
धॆर्यच माझ्या...डोळ्यांत नसतं
!!

डोळ्यांत पाहिलही असतं मी
,
पण काय सांगाव
..
डोळ्यांत, प्रेम नसलचं तर

अन असुनही
,
जर मला ते नाही दिसलं तरं
?

कारण, प्रेम कधी असतं, तेच कळत नाही
..
प्रेम कधी नसतं, तेही कळत नाही..!!!!

कधी कधी..

कधी कधी..
मी एकटा एकटा होतो
उजाड मनाला घेउन भटकत राहतो,
माझीच मी कीव करतो..
मग नवा मुखवटा रंगवायला घेतो..
उसन्या हास्याच्या चार लकेरी कोरतो..
खर्या चेहर्याला विसरुन जातो..
कधी कधी मी माझं
दुख.. उसवत बसतो..
चिंध्या चिंध्या त्या इतस्त: पसरतात..
त्या परत गोळा करुन,
मी मनाची वीण
घट्ट करतो...
जुनेच वस्र घालुन मी पुन्हा नव्याने वावरतो....!!!