मित्रहो, हा लेख प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पण एक वेगळ्या विषयावर लिहित आहे. "भारत" या कृषिप्रधान देशात कृषिविषयक सरकारी धोरणांमुळे समाज आणि शेतकरी यांच्यात बरेच गैरसमज होऊन जी फुट पडलेली आहे त्यावर थोडासा प्रकश टाकण्याच्या हेतूने हा लेख तुमच्यासमोर समर्पित.
कृषी उत्पादनाची किंमत ठरविण्यासाठी कृषी मंत्रालयान्तर्गत Commission for Africultural Costs and Prices (CACP) ची स्थापना १९८५ साली करण्यात आली. यानुसार भारतातील सर्व मार्केटचा सर्वे करून कृषी मालाची किमत ठरवली जाते. आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत त्या किमतीवर नियंत्रण ठेवले जाते.
जीवनावश्यक वस्तू काद्यानुसार सर्व कृषी उत्पादने हि खाद्यान्न समजून त्याची किमत ठरविण्याचा अधिकार सरकारकडे राखून ठेवण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यास हे उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, उदा.बी-बियाणे, रासायनिक खाते, औषधे, कामगार, वाहतूक, वीज, दलाली यांच्या किमती आणि मालाची किंमत यामध्ये अशी काही तफावत निर्माण झाली आहे कि कृषिविषयक धोरणे हि फक्त शेतकर्यासाठीच आहेत आणि खासगी कंपन्यासाठी नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे.
१९९९ मध्ये "गहू" या धान्याची किंमत (CACP) ने ठरविल्या प्रमाणे १००० रु. प्रती क्विंटल होती. त्यावेळी, साधारणत: खताची पिशवी रु. २००, केमिकल १५० रु, कामगार वेतन ३० रु प्रती दिवस, वाहतूक ३ रु. प्रती किमी आणि दलाली २% अशी होती. १० वर्षानंतर म्हणजे २००९ साली, गहू १२०० रु. प्रती क्विंटल खताची पिशवी रु.४५०, केमिकल १००० रु, कामगार वेतन १२० रु. प्रती दिवस, वाहतूक ८ रु प्रती किमी. आणि दलाली ५%.
म्हणजे, मालाची किमत सरासरी २०% नि वाढली पण माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत सरासरी १००-१५०% नि वाढली. यामुळे, शेतकरी जो कि पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे तो दरवर्षी तोट्यात येऊ लागला, शिवाय कर्ज घेऊन शेती करताना ते परत फेडू न शकल्या मुळे तो स्वत:ला गळफास लाऊन घेऊ लागला.
आजची स्थिती, खाद्य मालाच्या किमती वाढल्या म्हणजे महागाई वाढली असा एक सर्वमान्य गैरसमज समाजात झाला आहे. १० रु. किलो बटाटे घेताना आपण जेवढा विचार करतो तेवढा २०रु चे Lays चे घेताना करतो का? १ किलो कांदे घेताना जेवढा विचार आपण करतो तेवढा विचार फेअर अंड लवली घेताना करतो का? यापैकी जीवनावश्यक गोष्ट कोणती?
आज सर्व समाज कृषी मंत्र्याला दोष देत आहे कि तो महागाई नियंत्रणात आणू शकत नाही वगैरे. अरे कृषी मंत्री काय अंडे देणारी कोंबडी आहे का? देशात कांद्याचे उत्पन्नच कमी असेल तर तो काय करील? का पुन्हा कांद्याचा भाव कमी करून शेतकऱ्याच्या पोटावर त्याने पाय द्यावा?
मध्यंतरी एकाने फेसबुकवर एक शेतकरी कांद्याच्या ढिगावर बसलेला फोटा टाकून त्याच्या खाली "लाख्या शेठ"असे कुत्सित बुद्धीने लिहिले होते. एकाने "कांद्याने आणले डोळ्यांना पाणी" असे लिहिले होते. आणि त्याखाली १००-२०० कॉमेंट्स. अरे वर्षभर कांद्याचा भाव ५रु प्रती किलो असतो तेव्हा कुठे जाते तुमच्या डोळ्याचे पाणी? तेव्हा कुणीच ब्र सुद्धा काढीत नाही. तेव्हा कृषी मंत्र्याच्या नावाने का बोंबा ठोकत नाहीत? आणि जेव्हा उच्च शिक्षित लोकच अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या विरुध्द लिखाण करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची दया येते. मग त्यांना खी बोलले कि म्हणणार , शेतकर्यांना यातले काहीच मिळत नाही, सगळे व्यापारीच गिळून टाकतो. अरे, मग एवढी सुबुद्धी असेल तर त्या व्यापाऱ्याच्या विरोधात आवाज उठवा ना! आणि शेतकर्याला त्यातले काहीच मिळत नाही हे असा तर्क कसलाही अभ्यास नसताना का काढावा? शेतकऱ्याला मिळालेल्या किमती पैकी हातावर रोख निव्वळ नफा किती राहतो याचा अभ्यास नसताना सुद्धा असे म्हणणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर गंभीर पणे विचार व्हयला हवा.
यामध्ये सरकारी धोरणाचा बहुतांशी दोष आहे यात शंका नाही पण समाजाचेहि शेतकऱ्यांच्या प्रती काही कर्तव्य नाही का? का शेतकरी सुधारुच नये असा काही मानस आहे का? सरकारी लोकांचे पगार १ वर्षात ३ वेळा वाढतात तेव्हा शेतकरी त्यांच्या विरोधात बोंबा ठोकतो का?
शेतकरी हा सुद्धा समाजाचा घटक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आणि सुशिक्षित लोकांनी तर शेतकऱ्यांच्या विरोधात बोलताना १०० वेळा विचार करून मगच बोलले पाहिजे. तरच शेतकऱ्यांना खर्या अर्थाने त्यांचे सामजिक स्थान आणि महत्व परत मिळेल.
(मी स्वत: मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering ) शाखेचा पदवीधर आहे आणि एक प्रगत शेतकरीही आहे, सोबत एका अंतर राष्ट्रीय कंपनीत संलग्न क्षेत्रात कार्यरत आहे. शिवाय माझे वडील हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून M Sc Agri असून शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघटना यासाठी बरीच वर्षे कार्य केले आहे. ३ वर्षानंतर प्रथमच या विषयावर लिखाण केले आहे.कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व...महेश हौळ पाटील, उस्मानाबाद )
नमस्कार महेश हौळ साहेब ...!!!
ReplyDelete४ ते ५ वेळा ही माहिती मी परत परत वाचली आहे. खुप छान आभ्यास व मांडणी. अगदी तंतोतंत व जिवंत असे लिखाण केले आहेत तुम्ही भाऊ. शेतकरी संघर्ष हा फार बिकट होतोय. मी पेशाने पत्रकार आहे, त्याआगोदर शेतकरी. शेतकरी संघटनासाठी M-SKY Farmer Club या नावाची संघटना तयार केली आहे. यामधून मी शेती उपयोगी गोष्टी घडवून आणायचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, जसे की शेतकरी आज्ञानपणा. पण यावर मार्ग काढण्यासाठी मला शेतकरी वर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जावे लागले व विश्वास निर्माण करावा लागला. शेतकरी अज्ञाण दूर करण्याबरोबरच अशा काही अनेक गोष्टी आहेत ज्यात बदल होणे खुप गरजेचे आहे.
माझा ईमेल खालीलप्रमाणे आहे -
mahesh6485.khandagale@gmail.com