Mann Maze

Mann Maze

शल्य..


तीचे ओठ नेहमी अबोल
डोळे मात्र बोलके
हसते कधी गालांत
डोळ्यांतून मोती झळके!

पंख मिळाले परीचे
परी उडण्याचे स्वातंत्र्य संपले
शल्य तिच्या मनीचे
का कुणी न जाणले?

सौंदर्याला भाळले किती
मनात कुणी न पाहिले
हृदयात दाटले भाव
परी ओठांतच राहिले!
महेश..

1 comment:

  1. ओठावरचे शब्द ओठावरच राहिले
    मनातल्या हिरवळीला
    डोकावून तिनेच ना पहिले
    ओठावरचे शब्द ओठावरच राहिले

    ReplyDelete