भाकरी थापता, माय
डोळे पदरानं पूस..
थरथरल्या हातानी
मला भरवती घास
वल्या सरपणाचा
निघे धूर भकाभक
भाकरीला उशीर
शिव्या हासडी बाप!
माय चालते अनवाणी..
पायी रुततो काटा..
तिच्या निशिबी आलेल्या
ह्या जीवघेण्या वाटा..!
उन्हातान्हात राबुनी
लावी संसारा ठिगळ
फाटक्या पदरामंदी
पुन्हा फाटक आभाळ!
कुंकवाचा धनी..
निका कपाळी राही..
काडी जोडता जोडता..
तिची होई लाही लाही!
माझ्या सुखापायी तिनं
केलं रगताचं पाणी
ऋण फिटायचं न्हाई..
घ्यावा जलम फिरुनी!
महेश.
१८/९/११.
डोळे पदरानं पूस..
थरथरल्या हातानी
मला भरवती घास
वल्या सरपणाचा
निघे धूर भकाभक
भाकरीला उशीर
शिव्या हासडी बाप!
माय चालते अनवाणी..
पायी रुततो काटा..
तिच्या निशिबी आलेल्या
ह्या जीवघेण्या वाटा..!
उन्हातान्हात राबुनी
लावी संसारा ठिगळ
फाटक्या पदरामंदी
पुन्हा फाटक आभाळ!
कुंकवाचा धनी..
निका कपाळी राही..
काडी जोडता जोडता..
तिची होई लाही लाही!
माझ्या सुखापायी तिनं
केलं रगताचं पाणी
ऋण फिटायचं न्हाई..
घ्यावा जलम फिरुनी!
महेश.
१८/९/११.