(१९५२ सालच्या सत्य घटनेवर आधारित, नावं बदलून)
महादू, शंकर अन त्यांचा बाप ग्यानबा...रोज दिवसभर काम करून सांच्या पारीला घरी यायचे....रानात कायमची जागल असायची....तिघं मिळून रातचं जेवण उरकून मग पुन्यांदा कुऱ्हाडी हातात घेऊन रानात बैलाला पाणी-वैरण करायला, राकुळी ठेवलेल्या कुत्र्याला भाकरी टाकायला जायचे....काम उरकून, शेकोटी पेटवून मग बाजूलाच हातरून टाकून निजायचे...
महादू अन शंकर दोघं बी तरणेबांड गडी...एकदा कामाला जुपले कि काम सुद्धा घाबरून जायचं...दोघा भावांनी मिळून येळवशी पासून शिमग्यापस्तोर हीर पाडून दाखवली होती....ग्यानबा आपल्या दोन्ही कर्तबगार पोरावर भारीच खुश असायचा....
जवारीचं नुकतच खळं झालेलं...३-४ साठा ढीग लागलेला...राखणीसाठी रानात जागल ठेवणं जरुरीच होतं... ग्यानबा, महादू अन शंकर रातचं जेवण उरकून, कुत्र्यासाठी भाकरी घिउन रानात निघाले....अंधार किर्र झालेला...रातकिड्यांची किरकिरी..मधूनच एखादं कोल्ह अरुळी हाणायचं...दगडाच काळीज असलेल्या ह्या गड्यांना कशाची भीती? झप झप पावलं टाकीत निघाले...
रानात बैलाच्या चंगाळ्याची किणकिण घुमत होती...मालक आलेला बघून बैलाची लगबग सुरु झाली...ग्यानबानं घोंगड बाजवर हातरलं अन अंग टाकून दिलं.. महादूनं बैल सोडून वड्याला नेउन पाणी पाजून आणले...कडब्याच्या गंजीतून ४ पेंड्या काढल्या, कुर्हाडीनं बारीक कापून बैलासमोर टाकल्या...डोळे मिटून भुकेलं जनावर गपागप खावू लागलं!
शंकरच्या जवळ तीन कारवाणी कुत्रे गोंडा घोळू लागली...त्यानं भाकरी सोडून त्यांच्या समोर टाकली...
तोवर महादूनं त्याच्यासाठी अन शंकरसाठी जवारीच्या ढिगाजवळ घोंगड हातरलेलं...दोघांनी थकलेलं अंग टाकून दिलं...आभाळातल्या चांदण्या बघत कधी झोप लागली कळलं नाही..
रात्र सरत होती...ग्यानबा गाढ झोपेत असताना त्याच्या कानावर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला....जागेवरून न उठता तो कानोसा घेऊ लागला...तीन चार माणसांचा वावर तिथं असल्याचं त्याला जाणवलं...अंधार्या रात्री त्याला नीट काही दिसेना...बाजूला बघितलं तर शंकर अन महादू गाढ झोपलेले...कुणीतरी जवारीच्या ढिगाला हात घातला याचा त्याला अंदाज आला...आवाज न होऊ देत त्यानं शंकर अन महादुला जागं केलं...उशाला ठेवलेल्या कुर्हाडी हातात घेतल्या...हळू हळू पावलं टाकत पुढं सरकले...महादू ओरडला..."कोण हाय रं ढिगावर...आ?" तेवढ्यात शंकरच्या कमरेत कुणीतरी काठीचा वार केला...शंकर ओरडला..."महादू, इकडं हाय रं रांडेचं..." तेवढ्यात ग्यानबाच्या मिचकीत एक काठी बसली...
अंधारात कुणाला काही दिसेना...
महादू ढिगावर तुटून पडला...हातातल्या कुर्हाडीनं जमेल त्या दिशेनं वार करू लागला...आणि एक चोर त्याच्या तावडीत गावला...मस्तक धरून कुर्हाड घातली डोक्यात....बेम्बीतून ओरडलं ...जागेवर मुडदा पडला...बाकीचे साथीदार आवाजच्या दिशेने धावून आले...दोघांनी महादूला धरलं...एकानं महादूच्या मस्तकात काठी घातली, शंकर ओरडू लागला....ग्यानबा न कुर्हाड उचलली,...शंकर धावून आला...अंधारात कुणाचा ताळमेळ कुणाला लागेना...शंकर ने सपासप वार केले...अजून एकजण कोलमडून पडला...ग्यानबानं कुर्हाड उगारली...एकाच्या पोटात घुसली..टराटरा पोट फाटलं...कोथळा बाहेर आला...महादू मोठ्यांदा ओरडला...."आबा.....आआये ..."
कुणाच्या काय डोक्यात येयीना..अंधारात काय दिसंना ...बाकीच्या चोरांनी धूम ठोकली...क्षणात सगळीकड शांतता पसरली...
शंकर अंधारात हाक मारू लागला.."आबा....महादू...?" ग्यानबा पुढे सरसावला...पायाखाली मुडदा पडलेला....हातानं चाचपून बघितलं...शंकर शेकोटी तून जळकं लाकूड घेऊन परत आला.. तीन मुडदे पडलेले...
लाकूड तोंडाजवळ नेउन बघतो तर काय...महादू रक्तात माखून पडलेला...कळवळून ओरडला..."आबा..घात झाला..."
ग्यानबाची दातखीळ बसली..म्हातारं जागेवर बसलं...शंकरनं महादुला चाचपून बघितलं...जीव कधीचाच निघून गेलेला...
तांबडं फुटलं...जवारीच्या ढिगावर रक्ताचा सडा सांडलेला.....ग्यानबाला गडबडून आलं...आपल्याच हातानं आपल्य्याच पोराचा जीव घेतला म्हणून म्हातारं बडवून घेऊ लागलं...शंकरनं म्हातार्याला जवळ घेतलं...अन सांगितलं..."महादुला चोरांनी मारलंय...तू न्हाय"
शंकरनं गाडी जुपली...तिन्ही मडे गाडीत घालून गावाकड नेले...पोलिस-पाटील पंचनामा झाला...शंकरनं घडलेली हकीकत सांगितली...महादुला चोरानीच मारल्याचं सांगितलं...पण खरं काय ते फक्त ग्यानबाच्याच जीवाला माहिती होतं...!
शंकरला खुनाच्या गुन्ह्याखाली २ महिन्याची शिक्षा झाली. म्हातार्याला सोडून देण्यात आलं...!
झाला प्रसंग म्हातार्याचा जिव्हारी लागला...म्हातार्यानं खानं-पिणं सोडलं....दोन-चार महिन्यात म्हातारं पार खचून गेलं...शंकर सुटला....बाहेर आल्यावर शंकरनं जमेल तसं म्हातार्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला...पण पोराला मारल्याची जाणीव म्हातार्याच्या मनातून जाईना...!
अन एके दिवशी भर दुपारी म्हातार्यानं रानातल्या बाभळीला स्वत:ला टांगून घेतलं अन स्वत:च्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त केलं!
(महेश)