Mann Maze

Mann Maze

जवा म्या लाहान व्हतो..1

जवा म्या लाहान व्हतो
दिसालेबी छान व्हतो
अन् खेळासाठी ईकडं तीकडं
मोकाट समदं रान व्हतं
आता तसं कूठं काय
वेळेमंदी बांधले पाय
काम डोक्यावर घेवून
रान रान फिरत रायतो

लाहान लाहान गोश्टिसाठी डोयामंदी आसवं व्हती
हासवासाठी मले खेळन्यायची रास व्हती
डोयामंदलं पानी आता

गेलं कोठं ईचार् करतो
पन आठवून समदं
आता थोडा थोडा हासून पायतो

चढत व्हतो झाडायवर्
धावत व्हतो पाखरायमांगं
कागदाचे बनवत व्हतो डोंगे
अन् नाचत व्हतो पावसाच्या सरिसंगं
आता आडोसा घेवून कायचा तरी
पावसापासून लपून रायतो
बालकनितून फलाटाच्या
पाऊस जाची वाट पायतो

आता जरी माया जवळ
समदं काही आलं
तरी नाय येनार , तवाची वेळ
अन् तवाचे ते खेळ
ते समदं आता म्या
आठवनीतच पायतो!

असंच...

दिवसा स्वप्ने बघतो मी
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...

असंच...

काय वाटते मला कशास कोण ऐकतो?
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!

चाकरी आणि चाकोरी

रविवार संध्याकाळपासूनच 'आता उद्या परत पुन्हा कामाला सुरुवात' असं वाटायला लागतं, सोमवारी सकाळी ज्याला 'मंडे ब्ल्यूज' म्हणतात, ते भेडसवायला लागतात आणि मग उरलेला आठवडा 'रोज रोज तेच ते' - तशीच सकाळ, तशीच ऑफिस गाठायची धावपळ, तेच सहकारी, तेच काम, तीच जागा. चाकरीच्या या चाकोरीत मग आपली संवेदनशीलता कधी गोठायला लागते तेदेखील मग कळत नाही.

Going Home

Wont be available online from 3rd Nov to 10th Nov..
Wish u all a very happy Deepawali..!

मराठी

मराठी राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी किंवा तुकड्या वाढवण्यासाठी परवानगी देणार नाही असे माननीय(?) शिक्षणमंत्री म्हणतात तसेच मराठी माध्यमाला अनुदानही देता येणार नाही पण इंग्रजी तसेच अन्य भाषिक माध्यमातल्या शाळांना हा निर्णय लागू नाही,नाशिकात आज ह्या निर्णयाविरुद्ध सर्वांनी आवाज उठवला पण महाराष्ट्राच्या भूमीत मराठीवरच अन्याय करणारे आणि त्याचे वृत्तवाहिन्यांवर निर्लज्ज समर्थन करणारे सरकारला कोणीच जाब विचारणार नाही का? मुख्यमंत्री म्हणतात की असे अनुदान देता येणार नाही कारण ज्या शाळांना(अन्य भाषिक) अनुदान देण्याचे ठरले आहे त्यांना अनुदान दिल्यानंतर सरकार सद्ध्यातरी कुठल्याही नवीन शाळेला अनुदान देवू शकत नाही गेल्या सहा वर्षात मराठी माध्यमाच्या एकाही शाळेला परवानगी दिलेली नाही पण २००० च्या आसपास इंगजी आणि अन्य भाषिक शाळांना मान्यता दिली गेली, महाराष्ट्राचे सर्व निर्णय दिल्लीतच घेतले जातात ह्य गोष्टीला ह्यापेक्षा जास्त पुरावा कशाला हवा,महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय खरा कोणाचा हे सर्व महाराष्ट्राला सांगण्याची कृपा करावी आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी कुठल्या भाषेत संभाषण करावे हेही सांगण्याची कृपा करावी.......!
By..
Minoti Tendulkar