Mann Maze

Mann Maze

"विश्वास"!



यशाच्या उत्तुंग आभाळात झेप घेण्याचे


स्वप्न पाहत राहिलो,


त्याच आभाळाला जमिनीशी भिडताना


पुन्हा पाहत राहिलो,


क्षितिजाला गाठण्याची इच्छा,


मी मनात बघत राहिलो,


त्याच क्षितिजाला काळ्या आकाशात दडताना,


पुन्हा पुन्हा पाहत राहिलो,


जिंकण्याची आशा मनात धरून,


पुन्हा लढत राहिलो,


निराशेने तोंड दाखवले अन


पुन्हा एकदा हरत राहिलो,


का? मनात मी पुन्हा विश्वास दटावत राहिलो,


खेळ संपला, हरलो तरी मी स्वत:ला लढवत राहिलो,


कारण फक्त "विश्वास"!


............महेश


Girls..

The best thing about girls is that even during pauses in the conversation you can look at them and not get bored! But, there is an optimal time for looking at a girl before it gets counted as a Stare!

A Very Good Friend..

"A Very Good Friend" is a dangerous category with Indian girls.
From here you can either make fast progress or if you play it wrong, you go the lowest catagory invented by Indian woman ever- "Rakhi Bhaiya"!

एक विचार..

प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी कधी ते पलानार्याला गाठतातच.

पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते रस्तेच.

. पु. काळे

सहज

आपत्ती पण अशी यावी कि त्याचाही जगाला हेवा वाटावा.पडून पडायचंच असेल तर ठेच लागून पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरून पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता, हे तरी जगाला कळेल!

असंच...

आपल्यावर कुणी मरत नाही
म्हणुन कुठवर झुरत रहायचं?
आता ठरवुन टाकलय,
पहिलं प्रेम बायकोवरचं करायचं!
....महेश

असंच...

प्रेम माझे तिला कधी कळलेच नाही

नाते माझे तिचे कधी जुळलेच नाही

मी तिच्या प्रेमात या भिजलो असा की

प्रेतही माझे कधी जळलेच नाही...!

........महेश

असंच...

तिची माझी

सच्ची मैत्री होती.....

आज कित्येक वर्षानी भेटलो,

माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

Anonymous..