Mann Maze

Mann Maze

याला प्रेम म्हणावे...कि आणखी काही...

आज संध्याकाळी माझ्या एका ऑफिस कलीग सोबत थोडे (जो कि येत्या काही दिवसात कंपनी सोडून दुसरी जॉईन करीत आहे) पार्टीला गेलो असताना एक विलक्षण धक्का मला बसला..
आज का कुणास ठाऊक, त्याने त्याची स्टोरी सांगितली...तो मुळचा ओरिसातील दुर्गम भागातून आहे...जीओलोजीस्ट...त्याचा प्रेम-विवाह ८ वर्षापूर्वी झाला...त्याच्या आई-वडिलांच्या संमतीने..
त्याच्या प्रेयसीच्या हृदयाला लहानपणापासून छेद आहे..एक मेजर हार्ट सर्जरी झाली आहे आणि दर २१ दिवसाला एक इंजेक्शन तिला घ्यावे लागते...हे माहिती असून हि त्याचे तिच्यावर प्रेम झाले..,.तिने नकार दिला..कारण आपल्यामुळे कुणाचे आयुष्य उध्वस्र व्हावे अशी तिची इच्छा नव्हती...पण त्याला तीच आवडली..
तीच्या आई-वडिलांनी तिला तिचा मेडिकल खर्च न पेलल्यामुळे एका मठात सोडली होती..ती दिसायला सुंदर आहे..वेल एजुकेतेड आहे... आणि त्यापेक्षाही सुंदर कविता ती करते...याने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली..त्याच्या आई-वडिलांनी निर्णय त्याच्यावर सोपवला....तिच्या निर्णयाची दखल घेण्यासाठी तिला कुणीच नव्हते...
त्याने तिच्यासोबत लग्न केले आणि बंगलोरला आला ....मी कित्येकदा त्या दोघानाही भेटलो..त्यांचा घरी गेलो..त्यांचा तो संसार पाहून मीदेखील माझ्या भावी संसाराविषयी कित्येक स्वप्न रंगवली...पण त्यांच्या सुखी संसारामागे हि हृदयद्रावक स्टोरी असेल असे कधीच वाटले नाही...तिचे expected आयुष्य काही वर्ष-काही महिने किंवा कदाचित काही दिवसच आहे...ती फक्त त्याच्या प्रेमावर जगते..आणि तो तिच्या आशेवर...अशी शक्ती हल्ली किती जणांकडे असते? याला प्रेम म्हणावे...कि याला आणखी काही शब्द आहे?

No comments:

Post a Comment