Mann Maze

Mann Maze

जिद्द माझ्या मनी...


मन माझे पाखरू...
वाचते प्रत्येक मन डोळ्यांनी..
समजते सर्व काही मला...
परी बोले न कधी ओठांनी...

दया नको मजला...
तुमचे प्रेम मजला हवे..
आहेत कला गुण माझ्या अंगी..
अन विश्वासाचे बळ नवे...

हसाल माझ्या व्यंगावर...
मजला दु:ख नाही..
हिणवू नका द्वेषाने...
बाकी मागणे नाही..

हे देवाघरचे देणे...
माझ्या हाती न काही...
बदलून टाकेन परी...
ही उम्म्मेद..ही जिद्द माझ्या मनी...

No comments:

Post a Comment