
फुल होतं ते माझं..
प्रेमात पडल्याने हिरमुसलेलं कि
एवढं जपलो त्याला म्हणून
माझ्या वरती रुसलेलं..!
फुल होतं ते माझं..
मक्ष्ज़्य मिठीत माझ्या वेदनांना
बिलगून चिंब भिजलेलं..
मला उब देण्यासाठी मात्र
स्वत: निखाऱ्यासारख जळून विझलेलं!
फुल होतं ते माझं
माझ्या शब्द-भावनांना
कुशीत सामाऊन भुललेलं
नकळत माझं आयुष्य दरवळून
माझ्या हृदयात फुललेलं!
फुल होतं ते माझं
ढासळलेल्या मला
पुन्हा पुन्हा उभं करणारं..
थर-थरणार्या माझ्या हाताला
अलगद घट्ट धरणारं!!
फुल होतं ते माझं
मला त्रास होऊ नये म्हणून
पाकळी मध्येच रडणारं..
शेवटचा स्पर्श म्हणून
आसवांना खांद्यावर ठेऊन..
कायमचं मला सोडणारं!
फुल होतं ते माझं..
तिला न विचारताच कोणीतरी तोडलेलं..
स्वप्न होतं जे तिचं माझं..
या दुनियेने..पूर्ण होण्याआधीच मोडलेलं!!
No comments:
Post a Comment