आटला वडा
आटली हिर
वाळलं चिपाड
कुणाला फिकीर!
ढोरं छावणीमंदी
कडबा लांडगे खाती
टरा टरा फाटते
रानामंदी काळी माती!
दुस्काळात तेरावा म्हैना
गाभडती गाय
फाटक्या पदरानं
डोळं पुसती माय!
सरती दिस
पडतो पाउस!
तहाण्या धरतीची
उजळती कुस!
चालते तिफन
पेरितो सोनं
साऱ्या दुनियेचा पोशिंदा
इचारीतो कोण?
पिक येतं पोटऱ्याला
धनी गुम्फितो गोफण
तवा गरीबाच्या सुखात
देव टाकितो इरजण!
बंद हुईना टिपूस
आलं बोकांडी छप्पर
इझली चूल
भिजली भाकर!
आपापल्या राड्यात
दुनियेत निजलेली
कुणब्याच्या नशिबाला
दैना पाचवीला पुजलेली!
महेश.
२३/११/११
mahesh khup chan ahe kavita.....khare varnan ahe ekdam.....
ReplyDelete