आसवांचे, यातनांचे, वेदनांचे काय झाले?
पेटलेल्या पिंजऱ्यातल्या पाखरांचे काय झाले?
वाळवांटातील प्रवासी केवढा हैराण झाला
चालताना हे अचानक मृगजळाचे काय झाले?
जडली ज्याची प्रीत कमळावर त्या भ्रमराचे तरी काय झाले?
उद्ध्वस्त झालेल्या त्या पोळ्यातील मधमाशांचे काय झाले?
मर्यादा पुरुषोत्तम त्या राजाचे तरी काय झाले?
भोगिला वनवास जिने, त्या सीतेचे मग काय झाले?
शेवटी ते युध्द होते...
शेवटी युद्धात सांगा कौरवांचे काय झाले?
पांडवांचे काय झाले?
वदविला वेद रेड्याच्या मुखी, त्या ज्ञानेशाचे काय झाले?
रचिली ज्याने गाथा, त्या तुकोबाचे काय झाले?
वाहिले स्वराज्यासाठी धारोष्ण रक्त
त्या शिवबा मावळ्यांचे काय झाले?
लढला-मरला जो स्वातंत्र्यासाठी...
त्या महात्म्याचे काय तरी झाले?
पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारा
माझिया हातातल्या त्या फुलपाखरांचे काय झाले?
नेमके ते काय होते जे माझ्या ओठी न आले?
जन्म ज्याचा अंत होता, त्या कथांचे काय झाले?
महेश.
१९/११/२०११
ही कविता आपण स्वत: केलीये का ?
ReplyDelete