दिवस मावळतीला झुकतो....थंड वाऱ्याची झुळूक हलकेच स्पर्शून जाते....
पक्षी घरट्याकडे परतू लागतात....अशा कातरवेळी, मनात अनामिक काहूर उठते...मन माझ्याही नकळत कुणासाठी झुरत आहे हे माझ्यासुद्धा लक्षात येत नाही!
रोज कातरवेळी मन कुणाची तरी वाट पाहत रहातं....स्वप्न रंगवत रहातं...
एकटे चालताना ती सोबत असल्याचे, माझ्याशी बोलत असल्याचे भास होतात...
तिचे निरागस हास्य आठवून माझेही ओठ आपसूक, माझ्याही नकळत हसून जातात!
वाऱ्याच्या थंड झुळकीबरोबर, समुद्राच्या लाटांबरोबर, पावसाच्या थेंबांबरोबर तिचे ते हळवे आणि नाजूक स्पर्श आठवतात अन अंगावर रोमांच उभे राहतात!
यालाच प्रेम म्हणतात का हो?
याचे उत्तर हो असेल तर.......
No comments:
Post a Comment