Mann Maze

Mann Maze

तुझे माझे नाते....

तुझ्या जालीम नजरेला मी आता काचेच्या बाटलीत कोंडली आहे.....तुझ्या डोळ्यांत बुडण्याची लहर आली कि अलगद ढक्कन उघडतो आणि २-४ घोट तुझी नजर पिऊन घेतो...मग तुझ्या नजरेची नशा अशी काय चढते...वातावरण बदलून जाते, मन बेधुंद होते....हात सळसळतात...मग उचलतो लेखणी आणि उतरवतो काही शब्द कोऱ्या पानावर...कुणाला त्यात कविता दिसते...तर कुणाला गझल...पण त्यांना काय माहिती....त्या शब्दांत तू असतेस..आणि त्या शब्दातून जर तूच निघून गेलीस तर उरतो फक्त...एक कोरा कागद.
आपले नाते....कुणी म्हणते संपले..कुणी म्हणते ते नाते नव्हतेच...पण त्यांना काय माहिती....तू अजूनही माझ्याजवळच, माझ्या नसानसात, श्वासाश्वासात भिनली आहेस....आणि जेव्हा तूच निघून जाशील ....तर उरेल फक्त एक काचेची रिकामी बाटली....अन एक निर्जीव देह...!
महेश.

No comments:

Post a Comment