मला आता तुझी बिलकुल आठवण येत नाही. शिशिरातल्या पानझडीत जसे एखाद्या वृक्षाचे पान पान गळून जाते तश्या तुझ्या आठवणी एक एक करून विरून जात आहेत.
अन पहाटेच्या धुक्यात जसे सर्व काही धूसर होऊन जाते तशी माझ्या डोळ्यांत साठलेली तुझी प्रतिमा सुद्धा असता धूसर होत चालली आहे.
आता वाट पाहतो आहे त्या ग्रीष्माची, रखरखत्या उन्हात उरल्या सुरल्या तुझ्या आठवणी करपून जाण्याची!
आणि वाट पाहतो आहे त्या वसंताची...आठवणींची झालेली राख वाहून जाण्याची!
असे म्हणत म्हणत किती ऋतू येऊन गेले....पण....
No comments:
Post a Comment