या रहाटगाडगी जीवनात..
खूप काही हवं होतं...
मनात जिद्द होती
अन मनगटात बळ होतं!
मागे वळून नं पाहता..
माझा रथ हाकीत राहिलो...
अडथळे उधळून टाकीत..
क्षिताजाकडे जात राहिलो...
जे जे हवे ते जिंकत होतो..
मनमुरादपणे अन उधळीत होतो..
असल्या कसल्या नशेत रमलो..
जगाला विसरून धुंदीत होतो...
जे पाहिजे ते मिळाले...
पण जिवाभावाचे मागेच राहिले...
आज मला मग मी...
एकटाच उरताना पहिले...
दुनियेच्या या गर्दीत..
आता कोण माझे उरले?
हरीण आता हे...
कळपातून भरकटले!
पाहतो मागे वळून..
पण रस्ता आता हरवला आहे...
माझ्या वाटणाऱ्या माणसांत...
आता मी परका आहे...!
खूप काही कमविण्याच्या नादात..
खूप काही गमवून बसलो..
माझ्याच लाचार जिंदगीवर..
आज माझा मीच हसलो!
महेश
No comments:
Post a Comment