Mann Maze

Mann Maze

वाटतंय मलाही आता....

बोलतेस तू डोळ्यांत...
शब्द कुठे ते हरवले?

गुणगुणतेस तू ओठांत...
सूर कोणते ते गवसले?

नयनांच्या ह्या वादात..
मीच मला हरविले..

पौर्णिमेच्या रात्री त्या...
चांदणे कुणी ते भरवले?

तुझ्या नसण्याच्या कल्पनेने...
हृदयात धडकी का भरली....

काळजात अचानक माझ्या...
ही कळ अशी का उठली?

होती हृदयात जखम....
तुझ्या दिसण्याने विरली...

वाटतंय मलाही आता....
तुझीच प्रीत जडली...

No comments:

Post a Comment