
लेकराला ताप चढला...
रडारड झाली...
"ह्येला भानामती झालीया"
म्हातारीनं बोंब ठोकली!
लिंबू मिरची उतरून टाकली..
येशीबाहीर तुकडा टाकला...
तवा पोराचा ताप..
कमी झाल्यावानी वाटला...
थोड्या येळानं (ताप) पुन्हा चढला...
दारात कोळशानं रेगुटा वाढला...
"ह्येला बुवाकड न्ह्या"
जनीनं किडा काढला...
बुवा सोवळ्यात बसलेला..
पोराला पुढ्यात ढकलला..
मंतर-छंतर पढून...
कोंबडा कापायला सांगितला...
खणा-नारळाची वटी
लिंबू मिरची, तुर्याचा कोंबडा..
काळ्या मिरीचा भूक्टा...
बुवा यादी कराया लागला...
"पोरगा उलट्या पायानं जन्माला..
ह्येचं काय काय खरं न्हाई..
ह्येच्या नशिबात लेको..
लय दिस जगणं न्हाई..."
बुवा डोळे झाकून भाकीत सांगायला..
तेवढ्यात पोराचा ताप चढला...
जवळचा लोटा घिऊन...
बुवाच्या मस्तकात हाणला...
पोराचं नशीब सांगणाऱ्या बुवाला ..
सवताचं नशीब न्हाय कळलं!
पोराची करामत बघून
म्हातारीचं बी मन वळलं!
एका झटक्यात समदं मिटलं
कोंबड्याच बलिदान वाचलं
बुवाचं कपाळ फुटलं
पोराचं दुखणं सुटलं!
महेश.
No comments:
Post a Comment