Mann Maze

Mann Maze

वाळूचे घर अन सोनेरी स्वप्नं ..

आठवतात ते दिवस...
समुद्राच्या कडेला आपण..वाळूचे घर बांधायचो...
अन आपल्या सुखी संसाराची सोनेरी स्वप्नं बघत तल्लीन होऊन जायचो...
तितक्यात एखादी लाट उसंत घेऊन यायची अन क्षणात ते वाळूचे घर त्या सोनेरी स्वप्नांना सोबत घेऊन विशाल सागरात गुडूप व्हायची...
असा विध्वंस वास्तविक आयुष्यातही होईल..कधी वाटलंच नव्हतं..तुझं माझं सोनेरी स्वप्न...असं खारट पाण्यात विरघळून जाईल..कधी वाटलंच नव्हतं!

No comments:

Post a Comment