बोडका डोंगर
उपाशी मेंढरं
पोळत्या झळया
उन्हाळ्यात!
आटला वडा
आटली हिर
वाळले झाड
उन्हाळ्यात!
करपट मुस्काट
घामाच्या धारा
अंगाची लाही
उन्हाळ्यात!
उठली वावटळ
उडाले चघळ
डोळ्यात फुफाटा
उन्हाळ्यात!
जित्रापं तान्हेली
पोटात खळगी
जळाला कडबा
उन्हाळ्यात!
फाटली धरती
डोईवर नारायण
चातक आसुसला
धगाट्यात!
महेश
No comments:
Post a Comment