मी तयार केलेली एक मराठी म्हण व त्यावर आधारित गोष्ट.
"पाणी ढवळून डुक्कर फरार!"एक सुंदर जंगल असते. त्यात खूप सारे प्राणी अगदी मजेत राहत असतात. त्या जंगलाची आव तिथल्या आनंदी वातावरणाची बातमी सर्वार्दूर पसरते. मग इतरही बरचसे प्राणी त्या जंगलाकडे आकर्षित होतात व त्या जंगलातील प्राण्यांमध्ये सामील होतात. त्या जंगलात एक तलाव असतो जेथे बरेचसे प्राणी पाणी पिण्याच्या निमित्ताने येत असत व थोडा वेळ गप्पा मारून निघून जात असत. एके दिवशी असेच त्या तलावावर काही प्राणी पाणी पीत असताना तेथे एक रानडुक्कर येते आणि पाण्यात उडी घेऊन मनसोक्त पाणी ढवळून टाकते. काही प्राणी त्याला तसे न करण्यासाठी उपदेश करतात पण तो मस्तीत आलेला रानडुक्कर काही न ऐकता तसेच पाण्यात लोळत राहतो. शिवाय त्या डुकरासोबतच बाहेरून आलेले काही प्राणी त्या डुकराला प्रोत्साहित करत राहतात. पूर्ण पाणी गढूळ होऊन जाते. मग गढूळ पाणी पिण्यास अयोग्य झाल्याने हळू हळू एक एक प्राणी ते आनंदी जंगल सोडून जाऊ लागतो. तलाव भकास होऊन जातो. पाणी ढवळून रान-डुक्कर व त्याचे साथीदार मात्र फरार होतात!
मतितार्थ: आपल्या समूहात, मित्रवर्गात जेव्हा एखादी त्रयस्थ व्यक्ती येऊन ढवळाढवळ करते तेव्हा त्याला वेळीच चोप द्या, अन्यथा आपली नाती बिघडवून तो त्रयस्थ केव्हा फरार होईल सांगता येत नाही.
(वरील गोष्टीचा आणि गोष्टीत उल्लेखलेल्या नावांचा कुठल्याही वास्तविक गोष्टीशी, जीवित अथवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाहीये. निव्वळ काल्पनिक गोष्ट आहे. काही संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा!)
© All Copy Rights Reserved to the author!
No comments:
Post a Comment