Mann Maze

Mann Maze

"म्हतार्याचा जीव"


"म्हतार्याचा जीव"

म्हतारं मारुतीच्या पारावर बसल्या बसल्या म्हणालं,


"पाण्ड्या, पाटलाकुन पैका घिउन पोराला शिकिवला, इन्जिनेर केला


बड्या कंपनीत सायब झाला...बेनं माझ्या परस्पर लगीन उरकुन बसलं म्हमईला जाउन,


आन ह्यो पाटील बसला माज़्या मानगुटिवर...राह्यलेली दोन एकर बी गिळुन टाकिल.."


दोन वर्सात म्हतारं मेटाकुटीला आलं, पोराला बलावनं धाडलं..


दोन दिवसानं पोरगं गावाकड आलं...तवर म्हतार्याची वाचा बंद झाली..


गळ्क्या छपराकड म्हतारं डोळं वासुन बघत व्हतं..


जीव नरड्या पस्तोर आला...पर म्हतार्याचा जीव काय जायना..


पावणं-रावळं म्हणु लागली, म्हतार्याचा जीव कशात तर आड्कलाय..


पोराला तेचं काय बी सोयर सुतक नव्हतं...भिताडाला टेकुन, नुसतं तमाशा बघत व्हतं..


म्हतारं हातानं काय तरी खुनवु लागलं...


तेवढ्यात पाण्ड्यानं धोतरात एक धोंडा गुंडाळुन आणला आन म्हतार्याच्या छाताडावर ठिवला..


आन कानात म्हणला,"पोरानं पाटलाचं कर्ज फ़ेडायला पैका दिलाय"


म्हतार्यानं हातानं गटुडं चाचपलं......थोडं हासलं...


आन आ वासुन पडलं निपचीत...कायमचं...!



महेश....

No comments:

Post a Comment