पहिल्या प्रेमात
मन गरुड पक्षी होऊन
उंच आकाशात उडते
आकाशाला गवसणी घालायची
अनोखी स्वप्नं बघू लागते
दिवसा ढवळ्या
चांदण्यांत फिरून येते!
मित्रांच्या गर्दीतही ते
"ती"लाच शोधत राहते!
पावसात भिजताना
प्रत्येक सरीत ते
"ती"लाच पाहते!
पहिल्या प्रेमात,
जणू काही ते
"ती"च्यासाठीच जगते-मरते!
No comments:
Post a Comment