आज च्या किस्स डे च्या मुहूर्तावर...! एक गोष्ट...
सन्ध्याकाळचे ४-४.३० वाजले असतिल.
ती त्याला गर्ल्स होस्टेल मधुन एसएमएस करते.
ती: काय करत आहेस?
तो: काही नाहि. आत्ताच झोपितुन उठलो.
ती:चल फ़िरायला जाउया. मला खुप बोर होतय!
तो: अत्ता? यावेळि? नको...नन्तर कधितरि जाउ!
ती: चल ना रे.....असे काय करतोस? १५ मिनिटात तयार होउन ये. मी गर्ल्स होस्टेलच्या गेट समोर वाट पाहते.
तो आनि ती...दोघेहि मित्र..फ़क्त मित्र...त्याच्या मनात तिच्याविषयी काहि नाहि...तिच्या मनात त्याच्या विषयी काय आहे...महिती नाहि!
तो तयार होउन गर्ल्स होस्टेलच्या गेटसमोर जातो...ती अजुन आलेलि नसते...या मुली नेहमी अशाच....स्वत: भेटायला बोलावुन स्वत:च लेट! तितक्यात ति होस्टेलच्या बाहेर येताना दिसते! तिने आज पान्ढरा पन्जाबी ड्रेस घातला होता...नेहमी पेक्शा तिचे सौन्दर्य आज खुलुन दिसत होते...तो आपला शोर्ट चड्डी आनि टीशर्ट घालुन आलेला...त्याला जरा कसंतरीच वाटलं! पन ती काही बोलली नाही!
ती: चल..
तो: कुठे जानार?
ती: इन्स्टिट्युट च्या पाठिमागे...अमराईत....
तो: चला.....
अन मग ती दोघे चालत रहिली...ती बोलत राहते...तो नुसते ऐकत राहतो..तिच्या प्रश्नांची तुटक तुटक उत्तरे देतो...नेहमी बड्बड करणारा तो...आज मात्र एकदम शांत....तो पाहतो...तिचे मनमोकळे हास्य आनि हसताना गालावर पडनारि खळी...फ़क्त पाहत राहतो....त्या मन्द वार्याबरोबर उडनारे तिचे केस.....तिच्या कानातल्या त्या झुमक्यांचा आणि पायातील पैंजनांचा तो आवाज...
सुर्य मावळतीला आलेला...तो भानावर येतो...वर पाहतो तर...ढग अचानक भरुन आलेले...अवकाळी पाउस येण्याची दाट शक्यता...
तो: चल परत जाउया...खुप उशीर झाला आहे...
ती: असे रे काय करतोस?...लगेच परत...ते झाड आहे ना...तिथपर्यंत जाउ...अन मग...
तो: ओ.के....
पुन्हा ती बोलत राहते...तो नुसते ऐकत राहतो...वार्याचा वेग वाढु लागतो...ढग हळुहळु गरजायला सुरुवात करतात...सुर्य केव्हाच मावळुन गेलेला...पाउस येणार यात शंका नाहि...
तो: चल...परत जाउ...पाउस येईल बहुतेक....
ती: येउदे...आज मला भिजायचंय...मनसोक्त भिजायचंय....मला पाउस खुप आवड्तो...(आणि ती बोलत रहिली)
वार्याचा वेग आता वाढला...तिच्या मनात आता अनामिक भिती...दोघांमधिल अंतर हळुहळु कमी होउ लागले....आणि....आला....पाउस आला...दोघेही चिम्ब भिजले....त्याने तिला पाहिले...ती पावसाचा आनंद घेन्यात मग्न...तिचा पांढरा ड्रेस भिजल्यामुळे पारदर्शक झाला...तिचे मादक सौंदर्य....त्याचि नजर क्षणभर तिच्यावर खिळली...तिच्या गलावरुन, ओठावरुन ओघळनारे ते पावसाच्या पाण्याचे थेम्ब आपल्या ओठांनी अलगद टीपावे असा मोह त्याला झाला...क्षणभरच...अन लगेच तो पुन्हा भानावर...
अभाळ झकाळुन गेले...ढग वेड्यसारखे गरजु लागले...लक्ख वीजा चमकु लागल्या...वारा आक्राळ-विक्राळ रुप धारण करुन झाडांना हेलकावे देउ लागला...
पावसाचा वेग वाढला..आता मात्र ती पुरती घाबरली....
ती: चल परत जाउ...मला भीती वाटत आहे...
भितीने ती त्याच्या अगदिच जवळुन..त्याला चिकटुन चालु लागते...त्याचा हात ती केव्हा तिच्या हातात घेते..दोघांनाही समजत नाहि...
त्याच्या मनात एक वादळ...भावनांचे वादळ...पण मनावर ताबा....तिच्या मनात भिती...
वार्याचा वेग वाढतो...पावसाचाही वेग वाढतो...ती त्याचा हात आनखि घट्ट पकडते...
दोघे एकमेकांकडे पाहतात..क्षणभरच...
तितक्यात...तितक्यात...तो मेघराज कर्ण-कर्कश गरजतो..आणि ती सौदामिनी धरतीचे चुंबन घेण्याकरिता आकशातुन धावते...घाबरुन ती त्याला मीठी मारते...तो स्तब्ध...! मग हळुच त्याचेही हात तिच्या कवे भोवती...नकळत...धरणी आणि सौदामिनी यांच्या मिलनाच्या मधे आलेला तो कडु-निंबाचा व्रुक्ष क्षणात जाळून खाक होतो.....
ढग गरजत राहतात..वारा पुन्हा सोसाट्याने वाहु लागतो...पाउस बेधुंद होउन मनसोक्त बरसतो...दोघे एकमेकांच्या डोळ्यांत पाहतात..
नजरेत नजर....श्वासात श्वास....तिच्या भावना अनावर होतात...तिचे ओठ...त्याच्या ओठांवर...३-४-५...सेकन्द....वीज पडली...तिथेही...अन इथेही...!...दोघेही भनावर येतात..
तो कडु-निम्बाचा व्रुक्ष...जळुन खाक होतो...उन्मळुन पडतो...!पावसाचा वेग कमी होतो....अग्नी शान्त होतो..
ती त्याच्याकडे पाहते...मग गालांत हसुन लाजते..आणि मागे फ़िरुन मागे वळुन न पाहता धावत जाते...तिच्या होस्टेल कडे...
तो तिथेच बराच वेळ उभा राहतो..वेड्यासारखा....स्तब्ध! वीज पडली...तिथेही...अन इथेही....!
महेश….
२३ मे २००६
सुंदर आहे कल्पना विस्तार. अगदी व्यक्तिगत अनुभवच वाटत आहे.
ReplyDeleteकथा वाचून जुने वीज पडल्याचे दिवस आठवले. आता काय लग्न झाले आहे ...दिवस भार-नियमनाचे आहेत :)