
अवकाळी पाउस येताना
तुझ्या आठवणी सोबत घेऊन येतो..
सारीतल्या प्रत्येक थेम्बासोबत
डोळ्यात एक अश्रू देऊन जातो..
आठवणींच्या ह्या वादळात..
भावनांना पूर येतो..
अन माझ्या मनातला वटवृक्ष
मुळासकट उन्मळून पडतो...
या अवकाळी पावसात
मन माझे भिजून जाते
प्रिये, खरं सांग,
माझ्यासारखीच तुझीही अवस्था होते??
महेश..
No comments:
Post a Comment