Mann Maze

Mann Maze

I felt


I felt
Tonight I can write
The saddest lines
For I felt myself Alone

I felt
I am a sailor of an empty boat
Lost faraway in ocean
On the blue water, below the blue sky
(With salty charges in my eyelids!)

I felt
I am a deer lost from its folk
Deep somewhere in a dense forest
In the grasses, below the shadows
Of surmount trees
With an unknown fear in my inside!

I felt
I am a stranger
To my own people
And a boycotted unit of The One
In the crowd of fake faces, and died hearts
With an half died heart in my inside!

I felt (I sigh)
For no good reason,
I lived so long!
I felt
I am dying
For no good reason!
(I sigh, again!)

Mahesh.

आयुष्य....


आयुष्य....
कधी वादळी वाट..
कधी झुळझुळता पाट..
कधी थंड वारा..
कधी डोळ्यांत उष्ण धारा..

कधी मनात भावनांची गर्दी..
कधी गर्दीत मन एकटे..
कधी नात्यांचा होतो पसारा..
कधी पसाऱ्यात हरवते नाते..

कधी ओठांत शब्द अबोल..
कधी डोळ्यांना वाचा फुटते..
कधी हृदयात खुपत्या वेदना..
कधी मृगजळ हातातून सुटते..

आयुष्य...
कधी जगण्याचा कंटाळा येतो...
कधी मरण्याचा मोह होतो..
कधी भेटतो जिवलग कोणी..
अन अवेळी, जीव कंठात येतो!!
महेश.

पावसात मृगजळ..


आज पुन्हा पाउस..
वेड्यासारखा बरसला...
तुझ्या आठवणीत एक मोती..
माझ्या डोळ्यांतून मग निसटला...

कित्येक वर्षानंतर
आज पावसात मी भिजले...
तुझ्यासोबत भिजल्याचे
भास जणू मज झाले....

पावसाचे थेंबही
मग माझ्यावरती हसले...
भर पावसात मजला
मृगजळ आज दिसले...!
महेश!

फुल होतं ते माझं..


फुल होतं ते माझं..
प्रेमात पडल्याने हिरमुसलेलं कि
एवढं जपलो त्याला म्हणून
माझ्या वरती रुसलेलं..!

फुल होतं ते माझं..
मक्ष्ज़्य मिठीत माझ्या वेदनांना
बिलगून चिंब भिजलेलं..
मला उब देण्यासाठी मात्र
स्वत: निखाऱ्यासारख जळून विझलेलं!

फुल होतं ते माझं
माझ्या शब्द-भावनांना
कुशीत सामाऊन भुललेलं
नकळत माझं आयुष्य दरवळून
माझ्या हृदयात फुललेलं!

फुल होतं ते माझं
ढासळलेल्या मला
पुन्हा पुन्हा उभं करणारं..
थर-थरणार्या माझ्या हाताला
अलगद घट्ट धरणारं!!

फुल होतं ते माझं
मला त्रास होऊ नये म्हणून
पाकळी मध्येच रडणारं..
शेवटचा स्पर्श म्हणून
आसवांना खांद्यावर ठेऊन..
कायमचं मला सोडणारं!

फुल होतं ते माझं..
तिला न विचारताच कोणीतरी तोडलेलं..
स्वप्न होतं जे तिचं माझं..
या दुनियेने..पूर्ण होण्याआधीच मोडलेलं!!

जिद्द माझ्या मनी...


मन माझे पाखरू...
वाचते प्रत्येक मन डोळ्यांनी..
समजते सर्व काही मला...
परी बोले न कधी ओठांनी...

दया नको मजला...
तुमचे प्रेम मजला हवे..
आहेत कला गुण माझ्या अंगी..
अन विश्वासाचे बळ नवे...

हसाल माझ्या व्यंगावर...
मजला दु:ख नाही..
हिणवू नका द्वेषाने...
बाकी मागणे नाही..

हे देवाघरचे देणे...
माझ्या हाती न काही...
बदलून टाकेन परी...
ही उम्म्मेद..ही जिद्द माझ्या मनी...

मी एक वेल बावडी



(एक वेल आणि वृक्ष)
ऐन ग्रीष्मात अचानक...
तो बहरून आला...
नव्या पालवीने
मन मोहरून गेला...

मी एक वेल बावडी...
तया बिलगण्या तरसली...
फुलांची माला लेऊन..
त्याच्या साठीच सजली...

धुंद त्या संध्याकाळी
मेघ भरुनी आले...
तृष्ण धरतीवरी..
मृद्गंध पसरुनी गेले..

रोमांचक त्या प्रसंगी..
वेल त्याला बिलगली...
गंध अर्पुनी तयाला..
कुशीत त्याच्या निजली..
महेश...