Mann Maze

Mann Maze

कळी

कित्येक दिवसानंतर
ती कळी आज फुलली..
गोऱ्या तिच्या गालावर
खळी आज खुलली..

गुलाबी पाकळ्यांचा
चौफेर सुगंध पसरला...
पाहुनी सौंदर्य नव-कळीचे
एक भ्रमर तिच्यावर खिळला..

प्रेम जडेल तिच्यावरी
भ्रमरास वेडी आशा..
कळी खुडोनी जाय ललना..
प्रियकरास तिच्या रमविण्या..

जुडते कुठे एक कहाणी
तिथेच तुटते दुसरी..
पुन्हा उमलते कळी..
घेउनी पाकळी हसरी...!

No comments:

Post a Comment