सांग सखे अजुनी...
अजुनी वाहतात का ते वारे?
गर्द वनराईत
ते गोड पाण्याचे झरे?
सांग सखे अजुनी,
उमलतात का ती फुले..
अन बागेमध्ये त्या
अजून झुलतात का झुले?
सांग सखे अजुनी,
कोसळतात का धारा
भिजुनी चिंब मग तू
वेचतेस का गारा?
सांग सखे अजुनी,
का दाटते डोळ्यांत पाणी?
ओंजळीतल्या फुलांसोबत,
का येतात माझ्या आठवणी?
सांग सखे अजुनी,
जगतेस माझी बनुनी...
पुन्हा तुझ्याचसाठी
घेयीन जन्म फिरुनी!
महेश.
अजुनी वाहतात का ते वारे?
गर्द वनराईत
ते गोड पाण्याचे झरे?
सांग सखे अजुनी,
उमलतात का ती फुले..
अन बागेमध्ये त्या
अजून झुलतात का झुले?
सांग सखे अजुनी,
कोसळतात का धारा
भिजुनी चिंब मग तू
वेचतेस का गारा?
सांग सखे अजुनी,
का दाटते डोळ्यांत पाणी?
ओंजळीतल्या फुलांसोबत,
का येतात माझ्या आठवणी?
सांग सखे अजुनी,
जगतेस माझी बनुनी...
पुन्हा तुझ्याचसाठी
घेयीन जन्म फिरुनी!
महेश.
सखी अजून काही बोललीच नाही का - डॉ किरण
ReplyDelete