Mann Maze

Mann Maze

महाराष्ट्र दिन


 महाराष्ट्र दिन.
आतंकवादी बिर्याणी झोडतोय
शेतकरी फासावर लटकतोय
राजकारणी हवेत उडतोय
गरीब आपले पाय भाजतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

नेता संघटना करतोय
दलित तरीही होरपळून मरतोय
सरकारी अधिकारी लाच खातोय
सामान्य नागरिक पाया पडतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

कारखानदार उरावर बसतोय
कामगार खंगला जातोय
भ्रष्टाचाराच्या जोरावर
तमाशा रंगला जातोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

भैया झोपड्या वाढवतोय
मराठी फुटपाथवर नीजतोय
रोजगार दुसर्याला मिळतोय
आपला माणूस उपाशी राहतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

नेहरुचे स्मारक उभारतोय
सीमाप्रश्न अजूनही छळतोय
मंत्री कुत्र्यासारखा भुंकतोय
नक्षलवादी किड्यासारखे पोलीस मारतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

परदेशात आपलाच पैसा कुजतोय...
एका पैशासाठी माणूस इथे भिक मागतोय!
५२ वर्षे उलटून गेली आता
तरीही मराठी अजून असाच उपेक्षित जगतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

कसला महाराष्ट्र दिन?
देशातील मोठ्या लोकांच्या यादीत १०-५ मराठी लोकांची नावे आली कि आपल्याला अभिमान वाटतो.
अरे पण इतर १० कोटी लोकांचे उपेक्षित जीवन पहा, मग कळून येयील, किती लाचार झाला आहे महाराष्ट्र!
प्रत्येक गोष्टीत लाचारी. स्वत:च्या मनगटावर स्वराज्य स्थापन करणाऱ्या त्या मोठ्या दिलाच्या राजाच्या महाराष्ट्रातील लोकांना दुसर्या समोर हात पसरण्याची सवय कशी काय लागली?
कुठे गेला तो गरजा महाराष्ट्र? मुंबई महारष्ट्रात सामील करून घेण्यासाठी शेकडो लोकांनी दिलेले बलिदान...आहे का कुणाला त्याची जाणीव? परप्रांतीय लोक मराठी माणसाच्या बोकांडी/उरावर आणून बसविण्यासाठीच केला होता का त्या हुतात्म्यांनी अट्टाहास?
किड्या-मुन्ग्याप्रमाणे मारताहेत पोलीस, एवढे लाचार आणि हतबल सरकार? मुठभर नक्षलवाद्यांचा बिमोड आपण करू शकत नाही?
कुत्र्या सारखे भुंकत आहेत मंत्री, शेतकर्यासाठी जाहीर केले बजेटचा मलिंदा गिळून टाकत आहेत, आणि शेतकरी तरीही आत्महत्या करीत आहे.
आजतागायत ५७००० शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. जगाचा पोशिंदा असा होरपळून मरतोय, यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट कोणती असेल?
आरक्षणाच्या जोरावर दलित शिकत आहेत, मोठ मोठे अधिकारी होत आहेत, पण एकदा मोठे झाले कि मागे फिरून पाहण्याचे हे विसरतात. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे अशी यांची मानसिकता राहत नाही.
मुंबई सोडून जरा महारष्ट्र फिरून बघा, खरा महाराष्ट्र मागेच कुठेतरी राहिला आहे. बघा एकदा फिरून बाबा आमटेंचे नंदनवन, बघा हजारेंचे राळेगण सिद्धी, बघा एकदा तपोवन फिरून!
मराठवाडा, खानदेश, विदर्भ बघा एकदा फिरून.
स्वाभिमानी महाराष्ट्र कुठेतरी हरवला आहे. अन लाचार महाराष्ट्राने जन्म घेतला आहे.
महेश.

No comments:

Post a Comment