
आटला वडा
आटली हिर
वाळलं चिपाड
कुणाला फिकीर!
ढोरं छावणीमंदी
कडबा लांडगे खाती
टरा टरा फाटते
रानामंदी काळी माती!
दुस्काळात तेरावा म्हैना
गाभडती गाय
फाटक्या पदरानं
डोळं पुसती माय!
सरती दिस
पडतो पाउस!
तहाण्या धरतीची
उजळती कुस!
चालते तिफन
पेरितो सोनं
साऱ्या दुनियेचा पोशिंदा
इचारीतो कोण?
पिक येतं पोटऱ्याला
धनी गुम्फितो गोफण
तवा गरीबाच्या सुखात
देव टाकितो इरजण!
बंद हुईना टिपूस
आलं बोकांडी छप्पर
इझली चूल
भिजली भाकर!
आपापल्या राड्यात
दुनियेत निजलेली
कुणब्याच्या नशिबाला
दैना पाचवीला पुजलेली!
महेश.
२३/११/११
आसवांचे, यातनांचे, वेदनांचे काय झाले?पेटलेल्या पिंजऱ्यातल्या पाखरांचे काय झाले?वाळवांटातील प्रवासी केवढा हैराण झालाचालताना हे अचानक मृगजळाचे काय झाले? जडली ज्याची प्रीत कमळावर त्या भ्रमराचे तरी काय झाले?उद्ध्वस्त झालेल्या त्या पोळ्यातील मधमाशांचे काय झाले? मर्यादा पुरुषोत्तम त्या राजाचे तरी काय झाले?भोगिला वनवास जिने, त्या सीतेचे मग काय झाले? शेवटी ते युध्द होते...शेवटी युद्धात सांगा कौरवांचे काय झाले?पांडवांचे काय झाले? वदविला वेद रेड्याच्या मुखी, त्या ज्ञानेशाचे काय झाले?रचिली ज्याने गाथा, त्या तुकोबाचे काय झाले? वाहिले स्वराज्यासाठी धारोष्ण रक्त त्या शिवबा मावळ्यांचे काय झाले? लढला-मरला जो स्वातंत्र्यासाठी...त्या महात्म्याचे काय तरी झाले? पत्थरांच्या कोणत्या शहरातला मी राहणारामाझिया हातातल्या त्या फुलपाखरांचे काय झाले? नेमके ते काय होते जे माझ्या ओठी न आले?जन्म ज्याचा अंत होता, त्या कथांचे काय झाले? महेश.१९/११/२०११
दो लफझो में कैसे बताऊ मै तुम्हे..
के कैसी वो दिखती है, कैसे वो हसती है..
जब वो शरमाती है, तो मेरी जान कैसे जलती है....
देख के उसकी आंखो में..दिल में इक आह सी उठती है..
कैसे बताऊ मै तुम्हे यारो...के कैसी वो दिखती है..
जब चलती है सडको पर....बहार साथ लेके चलती है..
देख के उसको..हर नौजवा कि धडकन मचलती है..
उसकी गर्म सांसो के संग...बिन बादल बारिश बरसती है...
नजरो के तीर जैसे...बिजलीया धरती को छुती है...
कैसे बताऊ मै तुम्हे यारो...कैसी वो दिखती है!
ओठो कि पंखुडीयों से...सुरो कि सरगम निकलती है..
आवाज कि मिठास कम्बख्त पत्थर दिल पिघलाती है!
खुशबू से उसकी यारो...सुबह कि हर किरण मेहक जाती है!
काले बालो कि छाव में...सुनेहारी शाम रंग लाती है..
और कैसे बताऊ मै यारो...कैसी वो दिखती है!
होती है साथ जब...मेरी दुनिया पुरी लगती है..
मेरे लहू में..हर इक रूह में...अब वो हि वो बसती है..
रूठ जाये कभी तो...धडकन रुक सी जाती है...
हसके गले लग जाये तो...जान में जान आती है!
और कैसे बताऊ मै यारो...कैसी वो दिखती है!
महेश. (१३/११/२०११)