मागच्या काही दिवसापासून काही मराठी न्यूज चॅनेलवाल्यांनी त्यांचा दिमाग काय कुठं गहाण ठेवलाय का काय असा प्रश्न वारंवार पडू लागला आहे?
एखाद्या गावात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चांगला पाऊस पडला तर लगेच अक्ख्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला म्हणून बातमी देतायत!
माझ्या गावात आणि तालुक्यातही अजून एकदाही चांगला पाऊस पडलेला नाही, पण शेजारच्या एक तालुक्यात एक चांगला पाऊस झालेला आहे. तरीही हे चॅनेलवाले "उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस, पूर परिस्थिती" वगैरे बातम्या देत आहेत! अगदी अशाच बातम्या लातूर जिल्ह्यासाठी देखील ते देत आहेत. गाव, तालुका, जिल्हा यातला काही फरक कळतो की नाही या वार्ताहरांना?
पेरणी करण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो, किंवा पेरणी झाल्यापासून पीक हाताशी येईपर्यंत किती पाऊस पडावा लागतो, विहिरीला/ बोरला पाणी येण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो यातलं कसलंही ज्ञान नसताना पावसावरच्या बातम्या देण्यासाठी अशा अक्कलशून्य वार्ताहरांना हे च्यानेलवाले कशासाठी पाठवत असतील?
एकाच पावसात गावचा पाणी प्रश्न मिटला वगैरे भंकस बातम्या जेव्हा हे देतात तेव्हा त्यांच्या मुस्काटात हाणावीशी वाटते, एक पावसात पडलेलं पाणी एकदा त्यांना पाजायला पाहिजे, मग कळेल पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी किती पाऊस पडावा लागतो आणि पाऊस पडल्यानंतर ते पिण्या योग्य होण्यासाठी किती वेळ लागतो!!
ग्रामीण भागातील बातम्या देण्यासाठी त्या पत्रकाराची नाळ त्या ग्रामीण भागाशी जुळलेली असायला हवी, पांढरपेशी पत्रकारांचे हे काम नव्हे!
(हे माझा वयक्तिक मत आहे.)