Mann Maze

Mann Maze

विलक्षण योगायोग.


ऑक्टोबर महिन्यात माझ्या वडिलांवर "कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद" येथे मूत्रपिंड आरोपण (Kidney Transplantation) ची शस्त्रक्रिया झाली.  हे हॉस्पिटल किडनी आरोपण, हृदय-विकार, क्यांसर यांसारख्या श्रीमंत रोगांवरील शस्त्र-क्रियेसाठी खूप संपूर्ण भारतात खूप प्रसिध्द आहे. 

ऑपरेशन साठी १ महिना अगोदरच औरंगाबाद ला हॉस्पिटल जवळच एक फ्ल्याट भाड्याने घेऊन तिकडे राहायला गेलो. आठवड्यातून २ वेळा डायलिसीस करावे लागायचे. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेहमी जावे लागायचे. आमच्या शेजारीच राहणारे (राहायला आलेले) शिंदे नावाचे एक "मराठा" शेतमजुरी करणारे कुटुंब (दारिद्र्य रेषेखालील) याच म्हणजे किडनीच्याच ऑपरेशन साठी औरंगाबादला आले होते. आमच्या अगोदर ६ महिन्यापासून ते इथे राहत होते आणि नियमित त्या पेशंटचे डायलिसीस करत होते. शिंदेच्या सर्व नातेवाईकांच्या किडन्या तपासल्या, पण त्याला कोणाचीच किडनी जमेना. ६ महिने उलटून गेले तरी कुणी डोनर मिळेना, आणि शेतमजूर असल्याने हा अफाट खर्च पण झेपवेना. पंतप्रधान निधीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि पूर्ण निधी मंजूरहि झाला होता, पण  निधी येण्यास अवकाश होता.

त्यांच्याच शेजारी, एक शेख "मुस्लीम" कुटुंब राहायला आले होते. पेशंट औरंगाबाद विमानतळावर सिनियर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून सरकारी नौकरीत होता. त्यांना सुद्धा वर्ष भरापासून किडनी मिळत नव्हती. सर्वांच्या किडन्या तपासल्या. पण व्यर्थ. डोनर मिळेना. दररोज डायलिसीस केल्यामुळे प्रकृती एकदम खालावून गेली. 

दोन्ही कुटुंब अगदी मोडकळीस आले होते. टेन्शन, धावपळ, पैसा, नातेवाईक, हे-ते काहीच काम करत नव्हते. 

दोन्ही कुटुंबासमोर कुठलाच पर्याय नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी एके दिवशी  दोन्ही पेशंट आणि त्यांच्या पत्नी यांना बोलावून घेतले आणि सांगितले, "तुम्हा दोघानाही किडनी लवकर मिळणे शक्य नाही. आणि रोज डायलिसीस करून पेशंटचे हाल करण्यात काहीही अर्थ नाही. पण सुदैवाने तुमच्यापुढे एक पर्याय आहे. शिंदेच्या पत्नीची किडनी शेखला बसू शकते, आणि शेखच्या पत्नीची किडनी शिंदेला बसू शकते. तशा चाचण्या आम्ही केल्या आहेत. आणि सर्व रिपोर्ट पोझीतीव आले आहेत. कायद्याने आपण दोघांकडून तसे समती पत्र घेऊयात आणि आप्रेशन करून टाकूयात. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे."

डॉक्टरांच्या या सल्ल्याने दोन्ही कुटुंबासमोर एक आशेचा किरण समोर उभा राहिला. दोघांच्या पत्नीनी संमती दिली. कायद्याने त्यांच्या सर्वांच्या संमती-पत्रावर सह्या घेतल्या. एकाच दिवशी एकाच वेळी दोघांचेही ऑपरेशन करण्याचे मंजूर झाले.

दरम्यान शिंदेंचा पंतप्रधान निधी आला, आणि शेख यांना तर सरकारी नौकारदार असल्याने सर्व काही सरकारी खर्चातच होणार होते. त्यामुळे तोही प्रश्न मिटला. 
माझ्या वडिलांच्या ऑपरेशनच्या आदल्या दिवशी त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. शिंदेच्या पत्नीची किडनी शेखला बसविली, आणि शेखच्या पत्नीची किडनी शिंदेला बसविली. महिनाभरात दोन्ही कुटुंब व्यवस्थित झाले.

विलक्षण योगायोग. एक गरीब दारिद्र्य रेषेखालील शेतमजुरी करणारे मराठा कुटुंब आणि एक श्रीमंत मुस्लीम कुटुंब. पण अशा वेळेस जात-धर्म, गरिबी-श्रीमंती अशा गोष्टीना काही किंमत नसते. 

असंच!

कधी कधी मग मी
एकटा एकटा उरतो..
एक स्वप्न साकारताना 
दुसरे तुटताना पाहतो!

असंच!

ग्रीष्मातल्या टपोर चांदण्यात
चांदणी माझी मी शोधतो
त्या निर्विकार चंद्राला सुद्धा
उदास होताना मी पाहतो!

असंच!

तुझी आठवण येते तेव्हा
मन माझे भरकटून जाते...
वावटळीतल्या पाचोळ्यागत
उंच आकाशी उडत राहते!

असंच!

त्या आडवळणाच्या वाटेवर
डोळे तुझी वाट पाहतात
येशील तू परत पुन्हा
मनाला आश्वासन देत राहतात!

असंच!

नदीच्या त्या सुमधुर प्रवाहात
सूर तुझे मज ऐकू येतात 
अन चाफ्याच्या त्या फुलावरती 
श्वास माझे खिळून राहतात!


असंच!

मावळणाऱ्या त्या सूर्यामध्ये
मन माझे तुला पाहत राहते
सागराच्या त्या लाटांमध्ये
स्पर्श तुझा शोधत राहते!

Inner Pain..


It Hurts me inside...Faraway Down to the Heart...The Unspoken Feeling...The truth of my very own.....Tortures me in and out...And my eyes....that never lie...can nobody read!

The sorrow, the pensive sadness....Burning me...the charges in eyelids..Shining like stars in dark sky, and for whom they are...can not REALISE it!

The frequency changed....the wavelengths varied...slowly and drastically...the world changed in seconds....and changed forever...I sigh...Whenever I think of you...I sigh...Whenever I try to forget you!

Once The Reason behind my Smile is the reason behind my tears now, Ohh Almighty! Please take me out from this prison..I wanna fly....in this open sky...high and high!
Mahesh.

आत्महत्या!

आत्महत्या! कायद्याने गुन्हा!
कोणी केला हा कायदा? आणि कशासाठी?
एखाद्या व्यक्तीची जर जगण्याची उम्मेदच संपली असेल, स्वत:च्या जगण्यावर, केलेल्या चुकांचा पश्चाताप होत असेल, दुसरा कुठलाच मार्ग समोर नसेल आणि स्वत:ला मुक्त करवून घ्यायचे असेल तर त्याला कशासाठी अडवायचे? आपला जन्म तर आपल्या हातात नसतो, किमान आपला मृत्यू तरी आपल्या हातात असावा!

आत्महत्या।
कोन करतो आत्महत्या? आणि का करतो? अशा कोणत्या भयंकर अडचणी त्या वव्यक्तीसमोर असतात कि त्यातून तो बाहेरच येऊ शकत नाही, आणि जीव देणे हाच एक पर्याय त्याच्यासमोर शिल्लक असतो?
काय विचार येत असेल त्याच्या मनात जीव येताना? कसले विचारांचे वादळ सुरु असेल।
स्वत:चा जीव देणे इतके सोपे असते? समस्या सोडविण्याची हिम्मत नसलेल्या व्यक्तीमध्ये स्वत:चा जीव देण्यासाठी लागणारी एवढी प्रचंड शक्ती कोठून येते? आणि त्याने जीव दिल्यानंतर त्या अडचणी संपतात?
आणि जीव देताना जर कुणीतरी वाचवले तर?

असंच!

सवय झालीय आता ....या भयाण एकांताची ! चार चौघे मोठ्याने बोलताना ऐकले कि गोंगाट वाटतो...गर्दीत जीव घुसमटतो...गुदमरतो...डोक्यात मुंग्या होतात॥
आता सवय झालीय या अंधाराची.....स्वत:ला चार भिंती कोंडून घेऊन....कधी कधी बोलतो मी या स्तब्ध भिंतींशी ...धाय मोकळून रडतो...मनसोक्त...कुणास ठाऊक, एखाद्या दिवशी त्या भिंतीनाही वाचा फुटेल...पाझर फुटेल...
सवय झालीय आता...मनातल्या मनात बोलण्याची....मनातले विचार, भावना मनातच मारून टाकण्याची....!! अगदीच असह्य झालं तर लिहितो असंच कुठेतरी...काहीतरी..मनात येयील ते...
सवय झालीय आता...या रहाटगी जीवनाची...कुठल्या तरी जगावेगळ्या छंदात स्वत:ला गुरफटून टाकतो हल्ली। तेवढंच मनाला थोडा विरंगुळा!!
हा विकार आहे कि मनस्थिती? काय हवंय मला? कोणाकडून? आणि कशासाठी?
ह्या असल्या वादळात जर स्वत:ला वेळीच सावरू शकलो नाही तर काय होईल कुणास ठाऊक?

ती...

माझ्या श्वासात ती...
माझ्या भासात ती...

माझ्या मनात ती..
माझ्या ध्यानात ती...

माझ्या जगात ती...
माझ्या स्वप्नात ती...

माझ्या असण्यात ती..
माझ्या नसण्यात ती..

माझ्या डोळ्यांत ती...
माझ्या ओठात ती...

माझ्या लेखणीत ती..
माझ्या कागदावर ती...

माझ्या नसा-नसात ती...
माझ्या धमन्यांत ती...

माझ्या काळजात ती...
अन माझ्या हृदयातही...तीच!

महेश...

कातरवेळ

दिवस मावळतीला जातो...उन ओसरू लागतं...वातावरणात भयाण शांतता....कातरवेळ...आठवणींचे वादळ...एखाद्या वावटळीत पाला-पाचोळा उडून उंच आकाशात कुठेतरी आपलं अस्तित्व गमावून भरकटत जातो, तसं आपलं मन भरकटत जातं!
कानात घुमतो...तिच्या पैंजणांचा आवाज, तिचे मधुर सूर, तिचं निखळ हास्य..निरागस भाव.....तिच्या स्पर्शाची जाणीव होते..अंगावर काटा येतो...
आज माझ्याकडे सर्व काही आहे...पण त्यावेळी...
मी...एक परिस्थिती समोर झुकलेला... हतबल झालेला ... मनात भीती...माझ्यामुळे तिचे आयुष्य तर उध्वस्त नाही नं होणार?
तिचे निस्सीम प्रेम आणि निष्ठा सुद्धा मला आधार देऊ शकली नाही...का मीच तो आधार नाकारला?
एक निर्णय...बरोबर कि चूक कुणास ठाऊक?...पण त्या निर्णयामुळे...मी आज अपूर्णच राहिलो...
तिची सोबत मिळायला हवी होती....निरंतर !!!

शेकोटी

हिवाळ्यातल्या गारठ्यात
पहाटच्या पारी...
म्हातारं बिगीनं उठलं!

पाला-पाचूळा गोळा केला..
काडी लावली..
बिडी शिलगवली!

तोंडाच्या चंबूतून
धुराची धुराडी
धुईत मिसळली...

एक एक काडी पेट्विताना
एक एक आठवण
धडाधडा जळाय लागली..

मुठभर पाचूळ्यात
उरलेल्या आयुष्याची
चित्र दिसाया लागली!

जळक्या शेकोटीवर
डोळ्यासमोर सवताचीच
चिता जळाय लागली..

तुझ्या आठवाचे पाखरू..

तुझ्या आठवाचे पाखरू
दूर कुठे उडोनी गेले
ना त्याचा ठाव-ठिकाणा
अनोळखी ते झाले...

आज अवकाळी पावसात
भिजुनी चिंब ओले
वाट चुकल्यासारखे
माझ्या अंगणी आले...

त्या आठ्वाच्या पाखरा
मी अश्रुंचे दाने टाकले
दाने टाकता टाकता
माझे अश्रूही आज आटले..!
महेश

दवबिंदू

जगण्याच्या पलीकडेही एकदा पहायचय जगून
पावसासोबत दवबिंदूवरही प्रेम पहायचय करून!

पाउस काय, जातो काही काळ सुख देऊन!
दवबिंदू मात्र रोज येतो आपले प्रेम घेऊन!

मग मनही म्हणतं,
एकदातरी दवबिंदूसाठी पावसावरचं प्रेम सोड,
कारण त्याचं क्षणिक
पुसटसं अस्तित्वही मनाला लावतं ओढ!
(एका दवबिंदूच्या प्रेमास आसुसलेली पाकळी!)


असंच!

तुझ्या सुरांची ती मैफिल
दूर कुठे विरून गेली..
मनी दाटलेल्या आठवणींना
आज डोळ्यांनी वाट दिली..
आठवणींच्या चांदण्यात
मन भरकटून आले
तुटताना एका चांदणीला
मी तन्मयतेने पहिले..!

असंच!

तुझ्या अंतरीचे चांदणे
तुझ्या डोळ्यांत मी पाहतो
अमावस्येच्या रात्री
चांदण्यात नाहतो..
भाव तुझ्या मनीचे
ओठांवर यावे
माझ्या मनीचे सूर
तुझ्या ओठांत सुरावे..

सहजच.....

रात्री तुझ्या डोळ्यांत पाहताना,
आकाशीचा चंद्र जणु हासत होता,
जरा जवळ जाउन पाहीलं,
तर तुझ्या ऐवजी,
चंद्रच लाजताना दिसत होता......

असंच!

शब्द झाले मुके
तेव्हा नयन बोलू लागले
तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत
माझे मन जागू लागले..
केलीस काय जादू
माझे मला कळेना
माझ्या मनाचा ठाव
मलाच आता मिळेना..!

असंच!

तिच्या प्रेमात मी स्वत:ला
दुखाच्या सागरात लोटले
तिच्या आठवणीत रडून
आज अश्रुही आटले!

असंच!

खूप पूर्वी एका उघडा-नागडा म्हातारा सांगून गेला..."कुणी आपल्या एका गालात (मुस्कटात) हाणली तर दुसरा गाल पुढे करावा!"
हल्लीच्या पिढीला त्या म्हातार्याचे विचार पटत नाहीत!

ऐसेही!

उसकी याद तो अब
दिलमे इक कसक बन के रह गयी!
थी जो आँखों में कैद उसकी तस्वीर,
वो भी आज आंसुओं संग बह गयी!
महेश.

ऐसेही!

तुम्हारी दुनिया से अब हाँ दूर चले जायेंगे
अश्क छुपाने का कोई बहाना नहीं आता!

कहाँ कहाँ ढूंडोगे मुझे
उड़ते पंछियों का कोई ठिकाना नहीं होता!
महेश.

ऐसेही!

हमसे जुदाई का कभी गम न करना...
दुनिया में कुछ लोग तो सिर्फ जाने के लिएही आते है!

असंच!

नात्यांच्या बाजारात
भावना कवडीमोल येथे..
आपल्यांच्याच किरकीरीत
मन मात्र अबोल येथे..

दुखऱ्या चेहऱ्यावर..
खोटा मुखवटा येथे..
ओठांवर उदार हास्य..
हृदयात खुपती वेदना येथे..
महेश..

ऐसेही!

हम रहते है आपकी आँखों में
आपकी आँखों का सपना बनके!
कभी रोयियेगा नहीं आप,
कहीं गिर न जाएँ हम
आपकी आँखों का आंसू बनके !

ऐसेही!

किनारे के सुकून से हमें इंकार तो नहीं,
मगर तूफान से कश्ती निकालने का मजा ही कुछ और है..!

ऐसेही!

आज सो जाऊ तो मुझे नं जगाना यारो...
ख्वाबोमें हि सही, अब उसी के साथ जीना है!

ऐसेही!

जलते है जिस आग मे लाखो दिल..
इश्क उसका नाम है!
महेश.

ऐसेही!

राते भी कितनी तनहा हो गयी...
अब सपनो में भी उनका आना-जाना नही होता!