Mann Maze

Mann Maze

याला प्रेम म्हणावे...कि आणखी काही...

आज संध्याकाळी माझ्या एका ऑफिस कलीग सोबत थोडे (जो कि येत्या काही दिवसात कंपनी सोडून दुसरी जॉईन करीत आहे) पार्टीला गेलो असताना एक विलक्षण धक्का मला बसला..
आज का कुणास ठाऊक, त्याने त्याची स्टोरी सांगितली...तो मुळचा ओरिसातील दुर्गम भागातून आहे...जीओलोजीस्ट...त्याचा प्रेम-विवाह ८ वर्षापूर्वी झाला...त्याच्या आई-वडिलांच्या संमतीने..
त्याच्या प्रेयसीच्या हृदयाला लहानपणापासून छेद आहे..एक मेजर हार्ट सर्जरी झाली आहे आणि दर २१ दिवसाला एक इंजेक्शन तिला घ्यावे लागते...हे माहिती असून हि त्याचे तिच्यावर प्रेम झाले..,.तिने नकार दिला..कारण आपल्यामुळे कुणाचे आयुष्य उध्वस्र व्हावे अशी तिची इच्छा नव्हती...पण त्याला तीच आवडली..
तीच्या आई-वडिलांनी तिला तिचा मेडिकल खर्च न पेलल्यामुळे एका मठात सोडली होती..ती दिसायला सुंदर आहे..वेल एजुकेतेड आहे... आणि त्यापेक्षाही सुंदर कविता ती करते...याने तिला लग्नासाठी मागणी घातली आणि आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली..त्याच्या आई-वडिलांनी निर्णय त्याच्यावर सोपवला....तिच्या निर्णयाची दखल घेण्यासाठी तिला कुणीच नव्हते...
त्याने तिच्यासोबत लग्न केले आणि बंगलोरला आला ....मी कित्येकदा त्या दोघानाही भेटलो..त्यांचा घरी गेलो..त्यांचा तो संसार पाहून मीदेखील माझ्या भावी संसाराविषयी कित्येक स्वप्न रंगवली...पण त्यांच्या सुखी संसारामागे हि हृदयद्रावक स्टोरी असेल असे कधीच वाटले नाही...तिचे expected आयुष्य काही वर्ष-काही महिने किंवा कदाचित काही दिवसच आहे...ती फक्त त्याच्या प्रेमावर जगते..आणि तो तिच्या आशेवर...अशी शक्ती हल्ली किती जणांकडे असते? याला प्रेम म्हणावे...कि याला आणखी काही शब्द आहे?

आम्ही मऱ्हाठी मऱ्हाठी


आम्ही मऱ्हाठी मऱ्हाठी
कोकणी-खानदेशी-घाटी
हात पोलादी अमुचे
अन निधडी अमुची छाती!
निर्झर-निर्मळ पाणी अन
सुपीक इथली माती..
वाणीत अमुच्या गोडवा
अन गोड अमुची नाती!
लाभले भाग्य आम्हास
बोलतो आम्ही मराठी
जय जय महाराष्ट्र माझा
युगे-युगे इथे गाती...!
महेश

जवा म्या ल्हान व्हतो..

दोस्ताहू,
जवा म्या ल्हान व्हतो
रोज रानामंदी जायचो
दुपारच्या पारीला जेवण करून
आंब्याच्या झाडाच्या सावलीत
ढाराढूर झोपायचो
आता म्या मोठा झालो
सकाळी उठतो, आफिसात जातो,
एसीत बसतो, चमच्यानं खातो
दुपारच्या पारीला हाफिसात
डुकल्या आल्या कि
तोंडावर पाणी मारून पुना
काम्पीटर मधी तोंड खुपसून बसतो!

प्रिये..

तुझ्या झुकलेल्या नजरेतून
कधीतरी माझ्याकडे पाहशील का?
मरतो तुझ्या हास्यावर
कधी माझ्यासाठी निखळ हसशील का?
तुझेच गीत मी सदा गातो
माझ्यासाठी कधी गाशील का?
मी तर तुझ्या स्वप्नात बुडालेला
एखाद्या रात्री मलाही
स्वप्नात तुझ्या पाहशील का?
मी तर केव्हाचा तुझाच झालोय
कधी माझ्या रंगात तू
मुक्तपणे रंगशील का?
महेश

मृगजळ

मी केले प्रेम तुझ्यावर
गेलो क्षितिजाच्याही पलीकडे
ती हसून म्हणाली
तुझ्यासारखेच तुझे प्रेमही वेडे!
क्षितिजापाशी तरी
आभाळ जमिनीस का टेकते कधी?
मरेपर्यंत धाऊनहि त्या हरीणास
मृगजळ का भेटते कधी?
महेश.

पहिल्या प्रेमात

पहिल्या प्रेमात
मन गरुड पक्षी होऊन
उंच आकाशात उडते!
आकाशाला गवसणी घालायची
अनोखी स्वप्नं बघू लागते!
दिवसा-ढवळ्या चांदण्यात
फिरून येते!
मित्रांच्या गर्दीतही ते
"ती"ला शोधत राहते!
पावसात भिजताना
प्रत्येक सरीत ते
'ती"लाच पाहते!
पहिल्या प्रेमात जणू काही
ते "ती"च्या साठीच जगते!

असंच..

पाहुनी चांदणीचे प्रतिबिंब
तो चंद्र किती मग हसला
चांदणीस घेऊन सोबत
पुन्हा त्या ढगा आड लपला!

असंच..

काळ्या कुट्ट ढगात तो चंद्र कुठे हरवला?
चांदणीच्या शोधात कुठे कुठे भटकला
दोघांचे पाहून ते निस्सीम प्रेम
तो मेघही अवेळी रडू लागला!

असंच..

सागराच्या किनाऱ्यावर उभा मी
पायावर आदळती लाटा
आठवतो तुझा स्पर्श
अंगावर येई काटा!

असंच..

आठवणींच्या सागरात बुडालो
अंगावरी आला काटा
वाळू निसटून गेली
पायावर आदळल्या लाटा!

असंच..

खुपणाऱ्या ते वेदनांना
भावनांचा ठाव नसतो...
अन मनातील त्या आठवांमध्ये
दुखाचा गाव असतो!

असंच..

स्वप्नात तुझ्यासोबत
जागतो बोलतो मी
अन सकाळी पुन्हा
एकटा एकटा पडतो मी!

असंच..

मी तुला तुझ्या आठवणी सकट
माझ्या अंतरित कोरली
वर्षे उलटून गेली
पण तुझी एकही आठवण
...अजून नाही विरली!

असंच..

मीही तुटतो पुरता आठवून ती स्वप्ने
शल्य माझ्या मनीचे सांगेल कोण तिला?

असंच..

(पाऊस म्हणतो)
ती पाहते माझी वाट
तिची प्रीतही वाटते मज खरी..
मग मी हि जातो बरसून
मुक्त, होऊन वळवाच्या सरी!

असंच..

या अवकाळी पावसात
तो वृक्ष उन्मळून पडला
ती वेल बिचारी हळवी
बहरण्या पूर्वी अनर्थ घडला!

असंच..

अवकाळी पावसात
तो मेघही साक्ष देई
धरणीस चुम्बिण्यास जणू
ती विद्युल्लता धाव घेई!

असंच..

आठवतो मला तो पावसाळा
अन तू चिंब भिजलेली
अन तुला पाहून माझी नजर
वेड्यागत थिजलेली!

असंच..

तुझी भेट व्हावी अशी अचानक
जशा वळवाच्या सरी अवकाळी
बांध फुटावे भावनांचे
धुंद अशा त्या कातरवेळी!

असंच..

तुझी याद आली अवेळी अशी कि
जसे चांदण्यांनी दुपारीच यावे!
तुझा असा सुगंध दरवळला चोहीकडे कि
जसे कस्तुरी मृगाने नाचत यावे!

असंच..

इन्सान खून का प्यासा
क़त्ल करे सर-ए-आम
गर है तू खुदा इस इन्सान का
तो तू खुदा हमें मंजूर नहीं!

वेदना..

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन शमल्या असत्या तर
कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती!
शब्दांचा आधार घेऊन जर दु:खं व्यक्त करता आली असती
तर कदाचित अश्रूंची गरज कधी भासलीच नसती!
Anonymous....

असंच..

पाणी बरसलं कि त्याचं
आसवांशी नातं जुळतं
अन डोळ्यांतून बरसताना मात्र
तेही त्यात विरघळून जातं!

असंच..

टाळीला जेव्हा टाळीही मी देतो
खांद्यालाही खांदा सहज मी जुळवतो,
कमवून मित्र अनेक, कधी एक गमवतो
तेव्हा ओढ्यात बसून डबक्यात पाहतो!

शल्य..


तीचे ओठ नेहमी अबोल
डोळे मात्र बोलके
हसते कधी गालांत
डोळ्यांतून मोती झळके!

पंख मिळाले परीचे
परी उडण्याचे स्वातंत्र्य संपले
शल्य तिच्या मनीचे
का कुणी न जाणले?

सौंदर्याला भाळले किती
मनात कुणी न पाहिले
हृदयात दाटले भाव
परी ओठांतच राहिले!
महेश..

असंच...

मृगजळाच्या पाठी
विराण वाळवंटात धावतो
मरतो कुणी प्रेमात
कुणी प्रेमात इथे मरतो..!

बेवफाई

गजरा तुझ्याच नावाचा, परी माळला दुसऱ्या हातून
डोळ्यांत साठ्लास तूच माझे अश्रू होऊन
तुझ्या सुखापाई मी माझ्या भावनांना चुरडले
तुझ्या बेवफाईच्या इलजामाने गजर्यातील फुलही मुरडले..!
......महेश

गारा...



संध्याकाळी अचानक
मेघ भरुन आले
अवकाळी पावसांत
तन-मन भिजुन गेले...
...सुसाट वार्यासोबत
आठवणींची धुळ उडाली
स्पर्श तिचा आठवता
वीजही कडाडली....
त्या टपोर्या गारांनी
रस्त्यावर डाव मांडला
डोळ्यांतला पाउस
आज अवकाळी सांडला...
येशिल तु पुन्हा
म्हणुन मी भिजतो..
तुझ्यासाठी पावसात
गारा मी वेचतो..
तळहातावरील त्या गारा
काहीकाळ तिथेच रेंगाळल्या
मग तुझ्यासारख्याच त्याही
क्षणात विरघळुन गेल्या...
डोळ्यांतुन पाउस बरसला
वार्याचा लगाम सुटला
मनातील अशोकव्रक्ष
क्षणांत उन्मळुन कोसळला...
महेश.

असंच...

वाटते मला कधी
गारा होऊन बरसावे
तुझ्या गुलाबी हातानी मला वेचावे
अन तुझ्या ओठांत मी विरघळून जावे..!

असंच...

तुझ्यासाठी रातदिन जागून केलेल्या कविता
एकदा तरी वाचून बघ...
माझ्यासोबत मनसोक्त
पावसात एकदा नाचून तरी बघ...
मी तर तुझ्याच साठी जगतो आहे
एक दिवस का होईना
माझ्यासाठी जगून बघ..

असंच...

श्रावणातल्या त्या सरीत
तुझं चिंब भिजून नाचणं..
अन तुझ्या भिजलेल्या चेहर्याला
माझ्या डोळ्यांनी वाचणं...
...महेश

इज्जत


पोटात आग पेटली
डोळ्यात अश्रू आटले..
रखरखत्या उन्हात
आज आभाळ फाटले..
माझ्या अब्रूची कशी
वेशीवर लक्तरे टांगली..
अन गल्ली-बोळातून सारे
नराधम पांगली....

कशी विझवू माझी भूक
ती भाकरीच विटलेली..
कशी झाकू माझी लाज
आज चोळीच फाटलेली..

कशा पचवू या नजरा
हरएक नजरच बाटलेली..
कुणी देता का हो मला
माझी इज्जत लुटलेली..!!
महेश

The Blues


When the shoe String breaks

On one of your shoes

And you’re in hurry-

That’s the blues!

When you lose

The ticket u purchased

And the ticket collector checks u

In the train-

That’s the blues!

When you go to buy a candy bar

And you’ve lost the Rupee you had-

Slipped through a hole in your pocket somewhere-

In parlour-

That’s the blues, too, and bad!

When you walk on the street

And you see a Missy with perfume

Crossing across you-

Your heart pulled in her-

That’s the blues, too, for no good reason!

Mahesh

You Do Not Know

Because my hands

Are bound by limits,

You do not know

(In the Blue Sky)

I fly?

Because my mouth

Is wide with Laughter

And my throat

Is deep with song,

You do not think

I suffer after

I have held my pain

So long?

Because my mouth

Is wide with laughter,

You do not hear

My hear cry?

Because my feet

Are gay with dancing,

You do not know

I die?

(Gay=feeling of cheer)

Mahesh

Faraway Down

Faraway Down

Wine Comes in at the Mouth

And love comes in at the Eye;

That’s all we shall know for truth

Before we grow old and die.

I lift the glass to my mouth,

I look at you, and I sigh.

Your smile at me

Hurts me inside,

And takes me somewhere faraway down,

I can’t get back to me

I lose me in u;

Sip clung in my pharynx

And charges in eyelids,

I look at you, and sigh.

Mahesh

भारतीय शेतकरी, सरकारी धोरणे आणि समाज

मित्रहो, हा लेख प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पण एक वेगळ्या विषयावर लिहित आहे. "भारत" या कृषिप्रधान देशात कृषिविषयक सरकारी धोरणांमुळे समाज आणि शेतकरी यांच्यात बरेच गैरसमज होऊन जी फुट पडलेली आहे त्यावर थोडासा प्रकश टाकण्याच्या हेतूने हा लेख तुमच्यासमोर समर्पित.

कृषी उत्पादनाची किंमत ठरविण्यासाठी कृषी मंत्रालयान्तर्गत Commission for Africultural Costs and Prices (CACP) ची स्थापना १९८५ साली करण्यात आली. यानुसार भारतातील सर्व मार्केटचा सर्वे करून कृषी मालाची किमत ठरवली जाते. आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत त्या किमतीवर नियंत्रण ठेवले जाते.

जीवनावश्यक वस्तू काद्यानुसार सर्व कृषी उत्पादने हि खाद्यान्न समजून त्याची किमत ठरविण्याचा अधिकार सरकारकडे राखून ठेवण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यास हे उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, उदा.बी-बियाणे, रासायनिक खाते, औषधे, कामगार, वाहतूक, वीज, दलाली यांच्या किमती आणि मालाची किंमत यामध्ये अशी काही तफावत निर्माण झाली आहे कि कृषिविषयक धोरणे हि फक्त शेतकर्यासाठीच आहेत आणि खासगी कंपन्यासाठी नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे.

१९९९ मध्ये "गहू" या धान्याची किंमत (CACP) ने ठरविल्या प्रमाणे १००० रु. प्रती क्विंटल होती. त्यावेळी, साधारणत: खताची पिशवी रु. २००, केमिकल १५० रु, कामगार वेतन ३० रु प्रती दिवस, वाहतूक ३ रु. प्रती किमी आणि दलाली २% अशी होती. १० वर्षानंतर म्हणजे २००९ साली, गहू १२०० रु. प्रती क्विंटल खताची पिशवी रु.४५०, केमिकल १००० रु, कामगार वेतन १२० रु. प्रती दिवस, वाहतूक ८ रु प्रती किमी. आणि दलाली ५%.

म्हणजे, मालाची किमत सरासरी २०% नि वाढली पण माल तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंमत सरासरी १००-१५०% नि वाढली. यामुळे, शेतकरी जो कि पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे तो दरवर्षी तोट्यात येऊ लागला, शिवाय कर्ज घेऊन शेती करताना ते परत फेडू न शकल्या मुळे तो स्वत:ला गळफास लाऊन घेऊ लागला.

आजची स्थिती, खाद्य मालाच्या किमती वाढल्या म्हणजे महागाई वाढली असा एक सर्वमान्य गैरसमज समाजात झाला आहे. १० रु. किलो बटाटे घेताना आपण जेवढा विचार करतो तेवढा २०रु चे Lays चे घेताना करतो का? १ किलो कांदे घेताना जेवढा विचार आपण करतो तेवढा विचार फेअर अंड लवली घेताना करतो का? यापैकी जीवनावश्यक गोष्ट कोणती?

आज सर्व समाज कृषी मंत्र्याला दोष देत आहे कि तो महागाई नियंत्रणात आणू शकत नाही वगैरे. अरे कृषी मंत्री काय अंडे देणारी कोंबडी आहे का? देशात कांद्याचे उत्पन्नच कमी असेल तर तो काय करील? का पुन्हा कांद्याचा भाव कमी करून शेतकऱ्याच्या पोटावर त्याने पाय द्यावा?

मध्यंतरी एकाने फेसबुकवर एक शेतकरी कांद्याच्या ढिगावर बसलेला फोटा टाकून त्याच्या खाली "लाख्या शेठ"असे कुत्सित बुद्धीने लिहिले होते. एकाने "कांद्याने आणले डोळ्यांना पाणी" असे लिहिले होते. आणि त्याखाली १००-२०० कॉमेंट्स. अरे वर्षभर कांद्याचा भाव ५रु प्रती किलो असतो तेव्हा कुठे जाते तुमच्या डोळ्याचे पाणी? तेव्हा कुणीच ब्र सुद्धा काढीत नाही. तेव्हा कृषी मंत्र्याच्या नावाने का बोंबा ठोकत नाहीत? आणि जेव्हा उच्च शिक्षित लोकच अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या विरुध्द लिखाण करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची दया येते. मग त्यांना खी बोलले कि म्हणणार , शेतकर्यांना यातले काहीच मिळत नाही, सगळे व्यापारीच गिळून टाकतो. अरे, मग एवढी सुबुद्धी असेल तर त्या व्यापाऱ्याच्या विरोधात आवाज उठवा ना! आणि शेतकर्याला त्यातले काहीच मिळत नाही हे असा तर्क कसलाही अभ्यास नसताना का काढावा? शेतकऱ्याला मिळालेल्या किमती पैकी हातावर रोख निव्वळ नफा किती राहतो याचा अभ्यास नसताना सुद्धा असे म्हणणे योग्य आहे का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर गंभीर पणे विचार व्हयला हवा.

यामध्ये सरकारी धोरणाचा बहुतांशी दोष आहे यात शंका नाही पण समाजाचेहि शेतकऱ्यांच्या प्रती काही कर्तव्य नाही का? का शेतकरी सुधारुच नये असा काही मानस आहे का? सरकारी लोकांचे पगार १ वर्षात ३ वेळा वाढतात तेव्हा शेतकरी त्यांच्या विरोधात बोंबा ठोकतो का?

शेतकरी हा सुद्धा समाजाचा घटक आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आणि सुशिक्षित लोकांनी तर शेतकऱ्यांच्या विरोधात बोलताना १०० वेळा विचार करून मगच बोलले पाहिजे. तरच शेतकऱ्यांना खर्या अर्थाने त्यांचे सामजिक स्थान आणि महत्व परत मिळेल.


(मी स्वत: मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा कृषी अभियांत्रिकी (Agriculture Engineering ) शाखेचा पदवीधर आहे आणि एक प्रगत शेतकरीही आहे, सोबत एका अंतर राष्ट्रीय कंपनीत संलग्न क्षेत्रात कार्यरत आहे. शिवाय माझे वडील हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून M Sc Agri असून शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघटना यासाठी बरीच वर्षे कार्य केले आहे. ३ वर्षानंतर प्रथमच या विषयावर लिखाण केले आहे.कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व...महेश हौळ पाटील, उस्मानाबाद )


वीज पडली...तिथेही...अन इथेही....!

आज च्या किस्स डे च्या मुहूर्तावर...! एक गोष्ट...


सन्ध्याकाळचे ४-४.३० वाजले असतिल.

ती त्याला गर्ल्स होस्टेल मधुन एसएमएस करते.

ती: काय करत आहेस?

तो: काही नाहि. आत्ताच झोपितुन उठलो.

ती:चल फ़िरायला जाउया. मला खुप बोर होतय!

तो: अत्ता? यावेळि? नको...नन्तर कधितरि जाउ!

ती: चल ना रे.....असे काय करतोस? १५ मिनिटात तयार होउन ये. मी गर्ल्स होस्टेलच्या गेट समोर वाट पाहते.

तो आनि ती...दोघेहि मित्र..फ़क्त मित्र...त्याच्या मनात तिच्याविषयी काहि नाहि...तिच्या मनात त्याच्या विषयी काय आहे...महिती नाहि!

तो तयार होउन गर्ल्स होस्टेलच्या गेटसमोर जातो...ती अजुन आलेलि नसते...या मुली नेहमी अशाच....स्वत: भेटायला बोलावुन स्वत:च लेट! तितक्यात ति होस्टेलच्या बाहेर येताना दिसते! तिने आज पान्ढरा पन्जाबी ड्रेस घातला होता...नेहमी पेक्शा तिचे सौन्दर्य आज खुलुन दिसत होते...तो आपला शोर्ट चड्डी आनि टीशर्ट घालुन आलेला...त्याला जरा कसंतरीच वाटलं! पन ती काही बोलली नाही!

ती: चल..

तो: कुठे जानार?

ती: इन्स्टिट्युट च्या पाठिमागे...अमराईत....

तो: चला.....

अन मग ती दोघे चालत रहिली...ती बोलत राहते...तो नुसते ऐकत राहतो..तिच्या प्रश्नांची तुटक तुटक उत्तरे देतो...नेहमी बड्बड करणारा तो...आज मात्र एकदम शांत....तो पाहतो...तिचे मनमोकळे हास्य आनि हसताना गालावर पडनारि खळी...फ़क्त पाहत राहतो....त्या मन्द वार्याबरोबर उडनारे तिचे केस.....तिच्या कानातल्या त्या झुमक्यांचा आणि पायातील पैंजनांचा तो आवाज...

सुर्य मावळतीला आलेला...तो भानावर येतो...वर पाहतो तर...ढग अचानक भरुन आलेले...अवकाळी पाउस येण्याची दाट शक्यता...

तो: चल परत जाउया...खुप उशीर झाला आहे...

ती: असे रे काय करतोस?...लगेच परत...ते झाड आहे ना...तिथपर्यंत जाउ...अन मग...

तो: ओ.के....

पुन्हा ती बोलत राहते...तो नुसते ऐकत राहतो...वार्याचा वेग वाढु लागतो...ढग हळुहळु गरजायला सुरुवात करतात...सुर्य केव्हाच मावळुन गेलेला...पाउस येणार यात शंका नाहि...

तो: चल...परत जाउ...पाउस येईल बहुतेक....

ती: येउदे...आज मला भिजायचंय...मनसोक्त भिजायचंय....मला पाउस खुप आवड्तो...(आणि ती बोलत रहिली)

वार्याचा वेग आता वाढला...तिच्या मनात आता अनामिक भिती...दोघांमधिल अंतर हळुहळु कमी होउ लागले....आणि....आला....पाउस आला...दोघेही चिम्ब भिजले....त्याने तिला पाहिले...ती पावसाचा आनंद घेन्यात मग्न...तिचा पांढरा ड्रेस भिजल्यामुळे पारदर्शक झाला...तिचे मादक सौंदर्य....त्याचि नजर क्षणभर तिच्यावर खिळली...तिच्या गलावरुन, ओठावरुन ओघळनारे ते पावसाच्या पाण्याचे थेम्ब आपल्या ओठांनी अलगद टीपावे असा मोह त्याला झाला...क्षणभरच...अन लगेच तो पुन्हा भानावर...

अभाळ झकाळुन गेले...ढग वेड्यसारखे गरजु लागले...लक्ख वीजा चमकु लागल्या...वारा आक्राळ-विक्राळ रुप धारण करुन झाडांना हेलकावे देउ लागला...

पावसाचा वेग वाढला..आता मात्र ती पुरती घाबरली....

ती: चल परत जाउ...मला भीती वाटत आहे...

भितीने ती त्याच्या अगदिच जवळुन..त्याला चिकटुन चालु लागते...त्याचा हात ती केव्हा तिच्या हातात घेते..दोघांनाही समजत नाहि...

त्याच्या मनात एक वादळ...भावनांचे वादळ...पण मनावर ताबा....तिच्या मनात भिती...

वार्याचा वेग वाढतो...पावसाचाही वेग वाढतो...ती त्याचा हात आनखि घट्ट पकडते...

दोघे एकमेकांकडे पाहतात..क्षणभरच...

तितक्यात...तितक्यात...तो मेघराज कर्ण-कर्कश गरजतो..आणि ती सौदामिनी धरतीचे चुंबन घेण्याकरिता आकशातुन धावते...घाबरुन ती त्याला मीठी मारते...तो स्तब्ध...! मग हळुच त्याचेही हात तिच्या कवे भोवती...नकळत...धरणी आणि सौदामिनी यांच्या मिलनाच्या मधे आलेला तो कडु-निंबाचा व्रुक्ष क्षणात जाळून खाक होतो.....

ढग गरजत राहतात..वारा पुन्हा सोसाट्याने वाहु लागतो...पाउस बेधुंद होउन मनसोक्त बरसतो...दोघे एकमेकांच्या डोळ्यांत पाहतात..

नजरेत नजर....श्वासात श्वास....तिच्या भावना अनावर होतात...तिचे ओठ...त्याच्या ओठांवर...३-४-५...सेकन्द....वीज पडली...तिथेही...अन इथेही...!...दोघेही भनावर येतात..

तो कडु-निम्बाचा व्रुक्ष...जळुन खाक होतो...उन्मळुन पडतो...!पावसाचा वेग कमी होतो....अग्नी शान्त होतो..

ती त्याच्याकडे पाहते...मग गालांत हसुन लाजते..आणि मागे फ़िरुन मागे वळुन न पाहता धावत जाते...तिच्या होस्टेल कडे...

तो तिथेच बराच वेळ उभा राहतो..वेड्यासारखा....स्तब्ध! वीज पडली...तिथेही...अन इथेही....!


महेश….

२३ मे २००६

बोकडाचं काळीज


आनंद...गावातली चिली-पिली त्याला "आन्द्या" म्हनायची..तिसरीची परीक्शा झाली अन आन्द्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या..

माय गाभन शेळी घेउन दुसर्याच्या रानात रोजानं जायची...८ दिवसात शेळीनं एका तांबड्या-काळ्या बोकडाला जन्म दिला अन १५ दिवसात खरकुत येउन मेली...आन्द्या बोकड घेउन मायीसंगं रानात जायचा...बोकडासाठी बाभळीच्या शेन्गा पाडुन त्याला खायला घालायचा..वाण्याच्या शेतातल्या तुरीच्या शेंगा चोरुन बोकडाला खाउ घालायचा...बोकड डोळे मिचकावित गपागप खायचं..दिड-दोन महेन्यात बोकड एकदम तयार दिसु लागलं..आन्द्याचं न त्या बोकडाचं असं काय नातं जुडलं कि २४ तास दोघं बी सोबतंच असायचे..जणु काय दोघांचं काळिज एकच....आन्द्या दिवसभर त्या बोकडासंगं गप्पा मारायचा..बोकड त्यच्या गोबर्या गालाला चाटायचं...रातच्याला झोपताना बोकड आन्द्याच्या जवळच झोपायचं..

शनिवारी रात्री अचानक आन्द्याचा मामा वाडीहुन तेच्या पोराच्या जावळाचं आवतण घिउन आला..मामा चांगला गबरगंड सावकार होता..."आक्के, सोमवारी तु आन आन्द्यानं सकाळीच यायचं बर का..." मामा म्हनला..बसल्या बसल्या त्येची नजर आन्द्या अन बोकडाकड गेली.."बोकड चांगलंच तयार झालंय गं आक्के...१४-१५ किलो तर मटन सहज पडल बघ.." माय म्हनली,"आन्द्याचा लय जीव हाय त्या बोकडावर, म्या बोकड ईकणार न्हाय..."जेवणं उरकुन माय आन मामा आंगणात बोलत बसले..आन्द्या अन बोकड तवर झोपी गेले..."आन्द्याची शाळा पुढल्या सोमवारी सुरु हुईल..यंदा चवथीत बसल पोरगं...त्येला नवी कापडं अन वह्या पुस्तकं घ्यावी लागत्याल..पर जवळ दमडी न्हाय, दोन-तीनशे रुपय दिलस तर लय बरं हुयील बघ..म्या हाडाची माती करुन तुझा पै-पै फ़िडुन टाकिन.." मामा म्हनला, "आक्के, तु काय मला परकी हायस व्हय गं...पर माज़्या बी घरी पोराचं जावळ हाय...जरा तंग हाय.."

मग हळुच बोकडावर नजर टाकुन मामा म्हनला,"तेवढं बोकड मला दी, आसं बी म्या बाजारातुन आणनारच व्हतो...त्या बोकडाची दोनशे रुपय आन आन्द्याला आयेर म्हनुन शाळंची कापडं म्या देतो..." माय म्हनली,"आर आन्द्याचा जीवच त्या बोकडात हाय..."

"आक्के, पोरगं ल्हान हाय आजुन, दोन-चार दिवसात जाईन इसरुन...बघ सकाळ पस्तोर इचार कर आन सांग मला..."

पहाटं-पहाटं, आन्द्या उठायच्या आत, मायीनं बोकड सोडुन मामाच्या हातात दिलं...आन्द्या उठुन बोकड हुडकाया लागला..पर बोकड काय दिसंना..गावभर हिंडला...मायीला इचारलं, वाण्याच्या शेतात, वड्याला...

दिवस मावळायच्या टायमाला घरी आला..मायीनं त्येला मामाच्या वाडीला जायचं सांगीतलं..पर आन्द्या काय तयार हुईना..मामा नवी कापडं देणार म्हनल्यावर मग कसातरी तयार झाला..

दुसर्या दिवशी येरवाळीच माय-लेक पायीच वाडीला निघाले..दिवस मावळायच्या टायमाला वाडीला पोचले..मामाच्या दारात मंडप टाकलेला..पावणं-रावळं..गर्दी..मामी लाल भडक लुगडं नेसुन मिरवत व्हती..मांमा बी त्येच्या राडयात व्हता...ह्या माय-लेकाकडं कुणाचंबी ध्यान नव्हतं..

पोराचं जावळ काढुन झालं..."मुलानी" सुरा घिउन हजर व्हता..आन्द्या मधल्या खोलीत पत्र्याकड तोंन्ड वासुन बसला व्हता..

तेवढ्यात मुलानीनं पाणी पाजुन बोकडाच्या मानंला सुरा लावला..बोकड कर्कस वरडलं...आन्द्यानं लगेच तेच्या बोकडाचा आवाज वळकला..आन पळत बाहीर जाउन बघतंय तर काय...बोकडाचं मुंडकं एकिकड अन धड एकिकड...आन्द्यानं जोरात बोम्ब ठोकली..

गड्बडा लोळाया लागला...इरसाल गावठी शिव्या हासडु लगला..माय धाउन आली..पावणं नुस्तं बघु लागली...मायीला आन्द्या काय आवरता आवरंना...मामीचा पारा चढला..."पावण्यासमोर इज्जत घातली कार्ट्यानं..शिरप्या, उचल त्या कार्ट्याला अन मधल्या खोलीत कोंडुन टाक.." मामी मायीला बी काय-काय म्हनु लागली..दोन गड्यानी मिळुन कसातरी आन्द्याला आवरला आन मधल्या खोलीत नेउन टाकला..तासाभरात खमंग आमटीचा वास सगळीकड पसरला..पावणं-रावळं मिटक्या मारुन मटन खाउ लागली..मामीनं ठरल्याप्रमाणं आन्द्याची शाळंची कापडं अन शम्भराच्या दोन नोटा मायीच्या हातावर टेकिवल्या...सगळ्याची जेवणं झाल्यावर आन्द्याला अन त्येच्या मायीला बी पंगतीत बसवलं...शिरप्यानं दोघात एक परात मायीपुढं ठिवली..मामा हातात बकेट घेउन आला..."आन्दा...पोरा असं येड्यासारकं करु नी...घी..तुझ्यपायी स्पेसल पीस काढुन ठिवला व्हता.." असं म्हनुन बोकडाचं उकड्लेलं काळीज परातीत टाकलं..

मायचा इतका येळ आवळुन धरलेला आवंढा आन डोळ्यातला पाझर फ़ुटला....काळीज फ़ाटलं....तशीच उठली, आन्द्याला काकंत घेतलं...शाळंची कापडं आन नोटा तिथंच टाकुन निघाली..झपाझप पावलं टाकीत गावाकडं..अन्धारात..अनवाणी...!


महेश....

हिशोब...जिंदगीचा...


हिशोब...जिंदगीचा...

मरीआईच्या जत्रंला

गावाकडं गेल्यावर..

अंगणातल्या तुळशीजवळ

बाजंवर पडलो व्हतो उताना…

वर थोबाड करुन आभाळतल्या चांदण्या मोजीत!

चांदण्या मोजत मोजत कवा

आठवणींच्या गटुड्यात हारवलो कळालंच नाही..!

एका एका चांदणी संगं एकेक आठवण

डोळ्यांपुढं उभी राह्यली...

पुढं पुढं जाताना मागं काय काय सुटत गेलं

त्येचा हिशोब कराया लागलो..

ती पत्र्याची शाळा

आन लाकडाचे बाकडे..

बाकड्यावर I Love You लिव्हल्यामुळं

शिंदे मास्तरनं मारलेल्या छड्या..

सावंताच्या शेतातुन चोरलेल्या काकड्या

वड्यावरच्या बंधार्यात मारलेल्या डुबक्या...

गाभुळ्या चिंचा आन पाडाचे आंबे..

बोचर्या थंडित हरभर्याचं खळं...

अन तसल्या थंडीत गव्हाच्या फ़डात सोड्लेलं पाणी...

भर उन्हाळ्यात गावच्या माळावर दिवसभर खेळलेलं क्रिकेट..

दहावीत कधी सायकल तर कधी बसने तालुक्याला मी गेलेला...

अन सोळाव्या वर्षात पाय घसरलेला..

महादेवाच्या देवळामागल्या वडाखाली..

"ती"नं माझ्यासाठी चोरुन आणलेल्या करंज्या...

पहीलं वहीलं प्रेम!....

डिग्री पायी गाव सुटलं...अन गावासंगं तिचा हात बी सुटला..

तोवर तिच्या बापानं एका मास्तरासंगं तिचं उरकुन टाकलं..

डिग्र्यावर डिग्र्या घेतल्या...आन मोट्ट्या शहरात आलो..नौकरीपायी..

आता हितं...इन-शर्ट करतो..ऒफ़िसात जातो...ए.सी.त बसतो..

चमच्यानं खातो...झोप आली कि पुना

थोबाड इसळुन..कॊम्प्युटरात तोंड खुपसुन बसतो..!

आता म्या इसरलो...

गायीचं निरसं दुध...

जवारिची भाकरी अन भेंडीची भाजी..मिरचीचा ठेचा...

आता आठवतंय फ़क्त…

म्या घरुन निघताना…

मायीचे चुलीच्या धुरानं डबडबलेले डोळे....

आन मझ्या बापाचा फ़ाटलेला खिसा...

तेवढ्यात देवीच्या देवळात काकड आरतीची घंटी वाजली..

आन दारातलं कोम्बडं बेंबीच्या देठातुन वरडलं..

थोड्या येळानं त्येच्याच रक्ताचा अभिषेक देवीला व्हनार हाय...!!

म्या केविलवाना हसतो..जिंदगीवर..आधी कोंबड्याच्या..मग माझ्या...!!


महेश...


देव बघायलाय वरुन..

आमच्या गाववाल्यांनी एकदा सप्ता करायचा ठरवला.. सगळ्यांच्या वतीनं श्रीरंग तात्याला आयोजन कमीटीचा अध्यक्ष म्हणुन निवडलं...मारुतीच्या पारावर ...तात्या अन इतर दोघं-चौघं पट्टी गोळा कराया बसले...

दोन दिवसात मोजकी पट्टी जमा झाली..महाराज अन बुवा लोकाच्या तारखा ठरल्या..तेन्च्या सुपार्या बि ठरल्या...

पर शेवटच्या काल्याच्या किर्तनाला महाराज काय मिळंना...सगळे काला-स्पेशालिस्ट महाराज बिझी...मुश्किलीनं एक बुवा मिळाला...

सुपारीत बुवा काय अड्जस्ट करीना..कशी बशी सुपारी ठरली..

सगळे गावकरी तरुण-व्रदध मंडळी जोमानं तयारीला लागली..मंडप टाकला..महाराज लोकांना किर्तनासठी व्यासपीठ..बाहेरगावहुन येणार्या भक्तांना राहण्याची-जेवणाची सोय..सगळं काही एकदम व्यवस्थित.. तात्या पळापळ करुन जाम थकुन गेले...पण एक वेगळंच समाधान चेहर्यावर झळकत होतं....अन एकदाचा सप्ता सुरु झाला..वारकरी अन संप्रदायिक मंडळी नामरंगी दंगुन गेले...किर्तनात-भजनात...हरिपाठात... एकाचढीत एक किर्तन-प्रवचन-भजन-गवळणी-भारुड....पखवाज-टाळ-म्रदंग-पेटीचा सुर अख्ख्या पंचक्रोशीत दुमदुमला... बघता बघता सहा दिवस उलटले अन सातवा-काल्याचा दिवस उजाडला..

पंचक्रोशीतुन सकाळपसुन पब्लिक जमली.. क्रष्णाच्या बालपणीच्या लीला पासुन ते रासलीला ऐकण्यासाठी लोकांच्या मनात एकच उत्सुकता दाटली..गावकरी तरुण मंडळी प्रसाद-पाण्याची सोय करण्यात बेजार होउन गेली...किर्तनाचा टाईम उलटुन गेला.. महाराज काही लवकर येईना...उन्हात पब्लिक ताट्कळत बसली..तितक्यात..एकजन वरडला "महाराज आलं रय.."

बुवा टाटा सफ़ारीतुन उतरले..स्पेशल महाराजांसाठी असलेल्या खोलीत शिरले...बदाम-काजु युक्त दुध बुवांना देन्यात आले..नन्तर मिनरल वाटर...दोन-चार प्रकारची फ़ळं...

आयोजकाला-तात्याला बोलवुन महाराज आपला पंचा पुढं करुन म्हनले...

"सुपारी ठेवा"...

ठरल्यापेक्शा चार हजार कमी ठेउन तात्या म्हनाले.."महाराज, किर्तन संपल्यावर बाकिचे देतो..जरा पब्लिक वाढली म्हनुन प्रसाद करायला जास्त बजेट गेलं..तुमी किर्तन सुरु करा..म्या कायतरी अड्जस्ट करतो.."

बुवा एकाएकी पेटले..नोटाची बंडलं परत दिउन वरडले.."नालायक...मी किर्तन सांगनार नाही..माझ्या मुंबई-पुण्याच्या किर्तनाच्या दहा तारखा सोडुन मी इथं, असल्या खेड्यात आलो....एकदा किर्तन संपले कि कुनाला शोधु मी..सगळी सुपारी आत्ताच पुढे ठेवा नाहीतर मी निघालो.." बुवा ताड्कन उठले..

पब्लिक उन्हात करपुन निघाली... तात्या आणि इतर कमीटी मेम्बर्स महाराजाच्या हाता-पाया पडु लागले..पर बुवा काय ऐकायला तयार नाही....

महाराज किर्तन सांगणार नाही...एवढे लोक..एवढ्या लांबुन आलेले..एवढा सगळा प्रसाद.... तात्याला काय करावं काय नाही काय बी सुचंना....

तात्यानं खिशात हात घालुन चार हजार काढले अन बुवाच्या पुढे टाकले...बुवा खेकसले..,"आता कसे काय निघाले रे खिशातुन...चोरी करतो...नालायक कुठला...अरे देव पाहत आहे तुला….कर्मदरीद्री कुठला..." कमीटी मेम्बर्स आपसात कुजबुजु लागले..

तात्या कुत्सित हसले..अन म्हनले.."महाराज, माज़्या दोनी बी किडन्या फ़ेल झाल्यात...अन हे माज़्या पोरानं माज़्या गोळ्या औषधापायी पाठवलेले पैशे हाय्त..."

महाराज स्तब्ध उभा राहिले... तात्या म्हनले.."चला महराज किर्तन सुरु करा...लोक उन्हात बसलेत..अन देव बघायलाय वरुन….."


महेश

२३/०२/११


नि:शब्द..

कधी कधी मी

आठवणीच्या गावात फिरून येतो

गल्ली-बोळातून फिरताना

शून्यात पाहतो..

कधी ओठांत हसू..

कधी अश्रुना पाझर फुटतो

भावनांना येते उमाळी

कधी नि:शब्द कंठ दाटतो!