Mann Maze

Mann Maze

सांग सखे अजुनी...

सांग सखे अजुनी...
अजुनी वाहतात का ते वारे?
गर्द वनराईत
ते गोड पाण्याचे झरे?

सांग सखे अजुनी,
उमलतात का ती फुले..
अन बागेमध्ये त्या
अजून झुलतात का झुले?

सांग सखे अजुनी,
कोसळतात का धारा
भिजुनी चिंब मग तू
वेचतेस का गारा?

सांग सखे अजुनी,
का दाटते डोळ्यांत पाणी?
ओंजळीतल्या फुलांसोबत,
का येतात माझ्या आठवणी?

सांग सखे अजुनी,
जगतेस माझी बनुनी...
पुन्हा तुझ्याचसाठी
घेयीन जन्म फिरुनी!

महेश.

शोधतो मी..

मोगऱ्याची शुभ्र फुले
हलकेच ओंजळीत घेतो मी...
त्याच्या मनमोहक सुगंधात
तुझे श्वास शोधतो मी...

चंद्राची शीतल किरणे
खिडकीतून येताना पाहतो मी...
त्याच्या शीतल छायेत
स्पर्श तुझे शोधतो मी..

टिपूर चांदण्यांना कधी
तासन तास पाहतो मी...
लुकलुकणाऱ्या चांदणीत
हास्य तुझे शोधतो मी..

महेश.

अल्फाज-ए-माही..

जब हम दूब रहे थे,
किनारे पे खडे तमाशा देख रही थी दुनिया!
ऐ दोस्तो...
हौसला टूटने के लिये, ये नजारा काफी था!

अल्फाज-ए-माही..

आज हवाए कुछ बेरुखिसी है...
सुबह से उनका कोई पैगाम न आया!
------------------------------------------

आँखों से लाख बाते करते है वो हमसे...
फिर भी
दो बातें सुनने को जी तरस जाता है!

---------------------------------------------

उन्होंने अपनी जुल्फे लेहरायी शायद...
बेमौसम आसमां में बादल जो छा गए है!

----------------------------------------------

किये उन्होंने लाखों इशारे अपनी निगाहों से...
नाचिझ ठहरा अनपढ़ गवार, समझने में कई ज़माने लगे!

--------------------------------------------------------------

सुबह से उनसे आंखे न मिली..
लगता है ज़माने बीत गए उनसे आंख-मचौली खेल के!

--------------------------------------------------------------

जिनको देखने के लिए तरस गयी थी आंखे...
अब सपनो में उनको देख के दिल को सुकून आया!

-------------------------------------------------------------

उनकी खुबसुरती तो हमारी आंखो मी बसी है!
फिरभी
न जाने वो आईने में क्या ढूंडते रहते है!

     

आलम-ए-मदहोशी

कल की बारिश में लिखी गयी कुछ पंक्तियाँ!

आज मौसम ने हमपर
एक एहसान कर दिया..

तेज़ बारिश में उसने मुझे
अपनी बाँहों में भर लिया!

काबू तो हमारा खुद पे था
उन्होंने अपना सब नीलाम कर दिया!

बहते गए हम कुछ ऐसे
इस आलम-ए-मदहोशी में,

बारिश की बूंदों पे सारा
इल्जाम हमने लगा दिया!

माही!

पांडुरंगा, धाव आता...

कामांध नजरेला
वासनेचा वास येथे..
बरबटलेल्या वासनेला
नग्णतेची साथ येथे...

धर्माच्या जोडीला
वेगळीच एक जात येथे..
जातीच्या राजकारणात...
कुणाचा हात येथे?

स्वत:च्या फायद्यासाठी...
डोळ्यांत फेकती धूळ येथे...
धुळीच्या धूसर दृष्टीत
भ्रष्ट आचाराचे मूळ येथे.

दोन वेळचे खायला
जनता मोताट येथे...
मड्याच्या टाळूचे लोणी खाया..
कुत्रे किती मोकाट येथे...

कायदे झाले सैल..
गुंडगिरी मात्र सक्त येथे..
अन गल्लीबोळातून हल्ली..
वाहते किती रक्त येथे..

बुवाबाजीच्या नावाखाली
राजरोज चाले सट्टा येथे..
आंधळ्या भक्तांची श्रद्धा..
अन देवाच्या नावाला बट्टा येथे...

करुनी सहन इतके...
तरीही मन मुर्दाड येथे...
पांडुरंगा, धाव आता...
पडले मोठे भगदाड येथे...
महेश.

वाळूचे घर अन सोनेरी स्वप्नं ..

आठवतात ते दिवस...
समुद्राच्या कडेला आपण..वाळूचे घर बांधायचो...
अन आपल्या सुखी संसाराची सोनेरी स्वप्नं बघत तल्लीन होऊन जायचो...
तितक्यात एखादी लाट उसंत घेऊन यायची अन क्षणात ते वाळूचे घर त्या सोनेरी स्वप्नांना सोबत घेऊन विशाल सागरात गुडूप व्हायची...
असा विध्वंस वास्तविक आयुष्यातही होईल..कधी वाटलंच नव्हतं..तुझं माझं सोनेरी स्वप्न...असं खारट पाण्यात विरघळून जाईल..कधी वाटलंच नव्हतं!

उन्हाळ्यात!

बोडका डोंगर
उपाशी मेंढरं
पोळत्या झळया
उन्हाळ्यात!

आटला वडा
आटली हिर
वाळले झाड
उन्हाळ्यात!

करपट मुस्काट
घामाच्या धारा
अंगाची लाही
उन्हाळ्यात!

उठली वावटळ
उडाले चघळ
डोळ्यात फुफाटा
उन्हाळ्यात!

जित्रापं तान्हेली
पोटात खळगी
जळाला कडबा
उन्हाळ्यात!

फाटली धरती
डोईवर नारायण
चातक आसुसला
धगाट्यात!

महेश

शेतकरी झाला शेतमजुरांचा गुलाम!

पूर्वीचे सिनेमे, मोठ-मोठी पुस्तके यात पाटलांचा किंवा मोठ्या शेतकऱ्यांचा उल्लेख मुख्यत: गोर-गरिबांवर, शेतमजुरांवर अत्याचार करण्यासाठीच आलेला आठवतो.आणि अजूनही समाजाचा दृष्टीकोन बदललेला नाहीये. मोठ्या शेतकऱ्यांची बदलत्या सरकारी धोरणामुळे झालेली वाताहात आणि खच्चीकरण यावर प्रकाश टाकण्यासाठी थोडेसे लिहित आहे.

१९६१ च्या जमीन अधिग्रहण कायद्यामुळे (agricultural land ceiling act) बहुतांश मोठ्या शेतकऱ्यांची जमीन ही समजतील भूमिहीन लोकांना, सरकारी शाळांना आंदन देण्यात आली. त्यामुळे ते मोठे शेतकरी राहिलेच नाहीत. मोठ-मोठ्या हवेल्या, चिरेबंदी वाडे वगैरे काळाच्या ओघात पडून गेली आणि केवळ ढाळजा आणि मोठे दार त्या घराला शिल्लक राहिले आहे. बरेचसे शेतकरी तर जुने वाडे सोडून पत्र्याच्या घरात राहताना दिसतात!

मोठे शेतकरी हे सर्वसाधारणपणे खुल्या वर्गात (Open Category) येतात. त्यामुळे कुठल्याही मोठ्या शेतकऱ्याला संसदेत क सलेही आरक्षण मिळाले नाही. त्यांच्या मुलांना देखील चांगल्या शाळा-कॉलेजात गुणवत्ता असून देखील आर्थिक परिस्थितीमुळे आणि या आरक्षणाच्या भानगडीमुळे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांसोबत त्यांच्या मुलांचे देखील हाल झाले.

सरकारी धोरणांमुळे शेतकर्यांच्या पिकाला आजतागायत कधीच योग्य भाव मिळाला नाही. पण मागील ३० वर्षात शेतीचा खर्च मात्र ३०० पटीने वाढला आहे. या सरकारच्या धसमुसळ कारभारामुळे शेतकरी भयंकर अडचणीत आला आहे. शेती भारतीय शेती हा एका मनुष्याने करण्यासारखा व्यवसाय नाही. त्यासाठी पुरेसे शेतमजूर/मनुष्यबळ आवश्यक आहे. आपल्याकडे बहुतांश शेतमजूर हे मागासवर्गीय समाजातून आहेत. शिवाय जे मागास वर्गीय नाहीत त्यांना सरकारने दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र देऊन अफाट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय त्यांचे दैनिक वेतनही सरकारने ठरवून दिले आहे (रु.१२०/८ तास). दारिद्र्य रेषेखाली असल्याने शेतमजुरांना अन्न-धान्य अगदी स्वस्तात (तांदूळ रु.४/कि, गहू रु.२/कि.) मिळू लागले आहे. शिवाय त्यांच्या मुलांना शिक्षणत देखील खूप सवलती आहेत. शेतमजुरांच्या घरातील ३ व्यक्ती जरी कामाला जात असतील तरी त्यांना दिवसाचे रु. ४०० मिळत आहेत आणि त्यातील खूपच कमी खर्च होत आहेत. त्यामुळे शेतमजूर आता शेतीतील रोजगारावर तितकासा विसंबून राहिलेला नाहीये.

शेतमजुरांना एवढा रोजगार मिळायलाच हवा, पण तेवढा रोजगार देण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला त्याच प्रमाणात भाव देखील मिळायला हवा. शेतीमालाचा भाव आणि शेतीवर होणारा खर्च यातील तफावतीमुळे शेतकर्यांना आता मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. शेतमजूर आणि सरकारी धोरणे यांच्या मध्ये शेतकरी खचत चालला आहे. आणि यामुळेच तो आता अन्न-धान्य सोडून फळशेती आणि नगदी पिकाकडे वळू लागला आहे. पुढच्या काही वर्षात अन्न-धान्याचा इतका तुटवडा जाणवणार आहे कि त्यावेळी आयात करून देखील या वाढत्या लोकसंख्येचे पोट भरताना सरकारच्या नाकी नऊ येतील.

शेतीवर होणारा खर्च आणि शेतीमालाला मिळणारा भाव यामध्ये जर लवकरात लवकर समतोल साधला गेला नाही तर या कृषी-प्रधान देशाची वाट लागण्यास वेळ लागणार नाही!

महेश.

Without you..

One more Day...
Passed Somehow
Like It happens everyday...
Now, Here it is...
One more night...
Without you...
With you, in my dream..
One more Night,
With moon, without you..
One more night...
With Love(?) Without you...
One more Night...
With Memories, Without you..
One More night (I sigh..)
With me, Without you...for life!

Maks.

शायरी..

तुम में हीरे की सिफ़त है तो अंधेरे में मिलो
.....ए सितमगर.....
धुप में तो कांच के टुकरे भी चमक जाते है!

------------------------------------------
मुझको पढ़ना तो जरा ध्यान से पढ़ना
...ऐ दोस्तों....
अपनी ही ज़ात में बिखरी हुयी एक किताब हूँ मै!

-------------------------------------------
तलाश कर मेरी मोहब्बत को अपने दिल में
-------ऐ सितमगर -----
दर्द हो तो समझ लेना, मोहोब्बत अब भी बाकी है!

-------------------------------------------
गम-ए-महफ़िल में बैठे तो समझ में आया..
दुनिया में सब लोग इसी बीमारी के शिकार है!

-------------------------------------------
पत्तों की तरह बिखरे थे हम..
किसीने समेटा भी तो सिर्फ जलाने के लिए!

------------------------------------------
हम पुकारते रहे जाने वालेको..
और उन्होंने इकबार मुड़कर भी न देखा..
जब आयी बात जमाने की..
लोगों ने पूछा...तुमने उसे क्यों नहीं रोका?

आळस

दाबून ३ डोसे खाल्ले
कोपऱ्या-कोपऱ्या पर्यंत पोट भरले...
एसीतल्या खुर्चीवर बसून
म्युझिकसोबत झुलू लागले..

डोळ्यांत झोप दाटली
जाम्भयांनी सूर धरला..
शरीरात आळस घुसला..
कामातला रस संपला...

केले फोन पोरा-पोरींना
ब्यालेंस वाया गेला...
ऐकून एकाची दर्दी कहाणी...
डोक्याला शॉट झाला..

काळ्या पोरी बघून बघून..
डोळ्यांवर पडदा आला...
कन्नड किरीकीर ऐकून
संताप अनावर झाला...

धुतले थोबाड तीनदा
२ ग्लास ज्यूस ढोसला..
तरी जाता जाईना
आला हा आळस कसला...

अरारारारारा/....