Mann Maze

Mann Maze

तू सोबत नसताना

मन नेहमीच उदास होतं
चाफ्याचा सुगंध घेताना...
तोच आता श्वासात राहिलाय
तू सोबत नसताना...

मन नेहमी भरकटत जातं
पैंजणाची किणकिण ऐकताना
तीच आता सोबत राहिलीय
तू सोबत नसताना...

मन नेहमी ओलावून जातं
वळवाच्या पावसाच्या भिजताना...
तोच आता भरून राहिलाय माझ्यात..
तू सोबत नसताना...

मित्र

मित्र हे असेच असतात..पाखरांसारखे!
कुठून तरी उडत उडत येतात..
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात!
सुख-दु:खाची गाणी मिळून मिसळून गुणगुणतात!
हसतात, रडतात, चिडतात, एकमेकांत अगदी रमून जातात!
आणि मग एके दिवशी उंच आकाशात भरारी घेऊन पुन्हा दूर उडूनही जातात!
चेहरे काळामागे हरवले तरी ते गोड क्षण मात्र आठवत राहतात!

कुछ दिल-से...

उस शहर कि हर गली गली से वाकीत है हम..
जिस गली कि आरजू थी, वहा किसी और का बसेरा पाया...

-------------------------------------------------
उस शेहर कि गली गली से वाकीत है हम...
बस जिसकी आस थी वो गली अब हमारी नही रही!

-------------------------------------------------
इक जमाने मे बसाया था
अपना आशीयां हमने तेरे शहर मे..

गजब लोग है तेरे शहर के...
ऐ सनम..
अब पुछते है, वो जला हुआ मकान किसका है?

-------------------------------------------------
हमने तो सोचा कि बस वोही बेवफा है..
जिसने हमे गम-ए-महोब्बत मे अकेला छोडा है..

दोस्तों..

तन्हा रातों कि बेवफाई का सर्-ए-अंजाम
हमने कभी देखा नही था..

------------------------------------------------
जो रातें कभी गुजरती थी सपनो मे..

ऐ सनम..

आज फुर्जो मे बिखर गयी है!

------------------------------------------------
जालीम जमाने कि क्या बात करे यारो..
दिलवालो का घर जलाके...

(आज फक्र-ए-शौक से)
उनकी मोहोब्बतो कि कहानिया लोग सुनाते है!

------------------------------------------------

ऐ इन्सान

बनाये मंदिर..बनाये मस्जिद..
उजाडे मंदिर..उजाडे मस्जिद..
:
कही खुल न जाये आंख परवरदिगार कि..
ऐ इन्सान...कही तू ही एकदिन
...उजड न जाये...

अल्फाज-ए-माही

हसके अपनी आंखो से वो..
सर्-ए-आम कत्ल कर देते है...

अपनी अदा-ए-हुस्न से...
हमारा दिल वो जलाते है...

हम है कि उनके इशारो को...
बेवजह नजर-अंदाज करते है..

क्या कहे दोस्तो...

जब भी नाम आता है उनके दिवानो का..
लोग मेरी तरफ उंगली उठा देते है!

अल्फाज-ए-माही

फणस खाऊन ४ दिवस


फणसावरून एक आलेला मजेशीर अनुभव आठवला...
मी आणि माझ्या मित्रांनी ऐन पावसाळ्यात बंदीपूर न्याशानल फोरेस्टला जाण्याचे ठरवले. पावसाळ्यात हे जंगल पर्यटकांसाठी बंद असते. पण तिथे असलेले फोरेस्ट ऑफिसर माझ्या मित्राच्या ओळखीचे होते, मग आम्ही परवानगी घेण्यासाठी गेलो तर ते म्हणाले मी पण तुमच्यासोबत येयीन. आणि त्यांनी फोरेस्ट गेस्ट हौस मध्ये राहण्याची व्यवस्था पण करण्याचे कबुल केले. मग निघण्याच्या दिवशी अचानक त्यांना कुठेतरी जावे लागले, आणि मग आम्ही मित्र मंडळी त्यांना सोडून गेलो. मग जंगलाच्या चेक पोस्ट नाक्यावरून त्यांना फोन लावला, आणि मग आम्हाला जंगलात जाण्यासाठी परवानगी मिळाली. जंगलात गेल्यावर मात्र मोबाईलला रेंज नव्हती. मग आम्ही गेस्ट हौस वर गेलो, तिथे त्या ऑफिसर ने आमची सोय केली नव्हती. मग तिथे असणाऱ्या चौकीदाराला/ कुकला ५०० रुपये देऊन आम्ही राहिलो. रात्री लाईट नव्हती. जंगलात कुणीच नव्हते. आम्ही ४ मित्र, मुसळधार पाउस आणि सोबत वाघ आणि इतर प्राणी. सकाळी फिरायला निघालो. पावसात मस्त फिरलो. पण जंगलात जागोजागी क्यामेरे लावले होते. लगेच एक सशस्त्र पथक आमच्या मागावर आले आणि आम्हाला पकडले. आमची कार सील केली. आम्ही त्यांना सर्व समजाऊन सांगितले पण ते ऐकेना...मग आम्हाला गेस्ट हौस वर नजर कैदेत ठेवण्यात आले. तिथला कुक गायब झाला...आम्ही उपाशी. मग आम्ही त्या सैनिकांना विनंती करुण तिथलिया आदिवासी लोकांकडे काही खाण्य्साठी मिलते का म्हणून बघायला गेलो. तर त्यांच्याकडे आम्ही खाऊ असे काही नव्हते, मग त्या आदिवासी माणसने आम्हाला हत्तीवर बसवले आणि आम्हाला जंगलात नेले, आणि मग त्या हत्तीने आम्हाला फक्त जे पिकले आहेत असेच फणस झाडावरून काढून दिले. चार दिवस फक्त फणस खाऊन जगलो. मग नंतर ते ऑफिसर आले. त्यांनी टायमावर जबान फिरवली. १५ हजार रुपये दंड ठोकला. मग कसेतरी २ हजारावर मानले.
(नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले, सर्वांची तोंडे बंद करण्यासाठी हे करावे लागते वगैरे वगैरे...)

तर सांगण्याचे तात्पर्य....नुसते फणस खाऊन ४ दिवस आम्ही चौघे जगलो.

व्यवहारी ज्ञान

फार पूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवली.

एक अतिविद्वान पंडित असतो. आपल्या बुद्धीचा त्याला खूप अभिमान/गर्व असतो. तो रोज गंगा नदी होडीने पार करून पल्याड आश्रमात जात असतो. एके दिवशी असाच होडीत बसला असता त्याला त्या नावाड्याची खिल्ली उडविण्याची लहर आली.
पंडित: काय रे, तुला श्लोक वगैरे पाठ आहेत का?
नावाडी: न्हाय बा!
पंडित: अरेरे, शतमुर्खा, तुला एकही श्लोक पाठ नाही? मला एकूण १६००० श्लोक मुखपाठ आहेत. शिवाय मी ५०० ग्रंथांचे पारायण केले आहे. ठीक आहे, तुला लिहिता वाचता तरी येते कि नाही?
नावाडी: न्हाय बा....
पंडित: अरेरे, नीच मनुष्या, तुला लिहिता वाचता सुद्धा येत नाही? तू जन्म घेऊन चूक केलीस! तुझ्यासारखी मूर्ख मानसं बुद्धीशिवाय कशी काय जगतात कुणास ठाऊक?
अरे, बुद्धिवान मनुष्य हा ताठ मानेने जगतो, जगात अशी कुठलीच गोष्ट नाही कि तो मिळवू शकत नाही.
नावाडी: पंडितजी, तुम्हाला पोहता येते का?
पंडित: नाही. का?
नावाडी: होडीला छिद्र पडले आहे, आणि पुढच्या १० मिनिटात होडी बुडेल. तुमची अगाध बुद्धी वापरा आणि जीव वाचवा!
पंडित नावाड्याच्या पाया पडू लागला...पण नावाडी काही न ऐकता नदीत उडी मारून पोहू लागला...
होडी बुडू लागली...पंडित जीवाच्या आकांताने नावाड्याला हाका मारू लागला...
मग नावाडी पोहत पोहत परत आला...आणि म्हणाला...
नावाडी: अरे शतमुर्खा, पहिली गोष्ट, त्या होडीला पकडून ठेव, तू बुडणार नाहीस....आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी पाण्याची खोली फक्त ४ फुट आहे.

तात्पर्य: पुस्तकी ज्ञान असो नसो, व्यवहारी ज्ञान असणे आवश्यक आहे.

...

ह्या एकांताच्या गोंधळात हल्ली,
तुझ्या पैंजणांचा आवाज आता मी विसरलो आहे!

बुवाबाजी...


लेकराला ताप चढला...
रडारड झाली...
"ह्येला भानामती झालीया"
म्हातारीनं बोंब ठोकली!

लिंबू मिरची उतरून टाकली..
येशीबाहीर तुकडा टाकला...
तवा पोराचा ताप..
कमी झाल्यावानी वाटला...

थोड्या येळानं (ताप) पुन्हा चढला...
दारात कोळशानं रेगुटा वाढला...
"ह्येला बुवाकड न्ह्या"
जनीनं किडा काढला...

बुवा सोवळ्यात बसलेला..
पोराला पुढ्यात ढकलला..
मंतर-छंतर पढून...
कोंबडा कापायला सांगितला...

खणा-नारळाची वटी
लिंबू मिरची, तुर्याचा कोंबडा..
काळ्या मिरीचा भूक्टा...
बुवा यादी कराया लागला...

"पोरगा उलट्या पायानं जन्माला..
ह्येचं काय काय खरं न्हाई..
ह्येच्या नशिबात लेको..
लय दिस जगणं न्हाई..."

बुवा डोळे झाकून भाकीत सांगायला..
तेवढ्यात पोराचा ताप चढला...
जवळचा लोटा घिऊन...
बुवाच्या मस्तकात हाणला...

पोराचं नशीब सांगणाऱ्या बुवाला ..
सवताचं नशीब न्हाय कळलं!
पोराची करामत बघून
म्हातारीचं बी मन वळलं!

एका झटक्यात समदं मिटलं
कोंबड्याच बलिदान वाचलं
बुवाचं कपाळ फुटलं
पोराचं दुखणं सुटलं!

महेश.

अब के सावन


अब के सावन..
मेहंदी रंग लायेगी...
पिया के संग...
होठो पे लाली आयेगी!

बजेगी चुडियाँ..
चुनर सरक जायेगी..
रातों को सपने मे...
पिया को हि पायेगी...

आसमां (बादल) बरसेगा...
धरती भीग जायेगी...
खिलेंगे कितने रंग...
खुशबू मेहक जायेगी...

झुमेगा गगन...
चिडिया भी गायेगी...
अब के सावन अब..
मेहंदी रंग लायेगी!

महेश.

...

झाले...माझ्या पहिल्या-वहिल्या प्रेयसीचे रोजी लग्न झाले...
आज तिने मला बर्याच दिवसांनी फोन केला आणि हि सुखद(?) बातमी दिली. अंदमान-निकोबारला हनिमूनला जाऊन आले...मग जोडीने देवदर्शन जेजुरीला वगैरे वगैरे...
बराच वेळ खूप खूप बोललो...मग अचानक दोघेही शांत झालो...ती म्हणाली,
"तू अजून माझ्यावर प्रेम करतोस?"
मी गप्प.
"मला विसरू शकशील का?"
मी गप्प.
मग पुन्हा शांतता...
मग मीच म्हणालो(विषय बदलत)
"मला का बोलावले नाहीस लग्नाला?"
"तू समोर असताना दुसऱ्या कुणाच्या गळ्यात हार घालणे मला शक्य झाले नसते..." ती. (अश्रूंमध्ये भिजून आवाज थोडा नरम झाला असावा..)
पुन्हा शांतता...

"किती तारखेला आणि कोठे होते लग्न?" मी.
"१२ फेब्रुवारीला, पुण्यात!" ती.

आणि निव्वळ योगायोग...मी १२ तारखेला पुण्यातच होतो. पण मी तिला हे सांगितले नाही!