Mann Maze

Mann Maze

अवस्था!


माळावरचं ते बहारदार झाड
पूर्णपणे वाळलं होतं!
कधीतरी पालवी फुटेल या आशेवर
तग धरून उभं होतं!

माझ्या मनाचंही
तसंच काहीसं झालं होतं...
दूरवर पसरलेल्या काळोखातही
एक आशेचा किरण शोधत होतं!

महेश.

My Clicks!

लाल चाफा!


पाउस पडून गेल्यावर 
मन पागोळ्यांगत झाले!

नवांकुर

रूम पार्टनर


मला खूप दिवसापासू वाटत होते, मला एखादा छान रूम पार्टनर असावा...पण मिळाला नाही..मग मी एक मांजर पाळली. मस्त होती..मनुष्याजातीपेक्षा प्रेमळ आणि विश्वासू होती. नंतर ती वयात आल्यामुळे आणि तिला तिचे आयुष्य जगता यावे म्हणून तिला गावी नेऊन सोडले आणि बोललो..."जा...जी ले अपनी जिंदगी..."
आता अज्जून एक पार्टनर शोधत होतो तीव्रतेने....आणि विशेष, परवा रात्री २ च्या सुमारास एक मोठा झुरळ माझ्या अंगावर खेळताना मी पहिला...कुठून आला काही माहिती नाही....झुरळ रूम मध्ये शिरण्याचा कसलाच चान्स नाही...तरीपण तो आला...उठून लाईट सुरु करून चप्पल हातात घेतली ....त्याला मारण्यासाठी...मग क्षणभर विचार केला....आणि चप्पल टाकून दिली आणि त्याला हातात घेतले...तो घाबरून माझ्या तळहातावर बसला. मग मी त्याला सोडून दिले...२ दिवस झाले, तो दिवसा गायब असतो...रात्री मात्र न चुकता येतो...अन एक चक्कर टाकून जातो...मेरा नया पार्टनर...त्याचे नाव क्रोकी ठेवले आहे मी....

मदिरा!


माझ्या मदिरेची
किती बोलू कौतुके...
अमृतातेही परी पैजा जिंके...

मदिरेची नशा...
चढे हळूहळू धुंदी...
डोळ्याम्होर वाटे, सारी दुनिया मंदी!

बसता मिळोनी...
होई जिगरी दोस्ती...
मिळोनी चंपक सार्या दुनियेवर हसती..

झाली थोडी ज्यादा
अंगी चढते मस्ती...
बायकोची परी याला सदा कदा धास्ती...

पिउनी घोट घोट...
चंपक करिती कल्लोळ...
चुकता प्रमाण, गटारीत लोळालोळ ...

ढोसता ग्लास...
दिवसा दिसती नक्षत्रे..
चाली झुलत पुढे, मागे भुंकती कुत्रे!

मदिरेची नशा प्यारी...
दिसे दुनिया न्यारी सारी...
उशिरा होता रात्री, बायको उभी दारी!

सोडता सुस्कारा
येई आंबट भपका...
पेताड नावाचा, याच्या नावावर ठपका...

पोट भरते तुडुंब...
तोंडातून येई उलटी...
आजू-बाजूचे चंपक, लगे मारती कलटी,...

अशी मदिरेची दोस्तहो...
किमया भलती न्यारी...
कशी का असेना, सार्या दुनियेला हि प्यारी!

महेश.

असंच...


पुन्हा एक रात्र...काळी मंतरलेली...
भयाण शांतात माझ्या..मनी अंतरलेली!

पूर्णत्व...

पूर्णत्वाच्या मागे धावण्यात मनुष्य अपूर्णच राहतो. जसे कि कस्तुरी मृग सुगंधाच्या शोधात आणि सामान्य मृग मृगजळाच्या मागे धावण्यात मरून जाते!

"एक शून्य!"


आयुष्यातल्या या कुठल्या वळणावर येऊन थांबलो मी?
माझ्यामालाच आता हि भीती भेडसावत आहे. का आणि कसा मी तुझ्यात एवढा गुंतत गेलो, कि आता मागे फिरून पहायचे म्हटले कि अंगावर काटे येतात,
तुझ्याविना मी, असा विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी जीवाची घालमेल होते. असं वाटतंय, तुझ्यातच माझं हे सारं विश्व सामावलंय, आणि तूच जर या विश्वातून निघून गेलीस, तर उरेल फक्त "एक शून्य!"

अल्फाज-ए-माही!


आँखों में तीर लिए निकलते है हम ....
क़त्ल हो जाये तो कातिल करार न देना...

-------------------------------------------

उनकी आँखों की जंजीरों में कुछ ऐसा जहम था यारों,...
उम्रकैद की सजा खड़े खड़े मिल गयी

अल्फाज-ए-माही!


आज सारे अरमान निकल गए!
मेरा हाल देख पत्थर दिल पिघल गए!
लिखे थे चुन चुन कर उनके लिए जो...
वो अल्फाज भी आंसुओं संग निघल गए!

---------------------------------------------

तुझे भूलने का हौसला तो नहीं...
मेरा चैन-ओ-सुकून कुर्बान होगा...
ये काम तो सदियों का है
चंद लम्हों में थोड़ी ख़तम होगा!

---------------------------------------------
लिखना चाहते तो बहोत कुछ चाहते है...

लिखने की वजह अब कुछ ख़ास न रही!
जो थी मेरे जीने की वजह कलतक...
यारों, आज वो मेरे पास न रही!

---------------------------------------------

उसकी रूसवाई कि यादों ने
जीना दुश्वार कर दिया...
कोई साथी न मिला तन्हाई में, यारों..
अब तन्हाई से हमने प्यार कर लिया!

----------------------------------------------

तौहीन मत दो उस इश्क की मुझे..
ये वो आग है, जिसमे जलती सारी दुनिया है!




अल्फाज-ए-माही!


किसी की दोस्ती पे तो हम जान भी कुर्बान कर दे...
मगर दुश्मनी भी निभाते है तो जान की बाजी लगा कर!

----------------------------------------------------------

तरस आता है मेरे दुश्मनों पे मुझे अब..
मेरी वफ़ादारी देख उनका भी दिल जलता है दोस्ती के लिए!

-----------------------------------------------------------

माणसातला देव


देव असतो. देव असावाच. पण तो आपापल्या मनात. त्याचा बाजार भरवू नये.
चमत्कार वगैरे सब थोतांड असते. देव पाहावा, मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या आई-वडिलांमध्ये, आप्त-स्नेहीजनामध्ये! माणसातला देव ओळखता आला पाहिजे.

यावरून एक गोष्ट आठवली.
एक अगदी पुंडलीकासारखा नितांत भक्ती करणारा पांडुरंग भक्त असतो. तो संपूर्ण दिवस पांडुरंगाच्या नामस्मरणात घालवत असे. अन एक शेतकरी असे, जो कधी त्या मंदिरात जातही नसे, अन पूर्ण दिवस शेतात काबाड कष्ट करीत असे. एकदा खूप पाउस पडतो अन गावातील नदीला पूर येतो. पूर्ण गाव बुडते. सरकार तर्फे मदत कार्याची टीम पिडीताना सोडवण्यासाठी येते. सर्व लोकांना स्थलांतरित करण्यात येते. तो शेतकरी देखील त्यांच्या मदतीने स्थलांतरित होतो. पण तो भक्त मात्र पांडुरंगाचे समरन करीत मंदिराच्या शिखरावर जाऊन बसतो. पुराचे पाणी वाढू लागते. मदत कार्य करणारे त्याला खूप विनवतात पण तो म्हणतो, "मी एवढी पांडुरंगाची भक्ती करतो, आता तोच मला वाचवेल." खूप विनवणी करूनही तो ऐकत नाही. पुराचे पाणी वाढते, अन तो वाहून जातो आणि आपला प्राण गमावून बसतो.
स्वर्गात गेल्यावर तो देवाला भेटाव आणि विचारतो, " देवा, त्या शेतकऱ्याने कधी मंदिरात पाय ठेवला नाही पण तू त्याला वाचवलेस, पण मी अख्हे आयुष्य तुझ्या चरणी घालवले, अन तू मला वाचवण्यासाठी का आला नाहीस?"
देव म्हणाला, "अरे मुर्खा, तुला विनवणी करणारा तो मदत कार्याचा अधिकारी मीच होतो. तुला त्याच्यामधला देव दिसला नाही. तुझी भक्ती हि अंध आणि दिखाऊ होती. उलट शेतकरी, रोज शेतात काम करत असताना त्याच्या मनात माझ्याबद्दल नितांत श्रद्धा होती. अन त्याने योग्य वेळी त्या माणसातला देव ओळखला."

तात्पर्य: देव कधी कुठल्या स्वरुपात दर्शन देयील सांगता येत नाही. फक्त देव ओळखण्याची कला तुमच्याकडे असायला हवी.

नक्षलवादी


महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन १८७७ साली शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी इंग्रज सरकारला पुढील सूचना केल्या होत्या..
१. तलाव, धरणे बांधून शेतीला योग्य पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
२. पिक संरक्षणासाठी शेतकर्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत.
३. कालव्याचे पाणी शेतकर्यांना योग्य पमाणात आणि वेळेवर मिळावे.
४. पशुपालानासाठी चालना द्यावी.
५. सुधारित शेतीसाठी अवजारे, अल्प्व्याजी कर्जे शेतकर्यांना उपलब्ध व्हावीत.

इंग्रज सरकारने सूचना क्र.२ सोडून इतर सर्व सूचनांचा आदर करून त्यांचा पाठपुरावा केला. सूचना क्र. २ चा परवाना जर त्याचवेळी शेतकर्यांना मिळाला असता तर आज शेतकरी इतका गरीब व पिडीत राहिला नसता.
स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांचे सरकारी धोरणामुळे झालेले हाल, त्यांच्या दैनंदिन गरजा पुरविण्यात सरकारला आलेले अपयश, आवश्यक सुविधा दुर्गम भागातील लोकांपर्यंत आलेले अपयश, या सर्व कारणांमुळे समाजातील हा एक गट शेवटपर्यंत मागासच राहिला. तीव्र नाराजीतून या लोकांच्या संघटना स्थापन झाल्या, वेळोवेळी सरकारला परिस्थितीची जाणीव करून देऊनदेखील कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी आणखीनच वाढत गेली. संघटनेचे रुपांतर चळवळीत झाले. आणि मग त्या लोकांनी आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी सरकारच्या विरोधात शस्त्र उचलले. हेच ते नक्षलवादी.
हेतू चांगला असला तरी मार्ग चुकीचा होता/आहे. पण यात त्या लोकांपेक्षा सरकारचा गुन्हा, दोष जास्त आहे.

आणि सद्य परिश्तिती पाहता, अजूनही सरकारी धोरणे तशीच शेतकर्यांना मातीत गाड्णारी आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील/भारतातील इतर भागातील शेतकरी सुद्धा लवकरच हातात शस्त्र घेतील आणि नक्षलवादी होतील यात शंका नाही.

महाराष्ट्र दिन


 महाराष्ट्र दिन.
आतंकवादी बिर्याणी झोडतोय
शेतकरी फासावर लटकतोय
राजकारणी हवेत उडतोय
गरीब आपले पाय भाजतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

नेता संघटना करतोय
दलित तरीही होरपळून मरतोय
सरकारी अधिकारी लाच खातोय
सामान्य नागरिक पाया पडतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

कारखानदार उरावर बसतोय
कामगार खंगला जातोय
भ्रष्टाचाराच्या जोरावर
तमाशा रंगला जातोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

भैया झोपड्या वाढवतोय
मराठी फुटपाथवर नीजतोय
रोजगार दुसर्याला मिळतोय
आपला माणूस उपाशी राहतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

नेहरुचे स्मारक उभारतोय
सीमाप्रश्न अजूनही छळतोय
मंत्री कुत्र्यासारखा भुंकतोय
नक्षलवादी किड्यासारखे पोलीस मारतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

परदेशात आपलाच पैसा कुजतोय...
एका पैशासाठी माणूस इथे भिक मागतोय!
५२ वर्षे उलटून गेली आता
तरीही मराठी अजून असाच उपेक्षित जगतोय!
कसला माज आहे मराठी असल्याचा?

कसला महाराष्ट्र दिन?
देशातील मोठ्या लोकांच्या यादीत १०-५ मराठी लोकांची नावे आली कि आपल्याला अभिमान वाटतो.
अरे पण इतर १० कोटी लोकांचे उपेक्षित जीवन पहा, मग कळून येयील, किती लाचार झाला आहे महाराष्ट्र!
प्रत्येक गोष्टीत लाचारी. स्वत:च्या मनगटावर स्वराज्य स्थापन करणाऱ्या त्या मोठ्या दिलाच्या राजाच्या महाराष्ट्रातील लोकांना दुसर्या समोर हात पसरण्याची सवय कशी काय लागली?
कुठे गेला तो गरजा महाराष्ट्र? मुंबई महारष्ट्रात सामील करून घेण्यासाठी शेकडो लोकांनी दिलेले बलिदान...आहे का कुणाला त्याची जाणीव? परप्रांतीय लोक मराठी माणसाच्या बोकांडी/उरावर आणून बसविण्यासाठीच केला होता का त्या हुतात्म्यांनी अट्टाहास?
किड्या-मुन्ग्याप्रमाणे मारताहेत पोलीस, एवढे लाचार आणि हतबल सरकार? मुठभर नक्षलवाद्यांचा बिमोड आपण करू शकत नाही?
कुत्र्या सारखे भुंकत आहेत मंत्री, शेतकर्यासाठी जाहीर केले बजेटचा मलिंदा गिळून टाकत आहेत, आणि शेतकरी तरीही आत्महत्या करीत आहे.
आजतागायत ५७००० शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. जगाचा पोशिंदा असा होरपळून मरतोय, यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट कोणती असेल?
आरक्षणाच्या जोरावर दलित शिकत आहेत, मोठ मोठे अधिकारी होत आहेत, पण एकदा मोठे झाले कि मागे फिरून पाहण्याचे हे विसरतात. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आपण काहीतरी करावे अशी यांची मानसिकता राहत नाही.
मुंबई सोडून जरा महारष्ट्र फिरून बघा, खरा महाराष्ट्र मागेच कुठेतरी राहिला आहे. बघा एकदा फिरून बाबा आमटेंचे नंदनवन, बघा हजारेंचे राळेगण सिद्धी, बघा एकदा तपोवन फिरून!
मराठवाडा, खानदेश, विदर्भ बघा एकदा फिरून.
स्वाभिमानी महाराष्ट्र कुठेतरी हरवला आहे. अन लाचार महाराष्ट्राने जन्म घेतला आहे.
महेश.

क्षुद्र!


क्षुद्र! होय क्षुद्र आहोत आपण, या विशाल निसर्गाच्या समोर!
पण मनात उठणारी वादळे हि निसर्गात उठणाऱ्या वादळापेक्षा कितीतरी भयंकर वाटतात कधी कधी.
जसे पाला-पाचोळा एखाद्या वावटळीत उडून हेलकावे खात सैरभैर उंचच उंच उडून जातो, अगदी दिसेनासा होतो, क्षुद्र भासतो, तसेच एखाद्या वादळात आपले मन पण भरकटून जाते, एका अनामिक विश्वात भिरभिरत राहते, आणि नंतर त्याला त्याचा स्वत:चाच ठिकाणा सापडत नाही. सागरात उठणाऱ्या असंख्य प्रलयकारी लाटांसारख्या असह्य वेदना उठत राहतात मनात, उन्माद धारण केलेल्या एखाद्या वनाग्नी सारखे जळत राहते आपले मन आतल्या आत, अन ती आग विझवणे त्या वेळी कुणाच्याच हातात नसते, अगदी आपल्या स्वत:च्या देखील! का उठतात अशी भावनिक वादळे, का भरकटते आपले मन?
एखादा मोठा भूकंप होऊन धरणी फाटावी तसे आपले मन फाटून जाते! समजुतीची ठिगळे लावताना लक्षात येते कि, सारे आभाळच फाटले आहे तर कुठे कुठे ठिगळे लावून जोडणार?
चार भिंतींमध्ये स्वत:ला कोंडून घेऊन मनसोक्त रडण्याची इच्छा होते...मग स्वत:ची कीव देखील येते, काय कमावले आपण? डोके ठेऊन मनसोक्त रडण्यासाठी एखादा खांदा सुद्धा आपल्याला मिळत नाही?
काय हवे असते अशा वेळी या मनाला? आधार? सहानुभूती? प्रेम? कि अजून काही?
किती प्रश्न...सारे निरुत्तरित!

असंच!


पाउस आणि तिच्या आठवणी यांचं एक अतूट नातं आहे.
तो येताना एकटा कधी येतंच नाही, सोबत तिच्या आठवणींना घेऊनच येतो.
अन मग प्रत्येक थेम्बासोबत आठवणींमध्ये मला भिजवून जातो.

अल्फाज ए माही


हम खामोश रहे, कुछ कहा नहीं..
आंखे बोलती रही, जुबा पे बात कभी आई नहीं!
उन्होंने कभी देखा नहीं इन आँखों में
इस दिल के जज्बात उनको कभी समझे नहीं!

कशिश तो थी उनके आँखों में बी,
मगर उनसे कभी बया न हुयी!
आलम ए ख़ामोशी में कुछ ऐसे दुबे रहे वो..
मोहब्बत ख़ामोशी पे कुर्बान हो गयी!
-------------------------------------------------


आँखों से हमने भी बया की..
कहानी-ए-मोहब्बत कई बार..
खामोश रहे वो सुनके
न किया कभी ऐतबार!

पत्थर दिल को भी
आ गया हम पे तरस...
लेकिन जब हम हमेशा के लिए..
खामोश हो गए!
--------------------------------------------------


कई बार किया हमने
इकरार-ए-मोहब्बत अपनी आँखों से..
पत्थर दिल को रास न आया...

जब हुवा उनको एहसास
हमारी दिल-ए-कश्मकश का...
हमारा दिल खामोश पाया!
-------------------------------------------------


सुनहरी महेफिल जमाके
साकी कही चला गया
हम दुबे रहे आगोश में
अंत में खुद को अकेला ही पाया!
-------------------------------------------------


उनको जागते देखा है हमने
गुजरे हुयें कुछ अरसोसे...
उसको तो कुछ पता भी नहीं...
जगता रहा इक तारा उअसके लिए..बरसोंसे!

अल्फाज ए माही.