Mann Maze
और समां बन गया
और खून के आंसू बह गए...
उसकी यादों ने धोका दिया यारों..
और समां बन गया..
उठ गयी कसक सी मेरे दिल में...
और धड़कने शायद थम सी गयी..
मेरे दिल नेही आज फिरसे धोका दिया..
और समां बन गया...
महेश..!!
असतो तेथे नसतो मी
आज मले अठीवले

बस स्त्यांड वर आज तिला बघितलं..
काकत शेंबड लेकरू...अन डाव्या हातात मळकट पिशवी..
अन बिडी शिलगावलेलं पेताड मास्तर बाजूला..
आज मले अठीवले...
कदी गावच्या जत्रमंदी
तर कदी माळावरच्या वडाखाली
कदी म्हसुबाच्या देवळामागं
तर कदी काळूबाईच्या डोंगराखाली..
म्या धरलेला तिचा हात..
आज मले अठीवले..तिचा फुललेला श्वास..
उरातली धडधड...अन स्पर्शातली थर-थर...
तिचे भुरे-काळे केस..अन काळे-निळे डोळे..
काळे सावळे गाल...अन लाल-गुलाबी ओठ..
आज मले अठीवले..
तास-तास वड्याच्या कड्याला बसून..
गावरान गप्पा मारलेल्या...
एकमेकांच्या मिठीत...दोघांच्या भावना..
दोघं बी विसरलेल्या,...
आज मले अठीवले ..
सुताराच्या हनम्यानं ठोकलेली बोंब..
अन माझ्या बापानं धुतलेला मला..
तिच्या डंगर्या बापानं पिऊन
माझ्या दारात रातभर घातलेला राडा..
आज मले अठीवले..
वाडीच्या पेताड मास्तरासंग
तुझं गपचीप लगीन वाजीवलेलं..
अन माझ्या बापानं मले
अडगळीच्या खोलीत दिवसभर कोंडलेलं..
म्या बेंबीच्या देठातून वरडलेला..
तवा माझ्या मायीनं बी माझ्या मुस्कटात हाणलेला..
माझं आता माझं नव्हतं..
ते त्या मास्तराच झालं व्हतं..
म्या म्हणलो, चला, सालं एवढंच आपल्या नशिबात व्हतं!!
बसचा भोंगा कर्कास वाजला..
तवा म्या ठिकाणावर आलो..
तिच्या भरलेल्या डोळ्यांत..
क्षणभर पाह्यालो...
का तिच्या बापानं तिला त्या मास्तराच्या गळ्यात बांधला?
अन का माझ्या बापानं असा मले बांधून टाकला? त्या अडगळीच्या खोलीत?
महेश!
अजून आठवते
जिथे आपण भेटायचो..
गर्द वडाच्या झाडाखाली
तासन-तास गप्पा मारायचो..
एकमेकांच्या डोळ्यांत
किती तरी वेळ हरवून जायचो..
तू चोरून आणलेला डब्बा
दोघे मिळून खायचो..
आठवतो तो पाउस..
दोघे चिंब भिजलेलो...
अन एकमेकांच्या मिठीत
न बोलता निजलेलो...
आजही ती वाट तशीच आहे..
अन आठवणीही तशाच आहेत..
तो वटवृक्ष मात्र...एका वादळात..
मुळासकट उन्मळून पडला आहे..
आणि त्याला बिलगलेल्या त्या वेलीने
आता दुसऱ्या वृक्षाचा आधार घेतला आहे!!
महेश!!
अवकाळी पाउस
दिल जलता है...
ओठों से नहीं आँखों से बयां करते है..
दिल जलता है...
इन आँखों की गहराई को तुम छू न सके..
और बताओ खता क्या है..
जीना मरना तो अब तुमिसे है...
हाथ थामके वादा जो किया था..
दिल जलता है..
उस वादे को तुम निभा न सके...
और बताओ खता क्या है...
महेश...
क्षणात
मला रंग नको लावू ...

भर दुपारी मला..
तिला भेटण्याचा मूड झाला..
ऐन होळीच्या दिवशी
उत आला माझ्या प्रेमाला..
ती चोरून बावरून..
भेटाया मज आली..
शुभ्र तिचा ड्रेस...
अन ओठांवर तिच्या लाली...
रंगाची उधळण मी तिच्यावर केली..
रंगलेला ड्रेस पाहून..ती गालात हिरमुसली...
"सजना, जायचे आहे घरी मला रंग नको लावू ...
तुझ्या प्रीतीच्या या रंगाचे, जगाला उत्तर काय देऊ??"
महेश
एक प्रवास

एक प्रवास
तुझ्या माझ्या प्रेमाचा...
खूप सार्या आठवणींचा..
रुसव्या-फुगव्याचा..
गालातल्या खळीचा..
...पावसातल्या सरीचा...
ग्रीष्मातल्या धगीचा..
वसंतातल्या पानगळीचा
रानातल्या हिरवळीचा.
बागेतल्या दरवळीचा..
पौर्णिमेच्या चांदण्यांचा..
लडिवाळ भांडण्याचा..
एक प्रवास..
मनातल्या मोराचा..
डोळ्यातल्या चोराचा..
एक प्रवास..
जन्मोजन्मीचा...तुझ्या माझ्या प्रेमाचा..!!
महेश.
मौन
प्रिये,
भाव तुझ्या मनीचे
डोळ्यांतून कळते मला
परी मौन तुझ्या ओठीचे
कसे सांगू, किती छळते मला...
मनात तुझ्या मीच मी आहे
तरी मला अशी का टाळतेस?
मी तर तुझ्यासाठीच जगतो मरतो..
का मला असे जिवंतपणी जाळतेस?
महेश..!!
प्रिये..
नियती..
मला हि जगायचं होतं
आयुष्य तुझ्या सोबती..
सोबत नव्हती नियती..
या भातुकलीच्या डावात
इतकीच आपुली सोबत होती..
पुन्हा डाव मांडूया दोघे..
फिरुनी पुढल्या जन्मी..
धीर नको सोडू वेड्या..
तुझ्या आठवणींत मला साठव..
कधी आलीच थंड हेवेची झुळूक..
त्या स्पर्शात मला आठव...
महेश..
असंच..
उसे नफ़रत है शराब से
मझसे जादा...मुझसे कम...पता नहीं!
और मुझे मुहोब्बत है उससे
शराबसे जादा..शराबसे कम ..पता नहीं...!
महेश
वेडे स्वप्न

चंदेरी ह्या राती..
मी गजरा तुजसाठी आणावा..
ओंजळीत हलकेच घेऊन
तू मनसोक्त हुंगावा...
तुझा सुगंधी चेहरा..
मी वेड्यासारखा पाहत राहावा..
अन तो गजरा मीच माळावा
म्हणून तू हट्ट धरावा..
तुझ्या निळ्याभोर डोळ्यांत
मी आता बुडूनी जावे..
श्वासात श्वास-गंधात गंध..
दोघानीही एकरूप व्हावे..
तू पसरुनी करकमल
मजला मिठीत घ्यावे..
तुझ्या ओठांच्या लालीने
माझे ओठ लाल व्हावे..
टिपूर चांदण्यात
दोघानीही नाहावे...
वेडे स्वप्न हे माझे..
कधी पूर्ण व्हावे?..
महेश
असंच...
क्षणात कसा कोसळला...
श्वास थांबला कुणासाठी?
डोळ्यांत अश्रू का पाझरला?
असंच...
क्षणात कसा कोसळला...
श्वास थांबला कुणासाठी?
डोळ्यांत अश्रू का पाझरला?
असंच...
चुकुनी जेव्हा मी जातो...
मन तुझ्या आठवणींनी शहारते..
तुझ्या काल्पनिक स्पर्शाने बावरते..
पुन्हा वेडे पिसे होऊन
चातकापरी आक्रंदते..
असंच..
मी वाहून असा गेलो...
शेवटच्या श्वासापर्यंत
जणू तुझ्याच साठी जगलो...!
असंच..
एकटा
तू सोबत असल्याचे भास मात्र होत राहतात
किती, कसे आणि कधी-कधी आठवू तुला,प्रिये
अश्रूही हल्ली तू नसल्याचे दाखले देतात..!
महेश


